श्री. महेश चव्हाण
प्रत्येक क्षणी आपल्या परिवाराची काळजी घेणारे आपण महत्वाचे Insurances म्हणजेच टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स काढण्यासाठी टाळाटाळ करत असतो.
- अमेझॉन फ्लिपकार्ट च्या सेल वर १०-२०००० ची खरेदी करणारे आपण…
- दरवर्षी २०-२५००० चा मोबाईल घेणारे आपण…
- फॅमिली ट्रिप वर ५०-६०००० खर्च करणारे आपण…
15-30000 चा टर्म किंवा हेल्थ इन्शुरन्स घेण्यासाठी…
- पुढील आठवड्यात करू…
- पुढील महिन्यात करू…
असे म्हणून स्वतःच्या परिवाराला भगवान भरोसे ठेवत असतो आणि मग जेव्हा हॉस्पिटल ची पायरी चढायची वेळ येते तेव्हा बिल किती होईल आणि पैसे कुठून उभे करायचे याचा विचार करून डोके फिरायची वेळ येते.
टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स हे कुटुंबाचे असे सुरक्षा कवच आहे जे तुम्ही ह्यात असताना आणि तुम्ही नसताना ही परिवाराची काळजी घेते. जेणेकरून तुमच्या परिवाराला त्यांच्या आर्थिक गरजा साठी कुणापुढे हात पसरावा लागणार नाही.