सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

ई एम आय कमी कसा करावा ?

19 Jul 2021 By श्री. प्रकाश भोसले
577 2 Comments
post-1

श्री. प्रकाश भोसले

जेव्हा आपण कर्ज घेतो, तुम्हाला कर्जाऊ घेतलेल्या रकमेवर दरमहा व्याजासहित हप्ता भरावा लागतो हे व्याज म्हणजे मुद्दल रकमेच्या अतिरिक्त खर्चच असे समजा. जेवढा व्याजदर जास्त तेवढेच जास्त पैसे भरावे लागतात. शेवटी एकूण मुद्दालापेक्षा जास्त पैसे खर्च होतात. त्यामुळे ईएमआय ची रक्कम कमी करणे महत्वाचे असते. ईएमआय कमी करायचे विविध मार्ग आहेत. त्यातील काही मार्ग मी या लेखाद्वारे तुम्हाला सांगणार आहे.

* बँकेशी बोलणी करा : ज्या बँकेत तुमचे खाते आहे, त्या बँकेशी जर तुमच्या खात्यामध्ये चांगले व्यवहार असतील तर त्या बँकेतून कर्ज घेतले असल्यास व्याजदर कमी करण्यासाठी त्यांच्याशी वाटाघाटी करता येईल. आपल्या चांगल्या ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांच्या कर्जावरील व्याजदर कमी करण्यास बँका इच्छुक असतात. जर बँकेकडून असे होत नसेल तर खाली इतर पर्याय सुचवतो.

* बँक/ कर्जपुरवठा करणारी संस्था बदला : सध्या कर्जपुरवठादार संस्थामध्ये वाढलेली स्पर्धा व बाजारात येत असलेले नवीन स्पर्धक कर्जपुरवठादार, यामुळे आपल्याकडे विविध पर्याय आहेत. परंतु हे करत असताना केवळ व्याजदर आकारणी बद्दलच नव्हे तर प्रक्रिया शुल्क, प्रीपेमेंट दंड, इत्यादी सारख्या अन्य फीचा विचार करणे हेदेखील तितकेच महत्वाचे आहे. हे शुल्क जितके वाढतील, तितकेच कर्जही वाढते. त्यामुळे कर्जपुरवठादार संस्था बदलताना तुमच्या वर्तमान कर्जपुरवठादारांकडून आकारले जाणारे शुल्काबाबत विचार करणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे नवीन कर्जदारांची गुणवत्ता जाणणे महत्वाचे असते. त्यामुळे कर्ज सोडवताना काही अडचणी आल्यास त्या सोडवल्या जातील.

* प्री-पे : जर आपणास वेतनवाढ किंवा बोनस मिळाला तर या रकमेचा उपयोग उर्वरित कर्ज फेडण्यासाठी होतो. पार्ट पेमेंटमुळे कर्जाची मुख्य रक्कम कमी होते. त्यामुळे आपोआप मुदत व व्याजदरही कमी होतील. जितकी थकीत रक्कम जास्त, तेवढे जास्त व्याज भरावे लागते. कर्ज म्हणजे केवळ आर्थिक ताण नसून तो एक मानसिक ताणही असतो. प्री पेमेंटमुळे आपल्या कर्जासोबतच आर्थिक व मानसिक ताण ही कमी होतो.

* प्रथम उच्च व्याजदर असलेली कर्जे फेडा : जर आपल्याकडे होम लोन, पर्सनल लोन व क्रेडिट कार्ड लोन असेल तर आधी क्रेडिट कार्डाचे लोन फेडा, कारण क्रेडिट कार्ड लोनवर व्याजदर जास्त असतो. नंतर पर्सनल लोन फेडा व शेवटी होमलोन. उच्च व्याजाची कर्जे फेडतानाच इतर कर्जावरील किमान रक्कम भरणे चालू ठेवा. उच्च व्याजाचे कर्ज फेडले की नंतर पैशांचा बचत म्हणून वापर केला जाऊ शकतो. आधुनिक जीवन पध्दतीत बरेच जणांचा पैसा कर्ज फेडण्यात जातो. त्यामुळे आर्थिक व मानसिक ताण वाढतो. त्यामुळे आपण ईएमआय व कर्जाची मुदत कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

ईएमआय कमी करण्यासाठी बँकेशी किंवा कर्जपुरवठादारांशी चर्चा करून व्याज कमी करणे, कर्जपुरवठादार बदलणे प्री-पेमेंट करणे आणि उच्च व्याजदराची कर्जे फेडण्यास प्राथमिकता दिल्यास तुम्हाला दीर्घ कालावधीसाठी पैसे वाचवता येतील.

Share This:

प्रतिक्रिया

Niranjan on 21 Jul 2021 , 11:38AM

माहिती छान आहे आणि योग्य आहे

Ramesh on 19 Jul 2021 , 12:16PM

Nice information sir, thank u.

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...