सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आर्थिक नियोजन :- मालमत्तेचे व्यवस्थापन आर्थिक नियोजन :- मालमत्तेचे व्यवस्थापन

05 Dec 2018 By श्री. महेश चव्हाण
630 0 Comments
post-1

श्री. महेश चव्हाण

आतापर्यंत हिंदी किंवा मराठी सिनेमा मधील मालमत्तेचे वाद आपण पहिलेच आहेतच. पण अशी कधी वेळ आपल्यावर आली तर? आम्ही जेव्हा आर्थिक नियोजन करताना मालमत्तेचे व्यवस्थापनासाठी इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र करायला सांगतो तेव्हा बहुतेक जण यात विशेष रस दाखवत नाहीत. भारतामध्ये बहुतेकजणांची अशी समजूत आहे की एकदा का आपल्या गुंतवणुकीवर किंवा संपत्तीच्या कागदपत्रावर आपल्या जवळच्या व्यक्तीची नावे नॉमिनी म्हणून लावले तर झाले आणि इथेच मोठा घोळ होतो. लक्षात घ्या मालमत्तेचे व्यवस्थापन ही काळाची गरज आहे मग ती तुमच्याकडे १० लाखाची असो किंवा १० कोटी असो. नॉमिनी हा केवळ विश्वस्त असतो पूर्णपणे त्या संपत्तीचा मालक नसतो, जोपर्यंत तुम्ही त्याला इच्छापत्र किंवा मृत्यूपत्रामध्ये स्पष्टपणे ती संपत्ती त्याच्या नावावर करत नाही.

माझ्या एका ग्राहकाच्या जवळच्या नातेवाईकाचे २ वर्षांपूर्वी ह्रदयविकाराने निधन झाले. मागे ३ कोटीच्या रिअल इस्टेट आणि इतर गुंतवणूक. आता त्यातील २ मालमत्ता कौटुंबिक वादामुळे सील केल्या आहेत. कारण काय तर त्याची पत्नी आणि त्याचे आई-वडील यामध्ये मालमत्ता हस्तांतरबाबाबत वाद चालू आहेत. म्हणून लक्षात घ्या आपण हयात असतानाच मालमत्ता हस्तांतरणाचा वाद मिटवून टाका. आपल्या हिंदू धर्मात मृत्यूबद्दल बोलले जात नाही त्यामुळे हा विषय कसा काढायचा म्हणून बहुतेक जण मालमत्ता हस्तांतरच्या नियोजनापासून माघार घेतात आणि आपल्या पश्चात मग हा विषय कौटुंबिक वादाने चव्हाट्यावर तर येतोच पण आपल्याच व्यक्ती एकमेकांशी भांडत बसतात. यासर्वांवर एकच उपाय म्हणजे इस्टेट प्लानिंग म्हणजेच मालमत्ता नियोजन. मालमत्तेचे नियोजन कसे करावे ते पाहूया.

मालमत्तेचे नियोजन करताना आर्थिक सल्लागार आणि वकिलाचा सल्ला घ्यावा. जेणेकरून त्यामध्ये उणीव राहणार नाही. मालमत्तेचे हस्तांतरण करताना पुढील प्रश्न स्वतःला विचारा आणि त्या त्या प्रश्नांची उत्तरे शोधून त्यावर योग्य मार्ग काढून स्वतःचे मृत्यपत्र बनून घ्या कारण वाईट वेळ कधी येईल सांगता येत नाही.

१. तुमच्या परिवाराला तुमच्या सर्व मालमत्ता किंवा आर्थिक व्यवहार माहित आहेत का? बहुतेक वेळा आपण खूप गुंतवणूक करत असतो पण या गोष्टी परिवारापर्यंत पोहचत नाहीत. यासाठी आपल्या मालमत्तेची लिस्ट करा. 

  • मालमत्ता 
  • वेगवेगळ्या योजनांत केलेली गुंतवणूक 
  • इतरांकडून येणारी रक्कम 
  • इतरांना द्यायला लागणारी रक्कम 
  • विमा संरक्षण 


२. तुमचा परिवार या मालमत्ता किंवा आर्थिक व्यवहार हाताळू शकतो का?
जेव्हा वाईट वेळ येणार आहे तेव्हा तुम्ही तिथे नसणार आहात, तेव्हा तुमच्या परिवाराला या मालमत्ता योग्य रीतीने हाताळता आल्या पाहिजेत. कोणती गुंतवणूक कशी काढावी यासाठी पत्नी किंवा मुलांना सहखातेधारक बनवा म्हणजे त्यांनाही व्यवहार करता येतील.

३. तुमच्यानंतर कोणत्या मालमत्तेचे काय करायचे याचे नियोजन तयार आहे का?
तुमच्या कोणत्या मालमत्ता परिवारातील कोणत्या व्यक्तीला द्यायची आहे आणि त्यामागे असलेली कारणे किंवा तुमच्या इच्छा जेव्हा तुम्ही मृत्यपत्रामध्ये स्पष्ट पाने मांडाल तर त्या योग्य कारणासाठी त्याचा वापर होईल आणि कुटुंबातील नाती कायम राहण्यास मदत होईल.

हे ३ प्रश्न तुम्ही जेव्हा स्वतःला विचाराल तेव्हा तुम्हाला तुमच्या इस्टेट प्लांनिगची गरज आहे की नाही हे लक्षात येईल. इच्छापत्राचे भारतात ६ प्रकार आहेत आणि तेही हिंदू , मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माच्या कायद्यानुसार त्यात बदल होतात.

मालमत्तेचे नियोजन अवघड वाटत असेल तरी योग्य आर्थिक सल्लागार आणि वकील यांच्या माध्यमातून तुम्ही ते वयाच्या कोणत्याही वर्षी करू शकता आणि आपल्या परिवाराला एक सुरक्षा कवच मिळवून देऊ शकता. यासाठी येणार खर्चही नगण्य आहे. तर चला मग स्वतःला वरील ३ प्रश्न विचारून त्याची उत्तरे शोधून आपल्या आर्थिक जीवनाला एका चांगल्या स्तरावर नेऊन ठेऊ.


***************************

तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa

Share This:

प्रतिक्रिया

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...