सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

तीन महत्वाची गुंतवणूक साधने.......... या पूर्वीच्या लेखातून आपण बचत आणि गुंतवणूक यामधील फरक समजवून घेतला.

31 Mar 2019 By
1234 6 Comments
post-1

या पूर्वीच्या लेखातून आपण बचत आणि गुंतवणूक यामधील फरक समजवून घेतला. गुंतवणूक ही विविध साधनांमधे विभागून करायची असते हेही आपणास माहीत झाले आहे. समभाग ,म्यूचुअल फंडाचे यूनिट्स ,वायदेबाजार ,स्थावर मालमत्ता ,शुध्द स्वरूपातील सोने,चांदी ,धातू अथवा ई टी एफ स्वरूपातील सोने वैयक्तिक जोखिम विमा ,अपघात विमा ,आरोग्य विमा ,गृह कर्ज विमा ,मालमत्ता विमा इ. या प्रकारांमध्ये आपल्या गुंतवणूकीची विभागणी करायची असते हे आपणास माहीत आहेच. यातील विविध विमा योजना या जोखमीपासून संरक्षण देतात आणि त्यामुळे आत्मिक समाधान मिळते आणि काही अंशी संकटसमयी आर्थिक स्वरूपात भरपाई मिळते त्यामुळे संकटात लढण्यास बळ मिळते. समभाग म्यूचुयल फंड यूनिट्स यातून दीर्घकाळात चलनवाढीवर मात करणारा परतावा मिळू शकत असल्याने आपल्या ध्येयपूर्तीसाठी त्यांचा उपयोग होतो.  तर वायदे व्यवहारातून जोखिम कमी होऊन भावातील फरकाचा फायदा घेता येऊ शकतो. यातून मिळणारे उत्पन्न अनिश्चित असल्याने त्याचप्रमाणे मूद्दल गमावण्याचा धोका असल्याने गुंतवणूक कोणत्या साधनांत करावी असा प्रश्न पडू शकतो, म्हणून आपली कमाल गुंतवणूक किमान खालील तीन ठिकाणी असावी असे वाटते.
 
     1) मुदत विमा : (Turm insurance )अतिशय कमी रक्कम भरून सदर विमा आपणास खूप मोठे संरक्षण पूरवतो. हा विमा जास्तीत जास्त रकमेचा ,दीर्घ मुदतीचा आणि लवकरात लवकर घेतल्यास अतिशय कमी हप्ता भरून मिळतो. म्हणूनच नोकरी उद्योग सुरू करताना ताबडतोब घ्यावा.विमा व्यवसायातील स्पर्धेमुळेआणि  जर तो अभिकर्त्याशिवाय घेतला तो आणखीनच स्वस्त पडतो. याविषयी आणि विविध कंपन्यांची मुदत व हप्ता यांची सविस्तर माहिती प्रत्येक कम्पनी  तसेच www.policybazar.com या  संकेतस्थळावर उपलब्ध आहे. साधारणपणे वय 25 वर्ष असताना 1कोटी रुपयांचा 45 वर्षे मुदतीचा विमा वार्षिक 6 हजार रुपयाचे आसपास एवढ्या अल्प रकमेत मिळतो. आपल्या वार्षिक उत्पनाच्या 20 पट रकमेचा मुदत विमा घ्यावा. जर आपले वार्षिक 5 लाख असल्यास 1 कोटीचा विमा घ्यावा. त्याचप्रमाणे उत्पन्नात वेळोवेळी होणाऱ्या वाढीप्रमाणे दर 5वर्षानी अधिक रकमेचा विमा धेवून हे प्रमाण कायम राखावे. त्यामूळे कमावत्या व्यक्तीचे दुर्दैवाने निधन झाल्यास त्यावर अवलंबीत व्यक्तींची आर्थिक ओढाताण होत नाही.
 
