सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आपली प्रगती रोखणारे आपणच असतो.

27 Jul 2019 By श्री. प्रकाश भोसले
857 2 Comments
post-1

श्री. प्रकाश भोसले

एका कंपनी समोर एके दिवशी सकाळी एक फलक लावलेला असतो. त्यावर लिहीलेले असते, “आपली प्रगती रोखणार्‍याचा काल मृत्यू झाला व त्याचे प्रेत शवपेटीत ठेवले आहे.” तो फलक वाचून सर्व कामगार त्या शवपेटीत कोणाचे प्रेत आहे. हे पाहण्यासाठी जायचे व त्या शवपेटीत प्रेत नसून एक आरसा बसवलेला होता. जो वाकून बघेल, त्याला स्वत:चा चेहरा दिसायचा ते पाहून प्रत्येकाला बोध व्हायचा व डोळे उघडायचे. या जगात आपली प्रगती रोखणारा दुसरा तिसरा कोणी नसून आपण स्वत:च असतो. कंटाळा व आळस आपल्यातच असतो नाकर्तेपणा हा आपल्या स्वभावात असतो. कारणे सांगणे ही प्रवृत्ती ही आपलीच प्रत्येक गोष्टीतून पळवाट काढणारे आपणच असतो. बापजाद्यांच्या जमिनी विकून खाणारे आपणच असतो आणि विनाकारण आपणच इतर श्रीमंतांना दुषणे देत असतो. पैशावर कुणाच्याही बापाचे नाव लिहीलेले नसते. पैसा हा जो अहोरात्र कष्ट करेल, रिस्क घेईल, डोके चालवेल त्याचाच असतो. तुम्ही आयुष्यात मागे पडला असाल, गरिबीत खितपतत असाल तर याला दुसरे तिसरे कोणीही जबाबदार नसून तुम्हीच असता. फक्त तुमच्या घरातल्या आरशात पहा, मग तुमच्या दारिद्रयाचा दुश्मन तुम्हाला दिसेल. कष्ट करून पैसे कमवणार्‍याला दोष देण्यापेक्षा स्वत: कष्ट करायला शिका, बापजाद्याची संपत्ती विकून, खाऊन संपली असेल तर कामाला लागा. महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा यासाठी मी काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला, लेख आपल्या मित्र परिचितांना पाठवा, पूर्वी प्रसिध्द झालेले लेख हवे असल्यास आम्हास कळवा, मला pro2bhosale@gmail.comवर मेल करा किंवा ९८६७८०६३९९ व्हॉटसअॅप करा पूर्वी प्रसिध्द झालेले लेख वाचण्यासाठी माझा अॅप डाउनलोड करा  https://bit.ly/2S9osTH किंवा ९८६७८०६३९९ व्हॉटसअॅप करा.


Share This:

प्रतिक्रिया

santosh j. gujar on 04 Mar 2020 , 7:39AM

शिक्षणाबरोबर असे धडे मिळाले पाहिजेत.

rahul patil on 27 Jul 2019 , 10:39AM

काळाची पावले ओळखली पाहीजे

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...