सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

डाउनलोड मोबाईल ॲप

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

गरीब, मध्यमवर्ग, श्रीमंत मानसिकता

03 Apr 2019 By श्री. प्रकाश भोसले
758 8 Comments
post-1

श्री. प्रकाश भोसले

एकदा एक गृहस्थ त्यांच्या तीन मुलांना घेवून चाणक्याकडे गेलॆ व म्हणालॆ, यातील कोणता मुलगा किती यशस्वी, श्रीमंत होईल ते सांगा? चाणक्याने त्या तीन मुलांना प्रत्येकी १०० नाणी दिली आणि म्हणाला, बाजारात जा व दिलेल्या नाण्यांचे सदरे (शर्ट) घेऊन या. तिघेही बाजारात गेले व काही तासांनी परत आले. प्रत्येकाने आपला सदरा दाखवला. पहिल्यानॆ तर खूप सुंदर व उंची कापडाचा ८० नाण्यांचा एकच सदरा आणला व २० नाणी शिल्लक ठेवली. दुसर्याने ११० नाण्यांचे साधारण सदरे आणले व म्हणाला, १० नाणी मी दुकानदारांकडे उधारी केली आहे. तिसर्याने ९० नाण्यांत अत्यंत हलक्या पध्दतीचे ९ सदरे आणले व १० नाण्यांची भजी खाल्ली. चाणक्याने प्रत्येकाला आपआपले सदरे परिधान करण्यास सांगितले. पहिला उंची सदरा घातलेला राजकुमाराप्रमाणे दिसत होता, हा कोणी मोठा श्रीमंत व्यापारी, अधिकारी होईल. दुसरा मध्यमवर्गीय दिसत होता, हा साधारण शिपाई, नोकरदार होईल. तिसरा अत्यंत हलका गरीब दिसत होता, हा मजूर, हमाल होईल. भविष्यात कोण श्रीमंत, मध्यमवर्गीय, गरीब होणार, हे त्याच्या आजच्या वर्तनात दिसते, जसे म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. जो उच्च वस्तु, घड्याळ, कपडे, आहार, मित्र, नातेवाईक, पुस्तके यांच्या सहवासात, त्याचे भवितव्यसुध्दा उच्च व मोठे होते. मोठ्या श्रीमंत व यशस्वी लोकांचे मित्र, नातेवाईक निवडक व चांगल्या प्रतीचे असतात, ते आहारसुध्दा खूप चांगला घेतात. मध्यम माणसाचा आहार, नातेवाईक, मित्रही तसेच साधारण, नोकरदार असतात. त्यामुळे तेही तसेच राहतात. गरीबांचे आहार, नातेवाईकही तसेच असतात. गरिबाच्या मयताला व लग्नाला गर्दी खूप असते, पण सगळे खायला व नावं ठेवायला येतात, कामाचा कोणी नसतो. नाहीतर लाख दोन लाख कर्ज झालेवर आत्महत्या झाल्या नसत्या. एवढ्या शेकडो नातेवाईकांपैकी कोणी मदतीला आला नसता का? तुमच्या मुलांना व तुम्हाला आयुष्यात यशस्वी श्रीमंत व्हायचे असेल तर प्रत्येक गोष्टीत निवडकता, क्वॉलिटी असली पाहिजे. एक ना धड, भाराभर चिंध्या काहीही उपयोगाचे नाही. 
 
तुम्ही कोणतॆ शुज, घड्याळ, मोबाईल, पुस्तक, कपडे, मित्र, नातेवाईक, सिनेमे, कोठे राहता, कोठे शिकता, तुमचे विचार, तुमचा आहार, फळे सेवन करता वापरता यावरच तुमचे भवितव्य अवलंबून आहे. चणॆफुटाणे, शेंगदाणे, चिरमुरे खाऊन कोणी पैलवान झाले आहे का? त्यासाठी तूप, बदाम, काजूच खावे लागतात व व्यायाम करावा लागेल. मॅनेजमेंटची थेअरी हेच सांगते “garbage in is equal to garbage out” “quality in equal to quality out” ज्याला आयुष्यात गोष्टी फुकट हव्या असतात, त्याचे आयुष्यही फुकट जातं. ज्याला रेशनकार्डवर फुकट धान्य मिळते, तो आपल्या शेतात पीक पिकवण्यासाठी मेहनत करत नाही. महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा यासाठी मी काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला, लेख आपल्या मित्र परिचितांना पाठवा, पूर्वी प्रसिध्द झालेले लेख हवे असल्यास आम्हास कळवा, मला pro2bhosale@gmail.com वर मेल करा किंवा ९८६७८०६३९९ व्हॉटसअप करा.

Share This:

प्रतिक्रिया

Varsha p borule on 18 Sep 2020 , 8:40PM

fruitful info

योगेश प्रभाकर on 08 Apr 2020 , 10:42PM

सुंदर माहिती दिली आहे.......

Bhagwan Vitthal waghole on 20 Nov 2019 , 9:20AM

Good is marathi paisa

Bhagwan Vitthal waghole on 20 Nov 2019 , 9:19AM

I like very paisa marathi

sachin on 10 May 2019 , 11:06AM

nice sir

SANJAY NARAYAN KHARADE on 06 Apr 2019 , 11:41AM

Quality standard तर जिंदगी standard

Navnath aagavne on 03 Apr 2019 , 4:20PM

kdk

Sachin ghatage on 03 Apr 2019 , 1:06PM

Good sir

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...

post-1