सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

डाउनलोड मोबाईल ॲप

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

गुंतवणूकदाराच्या माहितीकरिता ‘एसआयपी’ कॅल्क्युलेटर

07 Jul 2019 By अर्थसाक्षर
1393 16 Comments
post-1

अर्थसाक्षर

टेलिव्हिजनवर नुकतीच करोडपती मालिका चालू झाली आणि अनेकांनी मालिकेत सहभागी होण्यासाठी आपले नशीब आजमवायला सुरवात केली. मालिकेतून काही मोजके लोक करोडपती होतील मात्र इतरांसाठी मालिका फक्त करमणुकीचा भाग राहील.

आपण करोडपती व्हावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र झटपट श्रीमंत होण्याचा नादात आपण फसवणुकीला बळी पडतो व पोंजी योजनांमध्ये आपले मुद्दलही गमावून बसतो.

आपल्या संपत्ती निर्माणासाठी आपल्याला शिस्त आणि संयम ह्या दोन महत्वाच्या बाबी अंगिकाराव्या लागतात. त्यासाठी आपल्याला म्युच्युअल फंड मदत करतात. म्युच्युअल फंड हे सेबी द्वारा नियंत्रित असतात त्यामुळे आपले पैसे कोणी पळवून घेऊन जाईल ही भीती अजिबात नसते. मात्र म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखिमेच्या अधीन असते.

शेयर बाजार हा कायम चंचल व अस्थिर असतो. त्यामुळे आपण जर शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक केली तर नक्कीच आपण ह्या अस्थिर बाजारावर मात करू शकतो व दीर्घकाळामध्ये चांगली संपत्ती निर्माण करू शकतो. यासाठी म्युच्युअल फंड आपल्याला ‘एसआयपी’ची (SIP) सुविधा देतात. या सुविधेद्वारे एक ठराविक रक्कम दरमहा आपण म्युच्युअल फंडाकडे परस्पर आपल्या बँकेच्या खात्यातून वळती करू शकतो.

‘एसआयपी’चा मागील इतिहास पहिला तर इक्विटी म्युच्युअल फंडांनी ‘एसआयपी’ मधून खूप चांगला म्हणजे अगदी १५ ते १८ % किंवा कधी त्याहून जास्त परतावा दिला आहे. आपले करोडपती होण्याचे स्वप्न म्युच्युअल फंडाच्या ‘एसआयपी’मधून कसे साकारत येईल ते आपण पाहू.

यासाठी आपण म्युच्युअल फंडाचा कंजर्वेटिव्ह १२% परतावा गृहीत धरू. बरेच आर्थिक सल्लागार आपल्या संकेत स्थळावर आपली गुंतवणूकदाराच्या माहितीकरिता ‘एसआयपी’चे कॅल्क्युलेटर उपलब्ध करतात ज्यातून आपण आपल्या गुंतवणुकीतील पुढील काळातील वाढीचा अंदाज बांधू शकतो. असाच कॅल्क्युलेटर आमच्या www.nileshtawde.com ह्या संकेत स्थळावर सुद्धा आहे.

एसआयपी कॅल्क्युलेटर:–

आपण जर रु ३००० ची ‘एसआयपी’चालू केली तर आपले १ कोटीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला ती ३० वर्षे चालू ठेवावी लागेल.

आपण जर रु ५००० ची ‘एसआयपी’चालू केली तर आपले १ कोटीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला ती २६-२७  वर्षे चालू ठेवावी लागेल.

आपण जर रु १०००० ची एसआयपी चालू केली तर आपले १ कोटीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला ती २० वर्षे चालू ठेवावी लागेल.

आपण जर रु १५००० ची एसआयपी चालू केली तर आपले १ कोटीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला ती १६-१७ वर्षे चालू ठेवावी लागेल.

येणाऱ्या काळात म्युच्युअल फंडांनी १२% पेक्षा जास्त परतावा दिला तर आपले करोडपती होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता कमी कालावधी लागेल.

आता आपण अजून चांगला ‘सायंटिफिक अप्रोच’ पाहू-

दर वर्षी आपले उत्पन्न हे वाढत असते, अशावेळी आपण आपली ‘एसआयपी’ची रक्कम वाढविली तर म्युच्युअल फंड आपल्याला स्टेप अप ‘एसआयपी’ची सुविधा देतात. म्हणजेच दरवर्षी आपण ठराविक रकमेने आपली ‘एसआयपी’ची रक्कम वाढवू शकतो. त्या साठी फक्त एकदाच आपल्याला सूचना द्यायच्या असतात.

