सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आपला शेतकरी गरीब का होत आहे ?

08 Jun 2019 By श्री. प्रकाश भोसले
266 0 Comments
post-1

श्री. प्रकाश भोसले

भारत हा कृषिप्रधान देश आहे. अशी भारताची ओळख आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा कृषि हा कणा आहे असेही म्हणतात. परंतु हल्ली काही वर्षामधील शेतकर्‍यांची दयनीय अवस्था पाहून यावर विश्वास ठेवणे अशक्यच आहे. आज भारतात दुष्काळ, नापीकजमिनी, दारिद्र्य, कर्ज यामुळे शेतकर्‍यांचे आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. सन २००९-२०१६ दरम्यान एकट्या महाराष्ट्रातच १०००० हून अधिक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. एकेकाळी सुजलाम सुफलाम असलेल्या शेतकर्‍यांची आज भयंकर स्थिती आहे. याची कारणे शोधण्याचा मी प्रयत्न केला. आज आपण ज्याप्रकारे जगतो पोटभर अन्न खातो यामागे आपल्या शेतकरी बांधवांचे कष्ट आहेत. तो शेतात घाम गाळतो म्हणून आज आपल्या घरात धान्य येते. परंतु असे असूनही तो गरीबच का राहिलाय?

१) शेतमालाला कमी भाव : ही देशातील शेतकर्‍यांची सर्वात मोठी समस्या. सरकार शेतमालाला जी किमान किंमत निर्धारित करते ती शेतकर्‍याने पीक घेण्यासाठी केलेल्या गुंतवणुकी व मेहनतीच्या तुलनेत अतिशय कमी असते. त्यातून शेतकर्‍यांना पुरेसा नफा मिळत नाही, उलट कधी कधी नुकसानच होते. 

२) खुली बाजारपेठ नाही : सरकारने शेतमालासाठी किंमती व बाजारपेठा निश्चित जरी केल्या तरी त्या बाजारपेठेत शेतकरी आपला शेतमाल त्यांना अपेक्षित किंमतीमध्ये विकू शकत नाहीत. आजचा शेतकरी त्यांच्या मूलभूत गरजांसाठी आवश्यक तेवढे पैसेही कमवू शकत नाही. 

३) अज्ञान : भारतात शेतकर्‍यांमध्ये साक्षरतेचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे आपल्या शेतमालाबाबत ते ठोस निर्णय ही घेऊ शकत नाहीत. अज्ञान हे शेतकर्‍यांच्या गरीबीचे मोठे कारण आहे.

४) दलाल व घोटाळे : हे प्रकार भारतात मोठ्या प्रमाणावर घडत असतात. दलाल शेतकर्‍यांकडून अत्यल्प दरात शेतमाल खरेदी करतात. व उच्च दराने बाजारात विकतात. ते मोठ्या प्रमाणावर माल विकत घेतात, साठा करून ठेवतात व किंमती वाढवतात व नंतर विकतात. त्यामुळे महागाई होते.

५) दुष्काळ : जवळपास सर्वच शेतकरी पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात. अवकाळी पावसामुळे, दुष्काळामुळे शेतीचे नुकसान होते. ज्या भागात दुष्काळ आहे. त्याच भागात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करतात. 

६) कर्ज : आज सर्वच शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत. शेतीत होणार्‍या नुकसानीमुळे कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. त्यामुळे एकेकाळी वैभवशाली शेतकरी आज गरीब आहे. 

७) सिंचन व्यवस्था : सिंचनासाठी शेतकरी अजूनही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे, तेही आधुनिक तंत्रज्ञानाच्या ही गोष्ट लज्जास्पद आहे. आज भारत सुपर पॉवर होण्याच्या दृष्टीने वाटचाल करीत आहे. तरी सिंचन व्यवस्थेसाठी कोणतेच तंत्रज्ञान आपण विकसित करू शकत नाही. इस्त्राईल सारख्या वाळवंटी देशात कृषि क्रांती घडते परंतु भारतात नाही.

या कारणांव्यतिरिक्त इतर कारणेही शेतकर्‍यांच्या गरिबीस कारणीभूत आहे. त्यावर शासनातर्फे वेळीच उपाय योजना केल्या पाहिजेत. कारण जेव्हा इथला शेतकरी समृध्द होईल तेव्हाच भारत देश समृध्द होईल. पूर्वी प्रसिध्द झालेले लेख वाचण्यासाठी माझा अॅप डाउनलोड करा https://bit.ly/2S9osTH किंवा ९८६७८०६३९९ व्हॉटसअॅप करा.  

Share This:

प्रतिक्रिया

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...