सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

शेतकरी ट्रेडिंग सेंटर एक अभिनव उपक्रम मला काही दिवसापूर्वी सांगली जिल्ह्यातून एक फोन आला. संपर्क करणारे एक

14 Aug 2019 By
1477 1 Comments
post-1

मला काही दिवसापूर्वी सांगली जिल्ह्यातून एक फोन आला. संपर्क करणारे एक द्राक्ष बागायतदार शेतकरी होते. त्यांच्या गावात ३००० एकर क्षेत्र द्राक्ष लागवडीखाली येते, परंतु त्यांच्याकडील द्राक्ष मालाला उचित भाव मिळत नसल्याचे ते म्हणाले, म्हणजे सध्या बाजारात द्राक्षांचे भाव हे १००-१२० रु. किलोने विकली जातात. परंतु स्थानिक दलाल त्यांच्याकडून केवळ २७-३० रु दराने ती विकत घेतात. म्हणजे शेतकर्‍यांना मिळणारा भाव व प्रत्यक्ष बाजारातील किंमत यात ७०-८० रु. तफावत आहे. हे ७०-८० रु. मग जातात कोठे? अर्थातच मधले दलालांच्या खिशात.. म्हणजे मेहनत कोणाची आणि फायदा कोणाचा इथे शेतकरी मेहनत करतो आणि फायदा ते लोक घेतात. ज्यांना शेतीबद्दल टिचभरही ज्ञान नसते, त्यांचा शेतीशी तीळमात्र देखील संबंध नसतो. त्यामुळे हे लोक दिवसेंदिवस श्रीमंत होत चालले आहेत व शेतकरी मात्र दिवसेंदिवस बिकट अवस्थेत जाऊ लागला आहे. शेतकर्‍यांकडे आता एकच मार्ग आहे, आपल्या शेतमालाचे आपण स्वत:च मार्केटींग व ट्रेडिंग करावे. काही दिवसांपूर्वी ५० शेतकर्‍यांनी एकत्र येऊन बेदाणा ट्रेडिंग केंद्र स्थापन केले. आता ते कोणताही दलाल न घेता थेट जिल्हा व राज्यपातळीवर बेदाण्याचे ट्रेडिंग करतात. तसेच द्राक्ष उत्पादकांनी देखील करावे असे मला वाटते. सध्याच्या परिस्थितीचा विचार केल्यास शेतकर्‍यांसाठी ते लाभदायक ठरेल. छोट्या स्किलवर याची सुरुवात केली जाऊ शकते. तर काही शेतकर्‍यांनी एकत्र येऊन एक गट बनवून आपल्या शेतमालाचे ट्रेडिंग करू शकता. यामुळे शेतकरी व बाजारातील विक्रेते या दोघांचाही फायदा होईल. यासाठी सर्वांनी एकमताने एकत्रित येणे महत्वाचे आहे. ट्रेडिंग सेंटरमध्ये काही निवडक शेतकर्‍यांची एक कमिटी स्थापन करावी. तरुण शेतकर्‍यांनी पुढाकार घ्यावा, सुशिक्षित व तंत्रज्ञांनाची माहिती असेल तर उत्तम यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन घेणे  आवश्यक आहे. व्यापार व वित्त क्षेत्रातील नवनवीन कल्पना जाणून घ्या, फायद्याचे ठरेल. मार्केटींग शिकून त्यातील नवनवीन तंत्रांचा सखोल अभ्यास करावा लागेल. शेतकर्‍यांनी एकत्र येऊन ट्रेडिंग सेंटरची स्थापना करावी. यामध्ये द्राक्षांची वा इतर उत्पादनांची थेट विक्री केली जाऊ शकते. सर्वांनी पैसे गोळा करून, जागा, कार्यालय, नोंदणी, गोदाम इ. मूलभूत गोष्टींची पूर्तता करावी. ट्रेडिंग सेंटर तयार झाल्याने सर्व शेतकर्‍यांचा माल एका ठिकाणी योग्य दरात विकला जाऊ शकतो त्यामुळे शेतकर्‍यांना त्यांच्या उत्पादनांना अपेक्षित व योग्य भाव मिळेल.

Share This:
Tags :

प्रतिक्रिया

दिलीप on 24 Feb 2020 , 10:32AM

तुम्ही कितीही तरी शेतकऱ्या ला समझावल तरी तो जाणार दलाला कड़े कारण?????????

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...