सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आत्मनिर्भर भारत आणि उद्योजकांसाठी असलेल्या संधी - भाग दुसरा शेती शेतीनिहाय उद्योग आणि शेतकरी

03 Jun 2020 By तेजस विनायक पाध्ये
351 2 Comments
post-1

तेजस विनायक पाध्ये

आपल्या सर्वांच्या लाडक्या अन्नदात्या विषयी लेख असल्यामुळे हा लेख मोठा होणार आहे आणि तो दोन भागात असणार आहे.


भारताला कृषिप्रधान देश म्हटलं गेला आहे. पण शेती आणि शेती निहाय क्षेत्राचं भारताच्या जी डी पी मधील कॉन्ट्रीब्युशन 15.87% एवढच आहे. 2011-12 झाली ते कॉन्ट्रीब्युशन 14.39% एवढं होतं (संदर्भ स्टॅटिस्टिक्स आणि प्रोग्राम इम्पलेमेंटेशन मंत्रालय आणि इकॉनोमिक सर्वे 2018 19). म्हणजे त्यात फार वाढ झालेली नाही


असं असून सुद्धा आज घडीला भारतात अन्नधान्याचा तुटवडा नाही असं सरकारने जाहीर केलेलं आहे. माझ्या मते हे क्षेत्र ऑर्गनाईज नसल्याने हे आकडे स्पष्ट चित्र दाखवत नसावेत. परंतु यावेळेस शेती आणि शेती निहाय क्षेत्रांसाठी बऱ्याच घोषणा केल्या गेल्या आहेत. आपण त्या योजना आणि संधींचा थोडक्यात आढावा घेऊ. सर्व योजना तिथे मांडता येणार नाही त्यामुळे फक्त महत्त्वाच्या योजनांविषयी येथे चर्चा करणार आहे.


(आधी सांगितल्याप्रमाणे हे सर्व मी एका एक्सेल शीट मध्ये एकत्रित केलेले आहे. कुणाला हवे असल्यास हि सर्व माहिती मी निश्चित देऊ शकतो.)


शेती, पशूपालन, मत्स्यपालन, मधुमक्षिका पालन, फळ आणि भाजी उत्पादन, आणि वनऔषधी तसेच औषधी पिकांची व झाडांची लागवड यासंदर्भात या लेखात योजना मांडलेल्या आहेत आहेत. कोविंड नंतर शेतकऱ्यांना शेती कर्ज किसान क्रेडिट कार्ड मार्फत थेट मदत केली जाणार आहे. तसेच सध्या असलेल्या कर्जांना नाबार्ड मार्फत री-फायनान्स करण्याची पहिली योजना जाहीर झालेली. यात शेतीमाल विकत घेणे हा मुख्य उद्देश असणार आहे ज्यायोगे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाच्या मोबदला मिळू शकेल.

 

योजना: शेतकऱ्यांना जास्तीचे आणि तातडीचे खेळते भांडवल (ऍडिशनल इमर्जन्सी वर्किंग कॅपिटल) नाबार्ड तर्फे दिले जाणार आहे आहे. रबी हंगामानंतरचे खर्च भागवणे तसेच खरीप हंगामासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची खरेदी करणे यासाठी मुख्यतः हे कर्ज दिले जाईल.


संधी : शेतकऱ्याच्या हातात हंगामाच्या आधी पैसे आले तर त्यांना हंगामासाठी व्यवस्थित तयारी करता येईल. अर्थात यामुळे सरकारकडे शेतकऱ्यांची, त्यांच्याकडच्या जमिनीची आणि पिकांची माहिती सुद्धा उपलब्ध होईल. भारतातील पिकाचे नियोजन करणे व शेतकर्यांना हवी असलेली माहिती पुरविणे या माहितीमुळे शक्य होऊ शकेल.


योजना : फार्म गेट अर्थात शेती उत्पादकाच्या उत्पादन क्षेत्राजवळ आणि शेती उत्पादन एकत्रित केले जाते अशा ठिकाणी साठवणुकीसाठी आणि वाहतुकीसाठी सोय निर्माण करणे. शेतीची बरीचशी उत्पादने ही नाशवंत असतात. या योजनेमुळे नाशवंत पदार्थांचे होणारे नुकसान कमी होईल व शेतकऱ्यांना योग्य भाव मिळू शकेल. शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन साठवण्याची तसेच त्याची वाहतूक करण्याची सोय शेताच्या जवळ मिळाल्यामुळे त्यात होणारे नुकसान टाळता येईल.