आपली रु ३००० ची एसआयपी जर आपण दरवर्षी रु ५०० ने वाढविली तर २४ वर्षात आपले रु  १ कोटीचे स्वप्न पूर्ण करू शकतो म्हणजेच स्टेप अप ‘एसआयपी’ने आपले उद्दिष्ट ६ वर्षे अगोदर पूर्ण होईल.

आपली रु ३००० ची एसआयपी जर आपण दरवर्षी रु १००० ने वाढविली तर २१ वर्षात आपले रु १ कोटीचे स्वप्न पूर्ण करू शकतो म्हणजेच स्टेप अप ‘एसआयपी’ने आपले उद्दिष्ट ९ वर्षे अगोदर पूर्ण होईल.

आपली रु १०००० ची एसआयपी जर आपण दरवर्षी रु २००० ने वाढविली तर १५ वर्षात आपले रु  १ कोटीचे स्वप्न पूर्ण करू शकतो म्हणजेच स्टेप अप ‘एसआयपी’ने आपले उद्दिष्ट ५ वर्षे अगोदर पूर्ण होईल.

आता हाच कॅल्क्युलेटर आपण दुसऱ्या पद्धतीने पाहू-

जर माझे वय ४० आहे व मी आता रु २०००० ची एसआयपी करून दरवर्षी  रु २००० वाढविली तर माझ्या निवृत्तीच्यावेळी साधारणत: रु ३ करोड १७ लाख जमा होतील.

आपल्या एसआयपी चालू करण्याच्या क्षमतेनुसार आपण ‘एसआयपी’ची रक्कम तसेच स्टेप अप ‘एसआयपी’ची रक्कम ठरवू शकतो व आपल्या स्वतःसाठी निश्चित असे संपत्ती निर्माणाचे उद्दिष्ट ठरवू शकतो. ‘

एसआयपी’करताना लार्ज कॅप फंड/ मिडकॅप फंड/ स्मॉल कॅप फंड  की या कॅटेगरीचे कॉम्बिनेशन करावे यासाठी योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक सल्लागारांना भेटा.
आजकाल देशाच्या कानाकोपऱ्यातून घरी बसल्या ऑनलाईन आपल्या मोबाईल फोन वरून अगदी १५-२० मिनिटात एसआयपी चालू करू शकतो व नंतर मोबाइलला ऍपद्वारे आपल्या गुंतवणुकीतील वाढ नियमितपणे पाहू शकतो.   

लक्षात असुद्या कि आपण हे जे कॅल्क्युलेटर पहिले ते आपल्याला आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी अंदाज देतात. बाजारातील उतार चढावामुळे आपल्या गुंतवणुकीवर परिणाम होऊ शकतो.

आपल्या करोडपती होणाच्या स्वप्नपूर्तीसाठी आमच्या शुभेच्छा .

धन्यवाद!

Share This:

प्रतिक्रिया

A on 16 Jul 2020 , 11:39PM

suruvaat kashi karavi mutual fund kharedichi

sandip on 29 Jun 2020 , 12:09PM

good information.i like it.

Vyankat Raghoji on 22 Jun 2020 , 9:38PM

very good information

सनिकेत दळवी on 31 Mar 2020 , 10:28PM

sir mi teen companyche share vikat ghetale aahe, tyachi vaad zhalii kiti zhalli he kase kalnarmala.

ganeah on 31 Jan 2020 , 7:19AM

good

Shekhar Shivaji Ambulkar on 06 Nov 2019 , 12:38PM

what if we will put 1lakh at a time for longer period, then what would be the returns?

narayan chavare on 30 Oct 2019 , 3:26PM

Good information

देवदत्त कदरे on 07 Oct 2019 , 12:21PM

very nice info

vaibhav on 27 Jul 2019 , 8:43AM

nice information

satish Ramchandra mohite on 22 Jul 2019 , 10:50PM

कोणते mutual फंड जास्त dividend देतात त्यावर एखादा लेख लिहावा सर तुम्ही

Sachin on 09 Jul 2019 , 8:52AM

mutual fund कसे select करायचे यावर पण एक लेख लिहा सर

vijay tengse on 08 Jul 2019 , 5:27AM

Good information

रणजित नाटेकर on 07 Jul 2019 , 11:34PM

छान

satish Ramchandra mohite on 07 Jul 2019 , 11:02AM

धन्यवाद सर, खूप मस्त माहिती दिली

omkar on 07 Jul 2019 , 9:50AM

sir what worse case scenario in sip ?

Sachin ghatage on 07 Jul 2019 , 6:40AM

Veri good sir

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...

post-1