एप्रिल २००८ मध्ये सिद्धिविनायक इन्व्हेस्टमेन्ट्स च्या नावाने शेअर ब्रोकर म्हणून सुरू झालेला प्रवास हळुहळू मुच्यअल फंड, जीवन विमा, त्यानंतर आर्थिक नियोजन या क्षेत्रांत i4investments Wealth Management च्या माध्यमातून या दोन्ही कंपन्या च्या १२०० ग्राहकासोबत काम करताना एक बाब लक्षात आली की आपला मराठी माणूस रणांगणात रिस्क घेण्यासाठी तयार असतो पण गुंतवणुकीच्या बाबतीत अजूनही मुदत ठेव, विमा पॉलिसी, मासिक ठेवी, पोस्ट, सोने, यातच अडकून पडला आहे. "शेअर बाजार जुगार" नाही तर २१ व्या शतकातील गुंतवणुकीची संधी आहे, ही मानसिकता तयार होणे गरजेचे आहे हे लक्षात आले. यासाठी २०१३ पासून महाराष्ट्रात...मुंबई, पुणे, नाशिक,सांगली त्याचबरोबर कर्नाटक आणि तामिळनाडू इथे वेगवेगळ्या ठिकाणी कार्यशाळा घेतल्या.....त्याला मिळणारा प्रतिसाद आणि कार्यशाळा झाल्यावर सहभागी झालेल्या गुंतवणूकदारांच्या प्रतीक्रिया त्यामुळे काम करण्यास हुरूप आला. हे करताना लक्षात आले कि महाराष्ट्रात आर्थिक शिक्षणाचे कार्य खूप मोठे आहे आणि आपल्याला काही मर्यादा आहेत. त्यानंतर "नवी अर्थक्रांती" च्या माध्यमातून अर्थविषयक लेख लिहायला सुरुवात केली....