सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

शेअर बाजारातील गुंतवणूक व त्याबाबत विचारपध्दती कोणतीही गुंतवणूक करण्याआधी त्याचे चार प्रकारचे आयाम जाणून घेणे महत्त्व

17 Nov 2018 By श्री. महेश चव्हाण
539 1 Comments
post-1

श्री. महेश चव्हाण

कोणतीही गुंतवणूक करण्याआधी त्याचे चार प्रकारचे आयाम जाणून घेणे महत्त्वाचे आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करताना प्रत्येक वेळी निर्णय घेण्यासाठी वापरायची एक विचारपध्दती जाणून घेऊ या जेणेकरुन गुंतवणूक करताना आपल्याला आपल्या हाती असलेल्या पैशाचा योग्यवेळी योग्य त्या गरजा पूर्ण करताना उपयोग होईल. 

पैसा व गुंतवणूक यांचे थेट नाते समजून घेतल्यास आपल्या लक्षात काही गोष्टी येतील. आपण जी कोणतीही गुंतवणूक ज्या कोणत्याही उद्देशाने करत असतो तो उद्देश त्या गुंतवणूकीने पूर्ण केला पाहिजे. हा गुंतवणूकीचा सरळ नियम आहे. दरमहा लागणारा घरखर्च, संपत्ती बनवणे, शिक्षण, सुखवस्तू जीवनशैली, चांगली गाडी आणि घर, सहली (जगभ्रमंती-पर्यटन), लग्न, शेती, कंपनी तयार करणे, व्यवसायाला लागणारे भांडवल निर्माण करणे, रिटायरमेन्ट यासारखे कितीतरी उद्देश गुंतवणूकीच्या मागे असू शकतात. 

प्रत्येक प्रकारच्या गुंतवणूकीची निवड करताना तिच्या उद्देशानुसार व हाती शिल्लक असलेल्या वेळेनुसार केली पाहिजे. त्यासाठी आपण आपल्या गुंतवणूकीचे उद्देश ठरवले पाहिजेत. त्याच्या वेळा निश्चित केल्या पाहिजेत. मग नियोजनाचा भाग येतो. त्यानंतर निरंतर कृतीने गुंतवणूकीत यश मिळते. एकदा उद्देश ठरला की त्यासाठी लागणारा कालावधी ठरवला पाहिजे. 

नुकत्याच जन्माला आलेल्या मुलाच्या उच्च शिक्षणाचे नियोजन करताना हे लक्षात घेणे गरजेचे असते की मुलगा/मुलगी उच्च शिक्षण घेण्यासाठी 18 वर्षानी पात्र होईल. जेव्हा तो बारावी पास होईल तेव्हाच त्या पैशाची गरज आहे. त्यानंतरही नाही आणि आधीही नाही. अशा वेळी एसआयपी सारखे काही गुंतवणूकीचे पर्याय वापरले पाहिजेत. काही उद्देशासाठी लागणारा वेळ हा थोडाफार मागेपुढे होऊ शकतो. जसे की लग्न करणे, गाडी घेणे. मात्र काही उद्देश अगदी ठराविक वेळेतच पूर्ण व्हावे लागतात. जसे की शिक्षणासाठी प्रवेश घेणे (जून मध्ये प्रवेश घ्यायची अंतिम तारिख असल्यास सर्वांनाच जून मध्ये प्रवेश घ्यावा लागेल, जुलैमध्ये कोणालाही प्रवेश मिळणार नाही.)

कालावधी निश्चित करण्याच्या हिशोबाने आपण आपल्या गुंतवणूकीच्या उद्देशाची तीन टप्प्यात विभागणी करु या. 

1. तीन वर्षे (Short-Term Goal for Investment)
या प्रकारात आतापासून येणाऱ्या तीन वर्षामध्ये आपल्याला पूर्ण करायच्या असलेल्या गोष्टींचा समावेश करावा लागेल. याची एक यादी बनवून घेणे महत्त्वाचे आहे. यादीतील प्रत्येक उद्देशासमोर लागणारा कालावधी नमूद करावा. जेणेकरुन त्याची क्रमवारी लावणे अधिक सोपे होते.
 
2. तीन ते दहा वर्षे (Mid-Term Goal for Investment)
या प्रकारात तीन वर्षानंतर साधारण दहा वर्षापर्यंत पूर्ण करायची असलेली ध्येये समाविष्ट करावीत. त्याची यादी बनवून प्रत्येक ध्येयासमोर लागणारा कालावधी नमूद करावा.

3. दहा वर्षापेक्षा जास्त (Long-Term Goal for Investment)
यामध्ये दहावर्षानंतर येणाऱ्या काळात पूर्ण करण्याची सर्व कामे लिहून काढावीत. याची सुध्दा कालावधी नमूद केलेली यादी करणे गरजेचे आहे. 

उद्देशाची विभागणी केलेले एक उदाहरण पाहू या. 

1. नाव – श्री. सुरेश ,  वय – 24 वर्षे

*********उद्देश********  ------------- लागणारा कालावधी---------------


Short-Term Goals

सॉफ्टवेअर कंपनी चालू करणे ----------- 6 महिने ------- 24 वर्षे (सप्टेंबर 2017)
लग्न करणे -------------------------- दीड वर्ष ------ 26 वर्षे (सप्टेंबर 2018)
1 बीएचके फ्लॅट घेणे ----------------- दोन वर्षे ------- 26 वर्षे (मार्च 2019)

Mid-Term Goals

सॉफ्टवेअर कंपनी वाढवणे --------------- पाच वर्षे --------- 29 वर्षे (एप्रिल 2022)
मुलांचे प्राथमिक शिक्षण -------------- पाच-दहा वर्षे –---- 29-34 वर्षे (2022-2027)
जगपर्यटन (world tour) ------------- सात वर्षे -------- 31 वर्षे (डिसेंबर 2024)

Long-Term Goals

मुलांचे माध्यमिक / उच्च शिक्षण ---------- अकरा-चोवीस वर्षे ------ 35-48 वर्षे (2028-2041)
5 एकर शेती घेणे -------------------- अकरा वर्षे --------- 35 वर्षे (एप्रिल 2028)
रिटायरमेन्ट ----------------------- सव्वीस वर्षे ------- 50 वर्षे (जुलै 2043)

एकदा कालावधी व उद्देश निश्चित केले की त्या-त्या उद्देशाला पूर्ण करण्यासाठी आपल्याला हवी असणारी रक्कम किती याचे गणित करावे लागते. त्यानुसार आपल्याला कराव्या लागणाऱ्या गुंतवणूकीचे मार्ग निवडणे गरजे असते. याविषयी येत्या दोन दिवसात जाणून घेऊ या. तो पर्यंत आपले उद्देश कालावधीनुसार लिहून काढूयात. शुभेच्छा!


***************************

तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa

Share This:

प्रतिक्रिया

योगेश प्रभाकर on 12 Apr 2020 , 11:49PM

खूपच सुंदर माहिती दिली आहे.....

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...