श्री. महेश चव्हाण
वर्ष्याला २५० दिवस शेअर बाजार चालू असतो म्हणजे २५०० दिवस होतात १० वर्ष्यात. यापैकी ५०-६० दिवसात मोठे रिटर्न्स मिळतात. म्हणजेच फक्त २% कालावधी मध्ये मोठा रिटर्न्स मिळतो. पण गंमत अशी आहे हे ५०-६० दिवस कधी येतील माहीत कुणालाच माहीत नसते. आणि हे दिवस जर हातातुन निसटले तर मिळणारे रिटर्न्स मध्ये खूप मोठी तफावत पाहायला मिळते ती खालीलप्रमाणे.
१ जानेवारी१९८० मध्ये गुंतवणूक केलेल्या १०००० चे मूल्य पाहूया… (२१ ऑक्टोबर २०२१ पर्यन्त) :
सर्व दिवस गुंतवणूक आहे तशी ठेवल्यास : ५०.१८ लाख
५ दिवस हातातून निसटल्यास : ४१.१४ लाख (९ लाखाचे नुकसान)
१० दिवस हातातून निसटल्यास : ३५.१७ लाख (१५ लाखाचे नुकसान)
३० दिवस हातातून निसटल्यास: १८.४६ लाख ( ३१ लाखाचे नुकसान)
५० दिवस हातातून निसटल्यास : ५.४४ लाख ( ४४ लाखाचे नुकसान)
लक्षात घ्या जगातील श्रीमंत व्यक्ती वॉरेन बफ्फेट सर ही एक खंत व्यक्त करतात मार्केट कधी पडेल कधी वाढेल याचा निष्कर्ष करण्यात मी माझ्या आयुष्याची ४-५ वर्षे घालवली…. तुम्ही १०००० गुंतवा पण ते दीर्घ काळासाठी असावेत मार्केट वर खाली होतच रहाणार पण जितके तुम्ही जास्त संयम दाखवाल तितके चक्रवाढ व्याज तुमच्यासाठी जास्त कार्य करेल.