सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

म्युचुअल फंडाचे युनिट आणि करदेयता म्युचुअल फंड युनिट हे आपल्या मालमत्तेचा भाग असून त्याची विक्री अथवा वि

12 Mar 2019 By
386 1 Comments
post-1

म्युचुअलफंड युनिट हे आपल्या मालमत्तेचा भाग असून त्याची विक्री अथवा विमोचनातून अल्प किंवा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा/ तोटा होतो. हे युनिट प्रामुख्याने कोणती मालमत्ता ( शेअर्स / बॉण्ड/ कमोडिटी) किती काळ धारण करतात यावरून त्याची करदेयता ठरते. या युनिट्सचे त्यांनी जास्त प्रमाणात धारण केलेल्या मालमत्तेवरून दोन प्रकार पडतात...

1.समभागावर आधारित योजना (equity mutual funds) : 

ज्या योजनेत 65% किंवा त्याहून अधिक समभाग गुंतवणूक आहे. अशा सर्व योजना यात येतात जसे लार्ज / मिड /स्मॉलकॅप/डायव्हर्सिफाईड इक्विटी फंड ,सेक्टरल फंड, इक्विटी बॅलन्स फंड ई.

2.समभागरहित अथवा डेट योजना (non equity mutual funds) : 

यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक ही कर्जरोख्यात असते. उदा. लिक्विड फंड, मनी मार्केट फंड, गोल्ड फंड, इन्फ्रास्ट्रक्चर डेट फंड, डेट ओरिएंटेड बॅलन्स फंड ई. समभागावर आधारित फंड योजनेचे आणि गोल्ड ई टी एफ चे युनिट एक वर्षाच्या आत विकल्यास त्यातून अल्पमुदतीचा भांडवली फायदा / तोटा होतो. यातील फायद्यावर सरसकट 15 % कर द्यावा लागतो. तर याहून अधिक कालावधीनंतर झालेल्या भांडवली नफा / तोट्यातील एक लाखाहून अधिक निव्वळ नफ्यावर 10% कर द्यावा लागतो. यास चलनवाढीमुळे (inflation) पडणाऱ्या फरकाचा फायदा मिळत नाही. 31 मार्च 2018 पर्यंत दीर्घकालीन भांडवली नफा करमुक्त होता. 

या आर्थिक वर्षांपासून त्यावर काही अटींसह कर बसवण्यात आला आहे. यानुसार गुंतवणूकदारांना 31 जानेवारीपर्यंत होऊ शकणाऱ्या दीर्घमुदतीच्या नफ्यास करमाफी देण्यात आलेली आहे तर तोट्यास कोणतीही सूट मिळणार नाही. अशा व्यवहारात होणाऱ्या तोट्यास चालू आर्थिक वर्ष पकडून पुढील सात वर्षे भविष्यातील नफ्यासोबत समायोजित करता येईल. समभागविरहित अथवा डेट फंडातील युनिट तीन वर्षांच्या आत विकल्यास अल्प मुदतीचा भांडवली नफा / तोटा होतो तो व्यक्तीच्या नियमित उत्पन्नात मिळवून त्यावर नियमानुसार कर भरावा लागतो. तीन वर्षांनंतर विकलेल्या युनिट पासून होणारा नफा / तोटा हा दिर्घमुदतीचा समजण्यात येऊन यातील नफ्यावर 20% कर द्यावा लागतो. यातील नफ्याची मोजणी करताना चलनवाढीचा लाभ  घेता येतो.तोटा पुढील 7 वर्षात ओढता येतो. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून (central board of direct taxes) दरवर्षीचा चलनवाढ निर्देशांक जाहीर केला जातो. विक्री केलेल्या वर्षाच्या निर्देशांकास खरेदी वर्षाच्या निर्देशांकास भागून येणाऱ्या संख्येस खरेदी किमतीने गुणावे. ही आलेली किंमत ही चलनवाढीचा फायदा घेऊन आलेली खरेदी किंमत मानल्याने वाढलेल्या खरेदी किंमतीमुळे एकूण कर कमी द्यावा लागतो.
    
 डेट फंडाच्या युनिटमधून आपल्यास डिव्हिडंड रूपाने उत्पन्न मिळत असेल तर त्यावर फंड हाऊस कडून मुळातून करकपात होऊन मिळतो. या वर्षांपासून इक्विटी म्युचुअल फंडाचे डिव्हिडंडवर नव्यानेच 10% कर अधिक सरचार्ज लावलेला आहे आणि डेट फंडाच्याप्रमाणे फंड हाऊस कडून हा कर मुळातून कापूनच मिळत असल्याने गुंतवणूकदारास यामार्गे मिळणारे हे उत्पन्न पूर्णपणे करमुक्त आहे.

©उदय पिंगळे

Share This:
Tags :

प्रतिक्रिया

Nilesh on 12 Mar 2019 , 9:20AM

सहज सोप्या भाषेतील लेख

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...