सुविचार
तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .
डाउनलोड मोबाईल ॲप
मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
दीर्घकाल मुदतीवर पैसे गुंतंवल्यास त्यातून मिळणारा प्रचंड परतावा कसा असतो ते आपण पाहिले. मात्र जॅकपॉट साठी नुसतेच दीर्घकालीन मुदतीवर पैसे गुंतवणे महत्त्वाचे नाही. त्याचबरोबर कंपनीची निवड सुध्दा महत्त्वाची आहे. वेगाने वाढणाऱ्या कंपन्या कोणत्या? त्याचबरोबर दीर्घकालीन टिकू शकणाऱ्या कंपन्या कोणत्या? कंपन्यामधील विश्वासहर्ता सुध्दा महत्त्वाची आहे. 1990 च्या दशकात सत्यम कंप्यूटर कंपनी तेजीत होती. आज तिचे अस्तित्वच नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार करुन शेअर बाजारात पैसे गुंतवण्याची कला साध्य करता आली पाहिजे. (मी कालपासून दीर्घकालीन मुदतीने पैसे वाढतात हे सांगतोय. म्हणजे इतर ठिकाणी पैसे गुंतवायचे नाहीत का? तिथे कमी परतावा मिळतो का? जास्त परतावा मिळणाऱ्या अल्पकालीन योजना उपलब्ध नाहीतच का? असे अनेक प्रश्न मनात उमटतीलच. या सर्व प्रश्नांची उत्तरे निश्चित मिळतील. सध्या चालू असलेल्या विषयाचा जास्तीत जास्त अभ्यास करुयात.) 1981 मध्ये जेव्हा इन्फोसिस सुरू झाली तेव्हा आपल्यापैकी कोणीही 10000 रुपये लावण्याची Risk जोखीम पत्करली असती का? अर्थातच नाही. कारण इन्फोसिस पुढे किती मोठी होणार हे त्यावेळी कुणालाच माहिती नव्हते. शिवाय इन्फोसिस सुरु झाली तेव्हा हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या लोकांनाच त्या कंपनीविषयी माहिती होते. आज करोडो लोकांना या कंपनीविषयी माहिती आहे. लाखो लोकांकडे या कंपनीचे शेअर सुध्दा आहेत. किंवा उद्या इन्फोसिस एवढी होणारी मोठी कंपनी आज बाल्यावस्थेत असेल ती फार कमी लोकांना माहिती असेल. ती तेवढी मोठी होईल याचा पुसटसा अंदाजसुध्दा ते लावू शकणार नाहीत. याचा अर्थ असा होतो की भविष्यात जाऊन आपल्याला Dots Connect करता येत नाहीत. भूतकाळ व वर्तमानकाळाच्या आधारावरच आपल्याला आपले निर्णय घ्यावे लागतील. योग्य कंपनीच्या निवडीविषयी लिहलेला लेख अर्थात आपण सर्वांनी वाचला असेलच. त्याशिवाय कंपनीचा आलेख कधीकधी उतरता सुध्दा असू शकतो. ज्या कंपनीने दररोज चढता आलेख दाखवला आहे, आजपर्यंत अशी कोणतीही कंपनी नाही. त्यामुळे कंपनीचा उतरता आलेख असताना सुध्दा धीर धरणे गरजेचे आहे. विश्वासहर्ता असणाऱ्या, चिरकाल टिकण्याची क्षमता असणाऱ्या, वाढ दर्शवणाऱ्या, भविष्यात वाढू शकणाऱ्या कंपन्यामध्ये पैसे गुंतवणूक करुन पडत्या काळातसुध्दा कंपनीच्या बरोबर राहून दीर्घकालीन मुदतीवर पैसे गुंतवल्यास अमाप नफा मिळवणे सहज शक्य आहे. *************************** तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा. https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa
तुम्ही अजून शेअर बाजार गुंतवणूकिसाठी तयार आहात का ?
शेअर बाजारात ट्रेडिंग करताय ??? लवकर भानावर या...
शेअर बाजारातून संपत्ती निर्माणात पुस्तकांचे महत्व
खरचं खूप छान
खूपच सुंदर माहिती दिली आहे.....
nice