लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने….सरस्वतीच्या साथीने आपल्या लक्ष्मीचे विष्णू नारायण होऊया

श्री. महेश चव्हाण

आपल्या हिंदू धर्मात लक्ष्मी ही संपत्तीची देवता मानली जाते पण भारतात कुठेही “फक्त लक्ष्मी” चे मंदिर नाही… जिथे जिथे लक्ष्मी चे मंदिर आहे तिथे लक्ष्मीच्या सोबत सरस्वती, दुर्गा , नारायण, कुठे गणेश तर कुठे नंदी लक्ष्मी च्या सोबत आहे. यातून आपली संस्कृती आपल्याला काहीतरी सांगतेय लक्ष्मी च्या सोबत हे इतर देव देविता तिच्या रक्षणासाठी तिच्या सोबत आहेत.- देवदत्त पटनायक (हिंदू संस्कृती अभ्यासक)

पटनायक यांनी दिलेली माहिती फक ऐकण्यासाठी नाही तर विचार करण्यासारखी आहे. आज लक्ष्मी पूजना निमित्ताने आपण प्रत्येकाने आपल्या संपत्तीच्या रक्षणासाठी आणि तिच्या विकासासाठी आर्थिक साक्षरतेच्या सरस्वती साथीने तिचा विष्णू नारायण होऊन सांभाळ करणे गरजेचे आहे.

वर्ष्यातील ३६५ दिवस पैसा कमावण्यासाठी प्रचंड मेहनत करतो आणि त्याच पद्धतीने निष्काळजीपणाने खर्च करतो. त्यामुळे वर्ष्यातुन एकदा येणारे लक्ष्मी पूजन म्हणजे फक्त या मुहूर्तावर आपल्याकडे असलेल्या संपत्तीचे पूजन करणे न्हवे तर आपल्या कडे असलेली संपत्ती (लक्ष्मी) आपल्याकडे कशी आनंदाने नांदेल यासाठी आर्थिक शिक्षण (सरस्वती) अंगिकारून आपल्या संपत्तीचा (लक्ष्मीचा) विष्णू नारायण बनण्याचा संकल्प करणे… म्हणजे खरे लक्ष्मी पूजन.

यासाठी स्वतःला काही प्रश्न विचारण्यापासून सुरुवात केली तर यावर्षी नाही पण पुढच्या लक्ष्मी पूजनापर्यन्त आपली संपत्ती काही प्रमाणात सुरक्षित होईल आणि काही प्रमाणात तिच्यात विकास ही होईल…. यासाठी

१) मी आज कुठे आहे ? माझी सर्व कर्जे माझ्या संपत्ती तुन वजा केल्यास माझी संपत्ती नक्की किती आहे ?

२) माझा महिन्याचा फिक्स खर्च किती आहे ? घरातील मुलांच्या शिक्षणासाठी आई वडिलांच्या औषध पाण्याचा खर्च याचा ताळेबंद माझ्याकडे आहे का ?

३) माझी कमाई बंद झाली तर किती महिने मी बिना कमाई घर खर्च आणि व्यवसाय असल्यास व्यवसायाचा खर्च मी मॅनेज करू शकतो  ?

४) माझ्याकडे ३-६-१२ महिन्याचा घर खर्चाचा किंवा व्यवसाय खर्चाचा फंड कसा उभा राहील ?

५) घरातील कर्ता कमावता पुरुष मी आहे, मला काही बरे वाईट झाले तर माझा परिवार आई वडील आर्थिक अडचणीत येणार नाहीत यासाठी १-२ करोड ( वार्षिक खर्च + कर्जे + मुलांची शिक्षणे ) ज्यातून सर्व गरजा भागातील तो मी काढलेला आहे का ?

६) घरातील एखादा व्यक्ती आजारी पडला तर त्याच्या दवाखाण्यासाठी माझ्याकडे योग्य आणि पुरेसा हेल्थ इन्शुरन्स आहे का ?

७) स्वतःच्या कमाईतील १०% स्वतःच्या रिटायरमेंट साठी मी म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करत आहे का ?

८) स्वतःच्या आर्थिक कुवतीप्रमाणे मुलांच्या शिक्षणासाठी ठराविक रक्कम मी बाजूला करतोय का ?

९) शेअर बाजार बद्दल शिक्षण घेऊन त्यातील वॉरेन बफ्फेट सरांनी सांगितल्या प्रमाणे रोज वापरातील ब्रँडेड  कंपन्या च्या शेअर्स मध्ये थोडी फार का होईना गुंतवणूक करतोय का ?

१०) वर्ष्याला येणारे उत्पन्नावर भरावा लागणारा टॅक्स वाचवण्यासाठी एप्रिल पासूनच तयारी करतो का ?

११) कोणतीही गोष्ट खरेदी करताना ती माझी गरज आहे की ईच्छा याचा मी विचार करतो का ?

१२) माझ्या सर्व गुंतवणूक, इन्शुरन्स, घरातील महत्वाची कागदपत्रे, महत्वाचे पासवर्ड याची माहितीचे संकलन केले आहे का ? त्याच बरोबर ही सर्व माहिती परिवाराच्या सोबत शेअर केली आहे का ?

आजच्या लक्ष्मी पूजनाच्या वर्षी मी माझ्या आर्थिक जीवनात कुठे आहे पुढील १-२-३ वर्ष्यात कुठे जाणार आहे याचा आज संकल्प करून आज लक्ष्मी पूजन केले की तुम्हाला स्वतालाच एक आत्मविश्वास येईल. लक्षात घ्या तुम्ही आर्थिकदृष्ट्या कुठेही असा पण संकल्प केला, ठाम निर्धार केला आणि सुरवात केली तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. यात ही प्रचंड अडचणी येतील पण त्यातूनही मार्ग निघेल कारण ध्येय आपले पुढील लक्ष्मी पूजन आहे.

***************************

तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे “मराठी पैसा – ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा” हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa

शेअर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

तुमच्यासाठी सुचवलेले