सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

डाउनलोड मोबाईल ॲप

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

उद्योगासाठी मुलांना मानसिक पाठबळाची गरज

20 Jun 2019 By श्री. प्रकाश भोसले
559 8 Comments
post-1

श्री. प्रकाश भोसले

वय २३ ते २८ या गटातील पोरांची आज अत्यंत वाईट अवस्था आहे. शिक्षणावर खर्च करून पुण्यामुंबईला हेलपाटे घालून, स्पर्धापरीक्षेत प्रयत्न करून गोंधळलेली आहेत. शाळेत टॉपर असणारी पोरंसुध्दा आर्मी, पोलिस भर्तीसाठी पळताना दिसतात. इंजिनीअर झालेल्या पोरांना शेळ्या मेंढ्यापेक्षा कमी ८-१० हजार पगार मिळतो. ह्या पोरांच्या मनाची घालमेल डोकं फिरवणारी आहे. बापाकडे पैसे मागायला सुध्दा लाज वाटते, तर गावातली माणसं, कधी लागणार रे तुला नोकरी? म्हणून टोमणे मारतात. हाताला मिळेल ते व जमेल तो धंदा करावा तर एवढं शिकून मग काय फायदा? बडा आला टाटा-अंबानी असे टोमणे समाजात मारले जातात. आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना, अशी वाईट अवस्था ह्या वयोगटाच्या मुलांची झाली आहे. नोकर्‍यांचे प्रमाण हे अगदी नगण्य होत जाणार ही वस्तुस्थिती समाजाने समजून घेतली पाहिजे. फक्त शेती आणि नोकरी करून समाज दरिद्रीपंथाला लागला आहे. परंतु ज्या समाजाने उद्योगाची कास धरली, त्यांनी प्रचंड भरारी घेतली आहे, हे जाणावे. तरुण पिढीला टोमणे मारण्यापेक्षा उद्योग प्रती सकारात्मक दृष्टीकोण निर्माण केला पाहिजे. १० वी नंतर ह्या पोरांना तुम्हीच फडतुस शिक्षण दिले काय करायचे, हे पोरांना १६ व्या वर्षी कळेल काय? तुम्ही ५० चे थेरडे झालात तरी तुम्हाला मत कोणाला द्यायचे कळले नाही. तरुणांना प्रोत्साहन नाही देता आले तरी किमान त्यांना टोमणे मारण्याची अवदसा तुम्हाला सुचू नये. नाहीतर तुम्ही काय दिवे लावलेत व बापजाद्यांची विकून कशी खाल्ली हे आम्हाला बोलायला लावू नका, गप्प तुकडा खा आणि कोपर्‍यात पडा.  महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा यासाठी मी काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला, लेख आपल्या मित्र परिचितांना पाठवा, पूर्वी प्रसिध्द झालेले लेख हवे असल्यास आम्हास कळवा, मला pro2bhosale@gmail.com वर मेल करा किंवा ९८६७८०६३९९ व्हॉटसअॅप करा पूर्वी प्रसिध्द झालेले लेख वाचण्यासाठी माझा अॅप डाउनलोड करा  https://bit.ly/2S9osTH किंवा ९८६७८०६३९९ व्हॉटसअॅप करा. Share This:

प्रतिक्रिया

????? ????? ?????????? on 07 Oct 2020 , 11:40PM

साहेब माहिती पुस्तक आहे का सामान्य व्यक्ती वाचू शकेल. आभारी आहे. नमस्कार

Varsha p borule on 18 Sep 2020 , 7:13PM

thanks for guidance

योगेश प्रभाकर on 05 Apr 2020 , 3:57PM

सुंदर माहिती दिली आहे.....

Ranjeet.k on 11 Nov 2019 , 4:11PM

khup chan sir

Yogesh Bamnote on 20 Jun 2019 , 11:26PM

छान लेख

Shyam Deshmukh on 20 Jun 2019 , 1:34PM

फार छान आहे आपला लेख

Dinesh Raghunath Kothawade on 20 Jun 2019 , 8:58AM

भविष्यात कोणत्या क्षेत्रात संधी आहे, याचा विचार करुन व्यवसायाचे क्षेत्र निवडावे. बदलत्या जगाचा विचार करावा.

Sachin ghatage on 20 Jun 2019 , 8:47AM

Yes sir

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...

post-1