सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

बाप एकटाच स्मशानात जळत होता

14 Nov 2019 By श्री. महेश चव्हाण
974 7 Comments
post-1

श्री. महेश चव्हाण

बाप एकटाच स्मशानात जळत होता....हो आणि इथून पुढे खूप आई-बाप स्मशानात एकटेच जळणार आहेत
 
दिवसेंदिवस नाती प्रॅक्टिकल होत आहेत....आता आपण जे ८०-९० ची पिढी बोलतो ह्यांना इथून पुढे सर्वात जास्त त्रास आहे.....मुलांना पाश्चिमात्य शिक्षण, सवयी, संस्कृती आपणच घरात आणल्या आणि त्यात मला जे मिळाले नाही ते मी माझ्या मुलांना देणार मग माझ्यावर किती पण कर्जे होऊ दे... व्याज होऊ दे....ही टिपकील मध्यम वर्गीय लोकांची सर्वात मोठी चूक आहे असे मला वाटते....आणि पुढे जाऊन हीच मुले स्वतःचे वेगळे जग उभा करणार आणि आपला बागबान मधील अमिताभ होणार....प्रत्येक मूल असे निघेल असे नाही पण जे समाजात घडते तसे आपल्या घरात ही येते....मोबाईल चे बघा ना आज १० पैकी ३ जणांना अतिवापराचे व्यसन आहे...तसेच ही गोष्ट आपल्या ही बाबतीत होऊ शकते...
 
तुम्ही म्हणाल आपण काय करू शकतो तर...
 
१.आपल्या ऐपतीप्रमाणे मुलांचे लाड पूरवा जे आपल्या आई वडिलांनी केले.
 
२.आपल्या आर्थिक जीवनाबद्दल त्यांना ही माहिती असू द्या.
 
३.मुलांचे मित्र मैत्रिणी अतिश्रीमंत कॅटेगरी मधील असतील तर तिथे मुलांच्या डोक्यात स्वतःच्या फॅमिली च्या आर्थिक परिस्थिती बाबत नकारात्मक होतात. तिथे त्यांच्याशी संवाद साधा.
 
४.तुम्ही कष्टाने कमावलेला पैसा मुला प्रमाणेच स्वतःच्या आवडी निवडीवर पण खर्च करा.
 
५. तुमच्या मालमत्ता तुमच्या मुलांच्याच होणार आहेत पण देताना घाई नको
 
"माझी मुलेच म्हणजे माझी संपत्ती" हा काळ आता गेला आहे हे मान्य करा.....त्यामुळे असाच एखादा बाप स्मशानात जळला नाही पाहिजे तो सन्मानाने आला होता सन्मानाने जाईल.
 
मराठी पैसा ध्यास अर्थ साक्षर महाराष्ट्रचा ही चळवळ तुमच्या सर्व मित्र परिवारापर्यन्त पोहचवा...आपल्या समाजाचा आर्थिक स्तर जोपर्यत उंचवणार नाही तोपर्यंत समाजाचा विकास होणार नाही
 
व्हाट्सप ग्रुप लिंक साठी मला मेसेज करा.

Share This:

प्रतिक्रिया

Vaibhav on 27 Feb 2021 , 2:04PM

very nice👌

komal on 03 Oct 2020 , 3:53PM

खूप छान आहे

atul on 20 Feb 2020 , 5:40PM

खूप छान विचार आहेत

sayli on 14 Jan 2020 , 5:01PM

true

भारत आटोळे on 03 Jan 2020 , 11:20PM

भारी खूप छान

Ganesh Mengane on 26 Dec 2019 , 4:17PM

मराठी पैसा App च्या माध्यमातून अर्थविश्व समजून घेण्याचा प्रयत्न करतोय...सुरेख लेख... MUL च्या पनवेल मिटिंगमध्ये मी अनुभवले आहे धन्यवाद

Suhas on 17 Nov 2019 , 10:31AM

अगदी बरोबर आहे.

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...