श्री. महेश चव्हाण
शेअर बाजार एकरी उत्पन्न देणारे साधन नाही हे ज्याला कळते तोच यातून संपत्ती उभा करू शकतो. नाहीतर एखाद्या वर्षी कमी रिटर्न्स मिळाले की गुंतवणूकदार सल्लागाराची ऐशी-तैशी करतात त्यांच्या साठी खासकरून.
प्रिय गुंतवणूकदारानो,
हा चार्ट नीट समजून घ्या… गेल्या वर्ष्यात म्युचुअल फंड आणि शेअर बाजारात तुफान रिटर्न्स मिळालेले आहेत. असेच उतार चढाव करत शेअर बाजारात रिटर्न्स मिळतात आणि सरतेशेवटी तुम्हाला १२% – १५% टक्के चा सरासरी रिटर्न्स जर मिळाले तरी तुम्ही खूप छान प्रकारे संपत्ती निर्माण करता. शेअर बाजार FD सारखे दरवर्षी रिटर्न्स देत नाही हे लक्षात घ्या.
शेअर बाजारात आता तेजी आहे पण उतरण लागली तर सीट बेल्ट बांधून बसा नाहीतर तुमचा कार्यक्रम ठरलाच आहे. अति नफा होण्याच्या नादात सगळे पैसे बाजारात लावायचे आणि नुकसान पदरात पडल्यावर शेअर बाजाराला नावे ठेवायची.
टीप : पुढील १० वर्षे अभ्यासपूर्वक गुंतवणूक करून वाट पहायची ज्यांची तयारी आहे त्यांच्यासाठी संपत्ती निर्माण करण्याची संधी आहे तर फक्त तेजीत हात धुवून घ्यायला आलेल्या नी रोज सकाळी SGX निफ्टी किती ? दुपारी जपान चे मार्केट काय ? संध्याकाळी न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज ? किती पण पहा… मार्केट आहे नाही ते सर्व घेऊन जाते हा इतिहास आहे.
म्हणूनच शेअर बाजाराबद्दल योग्य अपेक्षा ठेवा ज्या वास्तवाला धरून असतील.