सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

डाउनलोड मोबाईल ॲप

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पाठांतर-माहिती म्हणजे शिक्षण-अभ्यास नव्हे...

20 Feb 2019 By श्री. प्रकाश भोसले
491 5 Comments
post-1

श्री. प्रकाश भोसले

आज फक्त महाराष्ट्रात ११ लाख इंजिनीअर्स, ६ लाख डीएड-बीएड, १ लाख एमबीए, दीड कोटी पदवीधर, १० वी १२ वी कित्येक कोटीत आहेत, जे सुशिक्षित बेकार आहेत. खरेतर माणसे जशी जास्त शिकतील तशी बेकारी, गरीबी नष्ट होऊन रोजगार, कामधंदा, व्यवसाय व पैसा कमवून साधन व्हायला हवे, परंतु परिस्थिती उलटीच होताना दिसते आहे. ह्याचे कारण म्हणजे शिक्षणपध्दती व शिक्षणासंबंधी संपूर्ण चुकीचे गैरसमज. पाठांतर व केवळ माहिती मिळवून परीक्षेच्या आगोदर १०-१५ दिवस सुपर गाईड व नोटस वाचून आज सहज पदवीधर होता येते. पण पाठांतर म्हणजे शिक्षण नव्हे, ही मूलभूत गोष्ट आपल्या ध्यानात आली पाहिजे.

कॉम्प्युटरला हार्डडिस्क आहे, त्यात एक टीबी मेमरी आहे व त्यात भरपूर माहितीने भरलेला डेटा आहे. तसेच त्याला चार जीबी रॅम आहे, जो डेटा प्रोसेस करतो. पण त्या रॅमच्या वेगाचा वापर करून डेटाचे पृथ:करण करून त्याची उपयोगिता परिस्थितीनुसार कशी करता येईल, याचे लॉजिक कॉम्प्युटर वापरणाऱ्याकडे येत नाही, तोपर्यंत तो कॉम्प्युटर, मेमरी व रॅम काहीही कामाची नाही.

ज्ञान कमी असले तरी चालेल, पण ज्ञानाचा वापर करण्याचे लॉजिक असणे महत्वाचे आहे. केवळ आयटीआय होऊन थोडीशी माहिती अनुभव घेवून त्या आधार उद्योग करून पैसा मिळविणारा खरा अभ्यासू... तेच खरे शिक्षण... मोठमोठ्या पदव्या कुचकामी ठरतील. तलवारी तर सगळ्याकडेच होत्या, पण त्याचा वापर करून छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले, तसेच पदव्या तर सर्वांचेकडेच आहेत पण ज्ञानाचा उपयोग व्यवसाय करून पैसे मिळवितो तोच आजचा खरा छत्रपती म्हणावा लागेल.

Share This:

प्रतिक्रिया

योगेश प्रभाकर on 08 Apr 2020 , 10:38PM

सुंदर माहिती दिली आहे.......

DDC on 07 Apr 2020 , 3:49PM

खुप सुंदर

pradip on 14 Apr 2019 , 12:31PM

👌👌👌👌👌

Sachin ghatage on 20 Feb 2019 , 11:24PM

Good sir

रणजित नाटेकर on 20 Feb 2019 , 4:24PM

सुंदर

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...

post-1