सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

कृषि पर्यटनमधील एक अनुभव

23 Jun 2019 By श्री. प्रकाश भोसले
179 2 Comments
post-1

श्री. प्रकाश भोसले

परवा आम्ही मु.पो कुंठ्यांची गोठी, जि. रायगड श्री. सूर्यकांत पाटील या शेतकरी बांधवाकडे गेलो होतो. मुंबईत काही वर्षे नोकरी केल्यानंतर आपल्या असलेल्या एक एकर जमिनीत कृषि पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आज त्यांच्याकडे महिना सरासरी १० ते १२ पाहुणे पर्यटकांचे ग्रुप येतात. ते सकाळचा चहा नाष्टा, दुपारचे जेवण सायंकाळी कोपटी पार्टी व मस्त चुलीवर बनवलेले चिकन असा बेत करतात. पर्यटकांना राहण्यासाठी शेतातच गावराण पध्दतीने सोय करतात. घरासमोर मोठा व्हरांडा, आंबा, पपई. नारळ, फणस, चिंच, आवळा, चिकू यांची झाडे आहेत. शेतामध्ये भात, दोडका, आंबा, पालक, बीट, कांदा, कोथिंबीर, मेथी अशी पिके घेतात. हा अनुभव बालपणाची आठवण करून देणारा अविस्मरणीय असाच असतो. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन रोज १० हजार रुपये खर्च करून जो आनंद मिळत नाही त्याहून अधिक आनंद येथे मिळतो. मोठ्या हॉटेलात जाऊन श्रीमंतांना अधिक श्रीमंत करण्यापेक्षा आपल्याच शेतकरी बांधवांकडे कृषि पर्यटनाला जाऊन आपल्याच बांधवांचा व्यवसाय वाढवू आपणच आपली माणसे मोठी करू अगदी अत्यल्प भांडवलात या व्यवसायाची सुरुवात करून सूर्यकांत पाटील यांनी एक चांगले उदाहरण शेतकर्‍यांसामोर ठेवले आहे. आमच्या कंपनीची सहल प्रत्येक वर्षी अशाच एका शेतकर्‍याकडे नेऊन आपली माणसे मोठी करण्याचा आम्ही पायंडा पाडला आहे. तुम्हीही एक पाऊल उचला.  महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा यासाठी मी काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला, लेख आपल्या मित्र परिचितांना पाठवा, पूर्वी प्रसिध्द झालेले लेख हवे असल्यास आम्हास कळवा, मला pro2bhosale@gmail.com वर मेल करा किंवा ९८६७८०६३९९ व्हॉटसअॅप करा पूर्वी प्रसिध्द झालेले लेख वाचण्यासाठी माझा अॅप डाउनलोड करा https://bit.ly/2S9osTH किंवा ९८६७८०६३९९ व्हॉटसअॅप करा. 

Share This:

प्रतिक्रिया

Avinash manohar pokale ( pati ) on 17 May 2020 , 5:40PM

the great work sir

rahul patil on 23 Jun 2019 , 4:43PM

अभिनंदनीय!शेतकऱ्याला तारणारा विचार .

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...