श्री. महेश चव्हाण
आपण त्या कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करायचा निर्णय घेतला तर सुरुवात होते ती अर्ज प्रक्रियेला. आज डिमॅट अकाउंट, सहजरित्या उपलब्ध असलेले इंटरनेट, ऑनलाईन बँकिंग या त्रिवेणी संगमामुळे IPO साठी अर्ज करणे अगदी सोपे झाले आहे.
IPO साठी अर्ज करतानाच्या महत्वपूर्ण गोष्टी :-
1. IPO फॉर्म :- IPO फॉर्म शेअर ब्रोकर, बँक, न्यूज पेपर स्टॉल या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो आणि ऑनलाईनही डाउनलोड करता येऊ शकतो.
2. IPO ऑफर :- IPO ऑफर ३-५ दिवसांसाठी असते, त्यामध्ये जर चांगला प्रतिसाद कंपनीला मिळाला नाही तर IPO ऑफरचे दिवस वाढवू शकतात
3. IPO ग्रेडिंग :- नवीन गुंतवणूकदाराच्या सुरक्षिततेसाठी सेबीने IPO साठी ग्रेडिंग सिस्टिम आणली आहे त्यामुळे IPO मध्ये गुंतवणूक करताना त्यातील जोखीम लक्षात येते.
4. कमीत कमी ऑफर :- IPO ची कमीत कमी ऑफर ५०००-७००० पर्यंत असते. म्हणजेच एखाद्या कंपनीच्या IPO मध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर कमीत कमी ऑफर इतकी रक्कम तुमच्याकडे असायला हवी.
5. IPO अॅलॉटमेंट :- IPO बंद झाला की सुरुवात होते अॅलॉटमेंट प्रक्रियेला. कंपनी मॅनेजमेंट, रजिस्ट्रार आणि मर्चंट बँकर मिळून अॅलॉटमेंटची प्रक्रिया पूर्ण करतात. एखाद्या कंपनीने १०० कोटींसाठी IPO ऑफर आणली असेल आणि तेवढेच अर्ज आले तर सर्वाना शेअर्स अॅलॉटमेंटची शक्यता असते. पण जेव्हा डिमार्ट च्या IPO सारखी परिस्थिती निर्माण होते तेव्हा सर्व अर्जकर्त्यांचा विचार करून निर्णय घ्यावा लागतो.
6. IPO पेमेंट :-
- ऑफलाईन अर्ज :- IPO साठी अर्ज भरत असाल तर त्याचे पेमेंट तुम्हाला चेक/डिमांड ड्राफ्टनेच द्यावे लागेल. गुंतवणूकदारांनी या चेक/ डिमांड ड्राफ्टची एक कॉपी स्वतःकडे ठेवावी.
- ऑनलाईन अर्ज :- ऑनलाईन फॉर्म डाउनलोड करून आणि इंटरनेट बँकिंगच्या साहाय्याने तुम्ही पेमेंट करू शकता.
- ASBA (Applications Supported by Blocked Amount) अकाउंट :- कंपनीचा जेव्हा IPO येतो तेव्हा पैसे एकत्र करण्यासाठी कंपनी बँक मध्ये ESCROW अकाउंट ओपन करते. डिमॅट अकाउंट मधून डायरेक्ट अर्ज करून तुम्ही ASBA पद्धती द्वारे तुमच्या बँक अकाऊंटला असलेली रक्कम यासाठी वापरू शकता. ती ठराविक काळासाठी ब्लॉक होईल जर तुम्हाला IPO मध्ये शेअर्स अॅलॉट झाले, तरच ती तुमच्या अकाउंट मधून वजा होईल.
वरील गोष्टीची योग्य काळजी घेतलीत तर IPO साठी अर्ज करतानाची प्रक्रिया अगदी सुलभ होऊ शकते. ASBA पद्धत ही सर्वात सोपी आणि सोयीस्कर पद्धत आहे. त्याबद्दल अजून माहिती गूगलवर उपलब्ध आहे किंवा तुमच्या शेअर ब्रोकर किंवा बँकेला ही तुम्ही विचारू शकता.
आज IPO च्या माध्यमातून तुमच्या गुंतवणुकीच्या इंद्रधनुष्यात एक नवीन रंग सामील झाला याचा नक्की फायदा घ्या.
***************************
तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa