१४ गोष्टी ज्या श्रीमंत लोक आपल्या दैनंदिन जीवनात करतात. 

श्री. महेश चव्हाण

खूपदा सामान्य लोकांना वाटते की श्रीमंत लोक श्रीमंतीत जन्माला येतात पण हे पुस्तक वाचल्यावर तुमचे मत नक्कीच बदलेल कारण श्रीमंत त्यांच्या दैनंदिन सवयीमूळे श्रीमंत होतात यावर तुम्ही सहमत व्हाल.

श्रीमंत अधिक श्रीमंत का होतात हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर थॉमस कोरले यांचे “रिच हॅबिट्स” हे पुस्तक नक्की वेळ काढून वाचावे असे आहे. या पुस्तकात थॉमस कोरले यांनी श्रीमंत व्यक्ती आणि त्यांचे दैनंदिन जीवन याबद्दल ज्या १४ गोष्टी अधोरेखित केल्या त्या जर सामान्य व्यक्तीने स्वतःच्या दैनंदिन जीवनात अंमलात आणल्या तर नक्कीच त्याच्या आर्थिक जीवनाबरोबरच संपूर्ण जीवनावर चांगला प्रभाव पडू शकतो. 

१४ गोष्टी ज्या श्रीमंत लोक आपल्या दैनंदिन जीवनात करतात :- 

१) योग्य आहार : ७०% श्रीमंत लोक दिवसाला ३०० कॅलरी पेक्षा कमी आहार घेतात तर ९७% गरीब दिवसाला ३०० कॅलरी पेक्षा जास्त चा आहार घेतात.

२) ध्येय : ८०% श्रीमंत लोकांचे दिवसाला एकच ध्येय असते तर गरीब लोकांमध्ये फक्त १२% लोक एका ध्येयाच्या मागे असतात.

३) व्यायाम : ७६% श्रीमंत लोक आठवड्यातील ४ दिवस व्यायामासाठी पुरेसा वेळ काढतात तर फक्त २३% गरीब लोक यासाठी वेळ देतात.

४) ऐकणे : ६३% श्रीमंत लोक फावल्या वेळात ऑडिओ बुक्स ऐकतात तर फक्त ५% गरीब लोक ऑडिओ बुक्स ऐकतात.

५) टू डु लिस्ट : 81% श्रीमंत लोक त्यांच्या कडे त्यांच्या दिवसभराच्या कामाची टू डु लिस्ट तयार असते तर फक्त 19% गरीब लोकांना ही सवय असते.

६) कॉल : ८०% श्रीमंत लोक कॉल करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याला मान्यता देतात तर हेच ११%  फक्त गरीब लोक फक्त हा नियम पाळतात.

७) ध्येय लिहून काढणे : ६७% श्रीमंत लोकांकडे त्यांचे ध्येय लिहून ठेवण्याची सवय असते तर फक्त १७% गरीब लोकांमध्ये ही सवय पाहायला मिळते.

८) वाचन : ८८% श्रीमंत लोक रोज कमीत कमी ३० मिनिटे  तरी वाचन करतात तर फक्त २% गरीब लोक ३० मिनिटे वाचन करतात.

९) डोक्यात चालू असलेले विचार मांडणे : फक्त ६% श्रीमंत लोक त्यांच्या डोक्यातील विचार सर्वांसमोर मांडतात तर ६९% टक्के गरीब लोक जे काही डोक्यात आहे ते बोलू मोकळे होतात आणि मग अडचणीत येतात.

१०) नेटवर्किंग : ७९% श्रीमंत लोक महिन्यातील ५ तास नेटवर्किंग साठी देतात तर फक्त १६% गरीब लोक नेटवर्किंग करतात.

११) टीव्ही पाहणे : ६७% श्रीमंत लोक दिवसातून फक्त १ तास किंवा त्याहून कमी टीव्ही पाहतात तर फक्त २३% गरीब १ तास टीव्ही पाहतात.

१२) नो टू ट्रेश टीव्ही : फक्त ६% श्रीमंत Talk शो/ बातम्या पाहतात तर ७८% गरीब लोक Talk शो/ बातम्या पाहतात.

१३) लवकर उठणे : ४४% श्रीमंत लोक त्यांच्या कामावर किंवा व्यवसायाला सुरुवात करण्या आधी ३ तास उठतात तर फक्त ३% गरीब सकाळी लवकर उठतात.

१४) स्वतः मध्ये सुधारणा आणि शिकणे : ८६% श्रीमंत लोक स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि सतत शिकत राहण्यासाठी उत्सुक असतात तर फक्त ५% गरीब यासाठी उत्सकू असतात.

पुस्तकातील महत्वाच्या १४ गोष्टी सहज आणि सोप्या शब्दात मांडायचा प्रयत्न वरील लेखातून केला आहे. वाचनाची आवड असल्याने अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट वरून पुस्तक मागवून नक्की वाचावे.

लेख आवडल्यास किंवा काही त्रुटी असल्यास आम्हाला तुमचे अभिप्राय नक्की कळवा.


***************************

तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे “मराठी पैसा – ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा” हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa

शेअर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

तुमच्यासाठी सुचवलेले