     2)आरोग्यविमा : (Medi claim )आजकाल अनेक संस्था त्यांचा कामगारांना आरोग्यसेवा किंवा विमा देतात परंतु नोकरीतील बदलामुळे खंडित होणारी सुविधा आणि सातत्याने ,झपाट्याने आरोग्यसेवेतील खर्चात होणारी वाढ ही आकस्मिक संकटाची नांदी ठरते आणि एका झटक्यात आपल्या आयुष्यभराच्या कमाईचा नाश करते यासाठी प्रत्येकाने आपल्या वार्षिक उत्पन्नच्या दुप्पट रकमेचा आरोग्यविमा घ्यावा. जर वार्षिक उत्पन्न 5 लाख असेल तर 10 लाख रूपयाचा आरोग्यविमा घ्यावा.वर दिलेल्या संकेतस्थळावर याचे विविध कम्पन्याचे हप्ते समजतील. हे हप्ते वयानुसार बदलतात आणि त्यात सातत्याने वाढ होत असते. सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी नॅशनल इन्शुरेन्स कम्पनीचे सहाय्याने कुटुंब गट आरोग्यविमा देऊ केला आहे. त्यांचा 5 लाख रुपयाच्या आरोग्यविमा हप्ता ₹7240/- एवढा आहे.
 
   मुदत विमा(turm insurance )व आरोग्य विमा (mediclaim ) असणे ही काळाची गरज असून यांवर होणारा  खर्च फुकट जाणे म्हणजे सर्व काही ठीक असणे असा होतो. तेव्हा यात असे  नुकसान होणे हाच आपला मोठा फायदा असे समजले पाहिजे.
 
    3)म्यूचुअल फंडाचे एस आई  पी :आपली दीर्घ मुदतीची धेय्ये ही 10 किंवा त्यापेक्षा जास्त मुदतीसाठी  केलेल्या गुंतवणूकीतून पूर्ण होऊ शकतात आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या 30% भाग हा विभागून किमान 2 SIPमधे टाकावा.यातील एक एस आई  पी  हे केवळ सेवानिवृत्ती करीता रक्कम जमा करेल तर दूसरे आपले अन्य लक्ष पूर्ण करायचा प्रयत्न करेल. हे दूसरे लक्ष प्रत्येक व्यक्तींसापेक्ष मुलांचे शिक्षण ,लग्न ,घरखरेदी ,पर्यटन इ. कोणतेही असू शकते. म्यूचुअल  फंडात दीर्घकाळ केलेल्या गुंतवणूकीतून 12 ते 15% नफा होऊ शकतो. तेव्हा आपल्या गुंतवणूकीचा  आढावा धेवून त्याप्रमाणे माहिती मिळवून आपल्या गुंतवणूकीचे साधनांची सुयोग्य विभागणी करावी. योग्य चर्चेचे स्वागत आणि शुभेच्छा...
 

Share This:
Tags :

प्रतिक्रिया

pradedp on 09 May 2021 , 11:07PM

mahiti purn dya

Abhijit Patil on 16 Apr 2020 , 2:06AM

सर आपण दिलेली माहिती खूपच महत्वाचे आहे. पण सर मी ऐकलंय की, टर्म इन्शुरन्स काढतांना जर तुमचे वार्षिक इनकम 10 लाखाच्या आत असेल तर तुम्ही पदवीधर असणे आवश्यक आहे. आणि जर 10 लाखाच्या वर वार्षिक इनकम असेल तर कोणतीही शैक्षणिक अहर्ता असणे आवश्यक नाही आहे

Mohan on 22 Dec 2019 , 10:38AM

sir, your advice regarding the best investment is superb.

Mahesh Chavan on 01 Apr 2019 , 1:06PM

नाही...फक्त तुमच्या परिवाराला सर्व माहिती असायला हवी....खूपवेळा ऑनलाईन पॉलिसी काढली कि त्याबद्दल माहिती फक्त पॉलिसी धारकलाच माहिती असते....आणि अनपेक्षित घटना घडल्यास क्लेम करायला कोणीही नसते.

sangram shinde on 31 Mar 2019 , 12:23PM

please replay

sangram shinde on 31 Mar 2019 , 12:22PM

policybazar var aapn je online policy buy karto tyat kahi problem ahe ka ..?

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...