शेअर बाजार गुंतवणूक : एक बिजनेस पार्टनरशिप

शेअर बाजार गुंतवणूक (ट्रेडिंग नाही) म्हणजे तुम्ही गुंतवणूक केलेल्या प्रमाणात तुम्ही त्या कंपनीचे पार्टनर असता. शेअर बाजार तुम्हाला संधी देते भारतातल्या अग्रगण्य कंपन्या मध्ये गुंतवणूक करून पार्टनर होण्याची. ज्या कंपन्याचे प्रॉडक्ट सर्विसेस आपण लहान पणापासून म्हणजे गेले १०-१५-२०-२५ वर्षे वापरतोय ज्यांच्या शिवाय आपले जगणे मुश्किल होऊ शकते अश्या कंपन्या चे पार्टनर आपण होऊ शकतो. जसे की…

  • कोलगेट
  • एशियन पेंट्स
  • फेविकॉल (पीडिलाईट)
  • मारुती सुझुकी
  • हिरो मोटोकॉर्प
  • हिंदुस्तान युनीलिव्हर
  • आय टी सी
  • ब्रिटनिया
  • गोदरेज
  • HDFC बँक
  • बजाज फायनान्स

वरील कंपन्या पैकी ७०% कंपन्याचे प्रॉडक्ट्स किंवा सर्विसेस आपण घेतल्या आहेत पण यांच्यात गुंतवणूक करण्याची कधी इच्छा झाली नाही किंवा शेअर्स घेऊन ५० – १०० रुपयांचा नफा पदरात पाडून आपण शेअर्स विकून टाकला असेल होना ?? त्या पैश्याचे काय केले आपण कोणत्या तरी दुसऱ्या शेअर्स मध्ये टाकले असतील किंवा त्या नफ्यातून स्वतः साठी एखादी वस्तू घेतली असेल पण आज तेच जर १-२ लाख  गुंतवणूक करून तसेच ठेवले असते तर आज १० वर्ष्यात त्याचे ५ पट – १० पट झाले असते. 

मागच्या आठवड्यात आलेल्या झोमॅटो शेअर्स ने ही हीच संधी दिली तुमच्या माझ्या सारख्या सामन्यांना पण होते काय आपण फक्त शेअर्सची किंमत पाहत राहतो आणि पुढील आयुष्यभर चालणारा व्यवसायाची पार्टनरशिप १०००० – २०००० नफा खिश्यात टाकून विकून टाकतो.

लक्षात घ्या १० वर्ष्यापूर्वी १०० – २०० करोड मध्ये सुरू झालेली झोमॅटो आज ६०००० करोड वर पोहचते. त्यात फूड डिलिव्हरी बिजनेस आताशी ७% भारतात पसरलेला आहे. अजून १० वर्ष्यात हा व्यवसाय किती मोठा होईल याचा जर अभ्यास केला आणि या व्यवसायात जर पार्टनरशिप केली तर आपण ही आपल्या हजारोचे लाख आणि लाखाचे करोड करू शकतो.

शेअर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

तुमच्यासाठी सुचवलेले