सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

दुसर्‍यांना मोठे करणे तुमचे काम आहे का ?

05 Jul 2019 By श्री. प्रकाश भोसले
444 11 Comments
post-1

श्री. प्रकाश भोसले

सतीश हा शिक्षक दांमत्याचा एकुलता एक मुलगा जन्मत हुशार, शाळेत नेहमी ८५% हून अधिक गुण स्कॉलरशीप, प्रज्ञाशोध परीक्षेत नेहमी अव्वल येणार. १२ वी सायन्सला चांगले गुण मिळाले, इंजिनीअरींगला प्रवेश घेतला ते पूर्ण झालेवर पुढे एमबीए केले. संध्या इंडस्ट्रीत मंदी असल्याने कॉलेजवर प्लेसमेंट झालीच नाही, तेव्हा पुण्यात आला स्वत:हून अनेक कंपन्यात नोकरीसाठी मुलाखती दिल्या, नशिबाने एका इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट उत्पादन व निर्यात करणार्‍या कंपनीत प्रॉडक्शन व क्वालिटी कंट्रोल विभागात नोकरी मिळाली वेतन २७ हजार, पुण्यात राहणेसाठी महिना ६ हजार भाड्याने फ्लॅट घेतला, जेवण करणेसाठी खानावळीमध्ये ६ हजार खर्च व्हायचा, प्रवास इतर खर्च ६ ते ८ हजार खर्च व्हायचा सर्व खर्च वजा जाता १० हजार शिल्लक राहायचे. पालकांनी त्याला एमबीए करेपर्यंत सुमारे १२ ते १५ लाख खर्च केला. आज ते बँकेत ठेवले असते तर १० हजार व्याज आले असते, शिवाय एवढे डोळे फोडून हायस्कूल कॉलेजात अभ्यास केला कशासाठी ह्या महिना १० हजार कमविण्यासाठीच का? तुमचे टॅलेंट, मेहनत, शिक्षणाचा उपयोग तुम्ही तुमच्या भविष्यात उज्वल काही व्हावे म्हणून वापरत आहात का? काही फटकळ पगारासाठी तुम्ही दुसर्‍याचे उद्योग मोठे करीत आहात. जरा विचार करा तुम्ही कोणाला मोठे करत आहात. हजारो लाखो मराठी नोकरदार रात्रंदिवस कंपन्यात राबत आहेत व दुसर्‍याचे उद्योग मोठे करीत आहेत. लाखो, पालक आपल्या मुलांना यासाठी शिकवित आहेत की त्यांनी उद्या दुसर्‍याच्या कंपनीत जाऊन नोकरी करावी व त्यांच्या कंपन्या मोठ्या कराव्यात जरा विचार करा आपला जन्म स्वत: मोठे होण्यासाठी झाला आहे.  महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा यासाठी मी काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला, लेख आपल्या मित्र परिचितांना पाठवा, पूर्वी प्रसिध्द झालेले लेख हवे असल्यास आम्हास कळवा, 
 

    


Share This:

प्रतिक्रिया

pralobh parkhi on 22 Jun 2020 , 9:29PM

sundar sir

Santosh Laxman Salvi on 18 Apr 2020 , 4:21PM

Very true

Prathmesh on 14 Apr 2020 , 6:08PM

khup chan

yogesh sudhakar gawali on 03 Apr 2020 , 12:08PM

छान

Yogesh Bamnote on 05 Jul 2019 , 9:27PM

हो अगदी बरोबर

SWAPNIL KHARAT on 05 Jul 2019 , 10:27AM

Excellent Blog Sir

Prabhakar on 05 Jul 2019 , 9:49AM

fact

omkar on 05 Jul 2019 , 9:28AM

yes sir

siddharth kamble on 05 Jul 2019 , 9:12AM

good sir

amol bhagwan jare on 05 Jul 2019 , 8:58AM

Good

Sachin ghatage on 05 Jul 2019 , 8:37AM

Yes sir

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...