सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

डाउनलोड मोबाईल ॲप

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

फसव्या योजना कशा ओळखाल?

24 Jun 2019 By अर्थसाक्षर
1106 9 Comments
post-1

अर्थसाक्षर

गुंतवणूक तर सगळेच करतात. ज्या गुंतवणुकीमध्ये आकर्षक परतावा असेल, त्या गुंतवणुकीला लोकं प्राधान्य देतात. साहजिकच आहे, पैसा कोणाला नको असतो? पण हे साध्य करायचा मार्ग कोणता आणि कसा आहे, याची माहिती असल्याशिवाय फक्त आकर्षित व्याजदरांमागे / परतव्यामागे धावू नये. लक्षात ठेवा चकाकतं ते सोनं नसतं. आकर्षक परताव्याच्या चकचकीत ऑफर्स फसव्या असू शकतात.

विचार न करता दिसणाऱ्या मृगजळाला भाळू नका. “पुढच्यास ठेच, मागच्यास शहाणपण”, ही म्हण आपल्याकडे उगाच प्रचलित नाही. चुका तर प्रत्येकजण करतो, पण एकदा झालेली चूक निदान त्या माणसाने पुन्हा करू नये.  तसेच याबाबत इतरांनीही मार्गदर्शन करावे, जेणेकरून ती चूक इतरांकडून होणार नाही. हीच गोष्ट गुंतवणुकीसही लागू होते.
एखादी फसवी योजना कशी ओळखावी, याची काही पुस्तकी व्याख्या अथवा लिखित नियम नाही. पण प्रत्यक्षात घडलेली उदाहरणं मात्र नक्कीच आहेत आणि त्यातून आपण शिकलं पाहिजे. आकर्षक व्याजदर असं सांगून १४-१५ टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर किंवा अगदीच कमी कालावधीत पैसे दुप्पट करून देण्याच्या गोष्टी कोणीही उदारपणे इतरांसाठी करत नाही. किंबहुना हे अशक्यच आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा जगातला कुठलाही माणूस स्वतःच नुकसान करून घेऊन, दुसऱ्याचा फायदा करून देत नाही. त्यामुळे कोणतीही गुंतवणूक करण्याआधी पुढील गोष्टी लक्षात ठेवा आणि स्वतःच्याच हातून होणारे स्वतःचे आर्थिक नुकसान टाळा.

संपूर्ण माहिती-

फिर हेरा फेरी चित्रपट कोणी पहिला असेल तर बिपाशाने अक्षयकुमार, सुनीलशेट्टी आणि परेश रावलला घातलेला गंडा आठवा. अशी फसवणूक करणारी माणसे / संस्था / ऑफिसे आपल्या आजूबाजूला असू शकतील. ज्या पर्यायात किंवा योजनेत गुंतवणूक करायची असेल, त्या पर्यायाची किंवा योजनेची आणि संबंधित संस्थेची / बँकेची /ऑफिसची; तसेच ती योजना ऑफर करणाऱ्याची संपूर्ण माहिती मिळवा. आजवरच्या त्यांच्या योजनांचा इतिहास पहा, लोकांचा त्यातला अनुभव तपासा. हे सगळं समजून घेऊन, नीट विचार करूनच गुंतवणुकीचा निर्णय निश्चित करा. गरज वाटल्यास आर्थिक सल्लागारचा सल्ला घ्या.

उत्तम परतावा –

एखादी योजना फसवी असण्याचं पहिलं लक्षण म्हणजे  उच्च  परतावा. कोणत्याही प्रश्नांची समाधानकारक उत्तरे आणि पारदर्शक कार्यपद्धती सिद्ध न करणे,  परताव्याबद्दलचा अतिआत्मविश्वास,  अव्वाच्या सव्वा परतावा मिळण्याची खात्री, तसेच इतर सरकारी योजनांशी अथवा खात्रीशीर योजनांशी तुलना करून त्यापेक्षा जास्त परतावा मिळण्याची वारंवार हमी देणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करणे टाळा.

रोख व्यवहार–

शक्यतो अशा योजना रोख रकमेचे व्यवहार करण्यास प्राधान्य देतात. गुंतवणूक करताना रोखीचे व्यवहार करण्यापेक्षा शक्यतो ऑनलाईन किंवा चेकनेच व्यवहार करा. कारण चेक किंवा ऑनलाईन व्यवहारांची नोंद आपल्याबरोबर बँकेकडेही असते. फसवणूक  झाल्यास संबंधित प्रकरणात दाद मागण्यासाठी, हा अधिकृत पुरावा म्हणून गृहित धरला जाऊ शकतो.

शे्अर बाजारातील खात्रीशीर परतावे–

इक्विटी किंवा डेरिवेटीव्ह मार्केटमधून खात्रीशीर आणि उत्तम परतावा मिळवून देण्याची भाषा करणाऱ्या कोणत्याही लिखित अथवा तोंडी वचनांना आजिबात बळी पडू नका.  अशी वचने  खरी असती, तर आज कोणालाही शेअर बाजारामधील गुंतवणुकीची आणि त्यातल्या संभाव्य धोक्यांची इतकी भीती वाटली असती का? हा विचार करा. स्टॉक ब्रोकर म्हणजेच दलालांशीही रोख पैशात व्यवहार करू नका.

धोके –

फ्युचर अँड ऑप्शन्स (F&O) प्रकारात बरीच जोखीम असते. अश्या पर्यायात गुंतवणूक करण्याआधी त्या पर्यायाची आणि धोक्यांची  संपूर्ण माहिती घ्या.

Share This:

प्रतिक्रिया

Vasant Bhadane on 26 Jun 2020 , 1:28AM

Chhan App ahe.mala Share Market matual fund baddal mahiti pathava please.mi Navin aahe.7588205925 thanks.

Ranjit manikrao Patil on 17 Jun 2020 , 9:00PM

chan app aahe

योगेश प्रभाकर on 10 Apr 2020 , 7:43PM

खूपच सुंदर माहिती दिली आहे.......

santosh j. gujar on 25 Feb 2020 , 4:13PM

Good

Sudhir on 11 Feb 2020 , 12:20PM

very nice

anand on 05 Sep 2019 , 8:59AM

उत्तम सल्ला! आभार, धन्यवाद!👍💐

Devendra Hajare on 27 Jun 2019 , 8:31PM

F & O mhanje kay?

Rajesh A.Waghmare on 24 Jun 2019 , 9:08PM

100% √

रणजित नाटेकर on 24 Jun 2019 , 2:45PM

छान

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...

post-1