सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

नेहमी प्रेरणादायी कसे रहावे ?

20 Jul 2019 By श्री. प्रकाश भोसले
588 4 Comments
post-1

श्री. प्रकाश भोसले

सतत प्रेरणादायी राहणारी माणसे आपल्याभोवती एक ‘पॉझिटिव्ह ऑरा’ तयार करतात. त्यांना बघून इतरांनाही उत्साह येतो. तुमचे ध्येय जितके मोठे, तेवढे तुम्ही प्रेरित होता. नामवंत स्क्रीन रायटर सलीमखान यांना विचारले की, तुमची प्रेरणा काय? तेव्हा ते म्हणाले, “स्क्रीन रायटर चित्रपटाच्या हीरोपेक्षा जास्त मानधन मिळाले पाहिजे इतके महत्व स्क्रीन रायटरला यायला हवे, हे माझे ध्येय आहे.” आणि ते त्यांनी सिध्द करून दाखवले. माणूस जेव्हा स्वत:पुरता विचार करतो. तेव्हा थोडाच प्रेरित होतो. जेव्हा तो कुटुंबाचा विचार करतो, तेव्हा तो अजून जास्त प्रेरित होतो. पण जेव्हा तो समाज, देश आणि इंडस्ट्रीचा विचार करतो, तेव्हा त्याच्या ध्येयाची कक्षासुध्दा तेवढी मोठी होते. सलीम खान, रतन टाटा अशी माणसे वयाची ऐंशी गाठली, तरी ती तेवढीच प्रेरित असतात. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात उद्योग/व्यवसाय करीत असाल तर मी त्यात एक मैलाचा दगड म्हणून स्वत:ला सिध्द करण्याचे ध्येय ठेवा. अशा ध्येयाने प्रेरित माणसांना सकाळी उठण्यासाठी गजर लावण्याची गरज नाही’ रोज १८ तास काम करण्याची गरज नाही. कारण उच्च ध्येयामुळे त्यांचा दृष्टीक्षेप पुढील १० ते २० वर्षाचे चित्र पाहत असतो व आपण कसे कोट्यावधीचा उद्योग करणार आहोत, हे त्याच्या मनावर कोरलेले असते. तुमचे ध्येय लहान लहान टप्प्यात विभागून त्यानुसार तुम्हाला मार्गक्रमण करावे लागेल. पैसा कधीच माणसाचे प्रेरणास्थान असू शकत नाही. फक्त उच्च ध्येय व अफलातून कर्तुत्व जे तुमच्या मृत्यूनंतर सुध्दा लक्षात राहील, हेच खरे व आयुष्यभर टिकणारे प्रेरणादायी ध्येय होय. पूर्वी प्रसिध्द झालेले लेख वाचण्यासाठी माझा अॅप डाउनलोड करा https://bit.ly/2S9osTH किंवा ९८६७८०६३९९ व्हॉटसअॅप करा.
.


Share This:

प्रतिक्रिया

aniket on 13 Dec 2019 , 5:01PM

personality devolopment babat kahi margdarshan karal ka.

Yogesh Bamnote on 20 Jul 2019 , 7:35PM

छान

रणजित नाटेकर on 20 Jul 2019 , 11:31AM

सुंदर

Sachin ghatage on 20 Jul 2019 , 8:34AM

Yes sir

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...