संधी : या योजनेअंतर्गत दोन गोष्टी होणार आहेत - पहिली म्हणजे स्टोरेज कॅपॅसिटी अर्थात साठवणुकीसाठी क्षमता निर्माण करणे आणि दुसरी म्हणजे लॉजिस्टिक अर्थात वाहतुकीची योग्य व्यवस्था निर्माण करणे. या दोन्ही मध्ये बऱ्याच ठिकाणी अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होऊ शकतात. स्टोरेज बनवण्यासाठी बांधकाम संबंधित सर्व छोट्या-मोठ्या उद्योगांना संधी मिळू शकतात. तसेच स्टोरेज आल्यावर तिथे विजेची गरज सुद्धा भासणार आहे; त्यामुळे सगळ्यात स्वस्त वीज म्हणून सोलार उद्योगाला सुद्धा तिथे संधी उपलब्ध होऊ शकते. लॉजिस्टिक्स अर्थात वाहतुकी संदर्भात असलेल्या व्यवसायांना म्हणजे वाहन विक्री, प्रत्यक्ष वाहतूक करणे, वाहनांचा मेंटेनन्स करणे, पेट्रोल / डीझेल, गाडीचालकांच्या जेवणाखाण्याची व्यवस्था असे अनेक अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होऊ शकतात.


योजना : शेतीमाल विपणन विषयात अर्थात मार्केटिंग मध्ये सुधारणा करणे. यामध्ये मुख्यतः शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन चांगल्या भावात विकण्यासाठी, अंतर राज्य शेती व्यापारासाठी आणि शेतमालाच्या ऑनलाइन ट्रेडिंगसाठी एक केंद्रीय कायदा करण्याची योजना आहे. यासोबतच शेतीमालाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि आणि शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी मानक यंत्रणा (स्टॅंडर्ड मेकॅनिझम) अमलात आणली जाईल. यामुळे शेतकऱ्यांची जोखीम कमी होऊन त्यांना गुंतवणुकीवर योग्य मोबदला मिळेल आणि सोबत शेती उत्पादनाची गुणवत्ता सुद्धा सांभाळली जाईल.


संधी : शेती क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या सर्वांना यात अनेक संधी उपलब्ध होऊ शकतील. मार्केटिंग आणि ऑनलाइन ट्रेडिंग या दोन गोष्टी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिल्यामुळे शेतकर्यांना टेक्नॉलॉजीचा वापर करून शेतमाल बाजारापर्यंत पोचवता येईल. योग्य भाव मिळवताना येणाऱ्या अडचणी कमी होतील व काही काळाने त्या अडचणी दूर सुद्धा होतील.


वरील सर्व योजना थेट शेती विषयक होत्या


पशूपालन व्यवसाय

योजना: मला जाणवलेली सगळ्यात महत्त्वाची योजना म्हणजे नॅशनल ऍनिमल डिसीज कंट्रोल प्रोग्राम. याअंतर्गत गाई म्हशी मेंढ्या बकऱ्या आणि डुक्कर या सर्वांचे शंभर टक्के लसीकरण केले जाणार आहे.


संधी : बऱ्याचदा एखादा रोग आल्यामुळे प्राणी आणि दगावतात किंवा त्यांची मुख्य क्षमता (उत्पादन, प्रजनन, विक्री, इत्यादी) कमी होते. त्यात शेतकऱ्याचे मूळ गुंतवणुकीचे नुकसान तर होतेच परंतु भविष्यातील उत्पादनाला सुद्धा खीळ बसते. तसेच शेतकऱ्याचा या प्राण्यांच्या आजारावर सुद्धा बऱ्यापैकी खर्च होत असतो. लसीकरण झाल्यामुळे अशा प्रकारे होणारे खर्च आणि पर्यायाने नुकसान कमी होईल आणि शेतकऱ्याचे उत्पन्न वाढायला मदत होईल. यात दुसरी असलेली संधी म्हणजे पशु पालन क्षेत्रात काम करणारे डॉक्टर तसेच यासाठी लागणारे औषधी निर्माण करणाऱ्या कंपन्या या सर्वांना याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष फायदा होणार आहे.


