श्री. महेश चव्हाण
गेल्या आठवड्यापासून कोरोना मुळे सारे जग स्तब्ध आहे. २१ दिवस सारे ठप्प पण कामगारांचे पगार, भाडे हे सर्व कसे मॅनेज करायचे या संदर्भात काही जणांनी प्रश्न विचारले “सर कसे मॅनेज करायचे काही सुचत नाही” त्या साऱ्यांसाठी हा लेख.
सुरुवात स्वतः पासून स्वतःच्या घरखर्चा पासून करूया…. जसे कोरोना रोखण्यासाठी प्रत्येकाने प्रथम स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घेणे गरजेचे आहे त्याप्रमाणे आपण आपले उत्पन्न आणि खर्च याचा ताळेबंद बांधणे गरजेचे आहे.
या लॉकडाउन मध्ये मिळालेल्या वेळात आपण आपल्या परिवाराचा या आर्थिक वर्ष्यातील ताळेबंद काढुया जेणेकरून लॉकडाउन नंतर सर्व सुरळीतपणे सुरू होईल तेव्हा तुमच्या हातात जबरदस्त इनपुट असतील जे तुम्हाला पुढील वर्षभरात निर्णय घेण्यासाठी मदत करतील.
१. तुमचे सर्व पर्सनल फॅमिली खर्च लिहून काढा.
२. आपल्याकडे येणारे उत्पन्नाचा आढावा घ्या… वाईटात वाईट किती उत्पन्न येऊ शकते ते काढा.
३. यातील कोणते कोणते खर्च तुम्ही टाळणार आहात ते कट करून टाका (लक्षात घ्या आणि बाणी च्या काळात सरकार ही त्यांचे प्रोजेक्ट पुढे ढकलते. आपल्याला ही आपल्या खर्चावर नियंत्रन आणणे गरजेचे आहे.)
४. उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ लागतोय का पहा (उत्पन्न कमी आणि अत्यावश्यक खर्च जास्त असतील तर टेन्शन नका घेऊ आज फक्त आपल्याला आकडे जाणून घायचे आहेत)
५. हे खर्च मासिक, त्रैमासिक, सहामाही, वार्षिक या मध्ये विभागा.
६. समजा तुमचे उत्पन्न ५०००० आहे आणि खर्च ६०००० आहे म्हणजे काय तर १०००० रुपये तुम्हाला उभे करावे लागतील.
७. आता या कोरोना लॉकडाउन मुळे लगेच उत्पन्न वाढेल याची काही शास्वती नाही तर आपण आपल्या आधीच्या गुंतवणूक तात्पुरत्या स्वरूपात त्यातून पैसे काढून घेऊ शकतो. किंवा खूपच अडचण असेल तर छोट्या कालावधी साठी गोल्ड लोन च्या माध्यमातून पुढील ६ महिन्यासाठी ६०००० उभे करू शकता.
८. हे करताना लक्षात घ्या हे पैसे तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात घेत आहात आणि ठराविक कालांतराने ते फेडणार आहात.
९. वरील पायऱ्या पाहून काही जण बोलतील कर्जे काढण्याचा पर्याय चुकीचा आहे तर त्यासाठी हे कर्जे ठराविक कालावधी साठी तुम्ही काढायचे आहे.
१०. डोके शांत असेल तर उत्पन्न वाढीसाठी तुम्ही काय करू शकता यावर तुम्ही जोमाने काम करू शकता.
विचार कसला करताय एक वही घ्या आणि एक पेन घ्या…. लागा कामाला आणि वरील पायऱ्या नुसार आपल्या परिवाराचा ताळेबंद काढा. लवकरच मी तुमच्या उद्योगाचा ताळेबंद यावर लेख पोस्ट करणार आहे. तेव्हा जर तुमचा परिवाराचा ताळेबंद तयार असेल तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल.
या लॉकडाऊन ला Respond करूया React करून स्वतःला त्रास करून घेऊन काहीच फायदा नाही आहे.