श्री. महेश चव्हाण
खूपवेळा एखाद्या फॅमिली ला जेव्हा हेल्थ इन्शुरन्स काढा त्याचे महत्व पटवून सांगितले तरी फॅमिली ला ती नासाडी वाटते. १५-२०००० प्रिमियम त्यावर परिवाराच्या सदस्य संख्येवर ५-१० लाखाचा हेल्थ इन्शुरन्स मिळत असला तरी लोकांचे म्हणणे असते कि “काय उपयोग आम्हाला काही झाले तरच बेनेफीट मिळणार” आणि या वरवरच्या विचारा मुळे खुपजण हेल्थ इन्शुरन्स घेण्याचे टाळतात किंवा पुढे ढकलतात.
हेल्थ इन्शुरन्स चे काम हेल्मेट – पॅराशूट सारखे असते.
ज्याप्रमाणे १०००-१५०० चे हेल्मेट अपघाताच्या वेळी करोडो रुपयाचे कार्य करते. ज्याप्रमाणे ३०-५०००० चे पॅराशूट अपघाताच्या क्षणी मोलाचे कार्य करते.
त्याप्रमाणेच हेल्थ इन्शुरन्स तुमच्या मेडिकल इमर्जन्सी च्या वेळी त्याच्या कव्हर च्या माध्यमातून मेडिकल खर्चाची सारा भार उचलतो.
आज एखाद्या परिवाराने २०००० रुपयाचा इन्शुरन्स ३० वर्षे जरी भरला तरी त्या परिवाराचे ३० वर्ष्यात ६ लाख रुपये जातील पण या ३० वर्ष्यात एकदा तरी मेडिकल इमर्जन्सी या परिवारावर आली तर ५-१० लाखाचा कव्हर या परिवाराला मिळेल.
वर्ष्याला २०००० म्हणजे महिन्याला १७०० रुपये जे उभे करणे सहज शक्य आहे पण तेच जेव्हा एखादया परिवाराला एकाचवेळी ४-५ लाख रुपये मेडिकल इमर्जन्सी उभा करायची वेळ येते तेव्हा आधी केलेल्या गुंतवणूक मोडव्या लागतात, मित्र-परिवारा कडे मदत मागावी लागते. घरातील सोने गहाण ठेऊन पैसे काढावे लागतात. म्हणजेच काय २०००० रुपये विम्यासाठी जाणार होते ते उभा केलेल्या पैश्याचे देणे देन किंवा त्यावरील व्याजासाठी जातात.
गरीब आणि मध्यमवर्गीय आयुष्यभर पैश्याअभावी तारेवरची कसरत करत असतात त्यातील एक मुख्य कारण म्हणजे पुरेसा मेडिकल इन्शुरन्स नसणे. खोटे वाटत असेल तर आठवा आपल्या आजूबाजूला २-३ तरी परिवार दिसतील की ज्यांना मेडिकल इमर्जन्सी मुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत केले.
लक्षात घ्या तयारीने जितके आर्थिक जीवनाला सामोरे जाल तितके सक्षमरित्या येणाऱ्या परिस्थितीचा सामना कराल नाहीतर संघर्ष करत रहा वर्षोनुवर्षे.
***************************
तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे “मराठी पैसा – ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा” हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.