योजना : डेअरी फार्मिंग करणाऱ्यांना व्याजदरांमध्ये दोन टक्के सूट देण्याची योजना आहे लोक डाऊन मुळे दूध उत्पादन क्षेत्राचे बरेच मोठे नुकसान झालेले आहे. या व्याजदरातील कपातीमुळे मुळे त्यांचा व्याजावरील खर्च कमी होईल आणि त्यांच्याकडे थोडा खेळता पैसा शिल्लक राहू शकेल.


योजना : डेरी प्रोसेसिंग क्षेत्रात तसेच पशुखाद्य क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला समर्थन देणे यासाठी पशूपालन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड स्थापन करण्याची योजना आहे. आपल्या देशात दूध उत्पादनात अग्रेसर असलेली अनेक ठिकाणे आहेत. या योजने अंतर्गत अशा ठिकाणांचा विकास केला जाईल. याशिवाय या क्षेत्रात उद्योग (डेअरी प्लांट) उभारणीसाठी आणि काही विशेष उत्पादने निर्यात करण्यासाठी विशेष अनुदान सुद्धा दिले जाईल.


संधी : प्रचंड संधी असलेली योजना अस मी याच वर्णन करेन. बऱ्याच ठिकाणी चांगला चारा उपलब्ध आहे त्यामुळे तिथे पशुपालन व्यवसाय चांगला होऊ शकतो. अशा ठिकाणांमध्ये जर शेतकरी असेल तर याचा निश्चित लाभ घेऊ शकतो. यामुळे त्याला त्याच्या राहत्या ठिकाणी उत्पन्नाची संधी निर्माण होईल व स्थलांतराची गरज राहणार नाही. जेव्हा एखाद्या ठिकाणी एखादा उद्योग उभारला जातो तेव्हा त्याच्या आजूबाजूला अनेक संधी निर्माण होतात. तसेच या या बाबतीत सुद्धा होऊ शकते. दूध उत्पादनात अग्रेसर असलेल्या ठिकाणांना थेट फायदा होणार आहेच. त्याशिवाय डेरी फार्मिंग या विषयाशी संबंधित असलेल्या प्रत्येक उद्योगाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष फायदा होऊ शकतो. उदाहरणार्थ डेअरी साठी लागणाऱ्या मशिनरी बनवणारे उद्योजक आणि त्यातले तज्ञ, पशु तज्ञ, चारा उत्पादन करणारे शेतकरी, दूध वाहून नेण्यासाठी टँकर, दूध साठवून ठेवण्यासाठी लागणारी स्टोरेज मशिनरी, त्यासाठी लागणारी वीज अर्थात सोलार सिस्टीम पुरवणारे उद्योजक, वाहतुकीसाठी लागणारे रस्ते, कामगारांना राहण्यासाठी घरे, त्यांच्या मूलभूत गरजा भागवणारे उद्योग अशा असंख्य संधी या एका क्षेत्राच्या आजूबाजूला निर्माण होऊ शकतील. आणि आपण अशा अनेक उद्योग नगरी आजपर्यंत पाहिलेल्या आहेत (उत्तम उदाहरण म्हणजे अमूल). या सोबत महत्त्वाचं म्हणजे दुग्धजन्य पदार्थ; अर्थात ह्या विषयावर मी फार काही बोलायची गरज नाही. अर्थात मी लिहिलेल्या संधी खूपच मर्यादित आहेत आणि आपल्यातले या क्षेत्राशी निगडीत असलेले उद्योजक त्यात अजूनही संधी सहज शोधू शकतील.

यामधल्या लपलेल्या संधी शोधायच्या असतील तर तुम्हाला संत तुकारामांनी सांगितलेल्या वचनाच पालन कराव लागेल - तुका म्हणे होय मनासी संवाद । आपुला चि वाद आपणांसी ।।


इतर संधींविषयी बोलू पुढील भागात…

Share This:

प्रतिक्रिया

SHAILESH on 04 Jun 2020 , 6:22PM

kontya yojna ahet tyanchi mahiti excle sheet pahije. एक्सेल शीट पाहिजे

सिताराम व्दारकू म्हाळसकर on 03 Jun 2020 , 12:01PM

खूप छान योजना आहे

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...