सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आर्थिक व वैचारिक मागास कुटुंबांची लक्षणे (भाग १/२/३/४) मनुष्य हा स्वत:च्या विचाराने निर्माण झालेला प्राणी आहे. विचार बदला मग

12 Jun 2019 By
1477 5 Comments
post-1

मनुष्य हा स्वत:च्या विचाराने निर्माण झालेला प्राणी आहे. विचार बदला मग परिस्थिती बदलेल. आपले विचारच जर मागासलेले असतील तर ते कुटुंबातील लहान सहान वर्तनातून दिसून येईल. एखादा दुसरा मुद्दा जर लागू असेल तर काळजी करू नका. परंतु बहुसंख्य मुद्दे जर लागू असेल तर काळजी करू नका. परंतु बहुसंख्य मुद्दे जर लागू पडत असतील खरच विचार करण्याची वेळ आलेली आहे. हा लेख मी चार भागात देत आहे.

१) तीन जिल्हयाबाहेर नातेवाईक नसणे : बर्‍याच लोकांना त्यांचा गाव सोडवत नाही. नोकरी धंद्यासाठी फार फार तर मुंबईला जातात. त्यामुळे त्याचे जीवन गाव आणि मुंबई या दोन ठिकाणां पुरतेच मर्यादित असते. कारण त्यांचे नातेवाईकही या ठिकाणीच असतात. त्यामुळे नेटवर्क विकसित होत नाही. मोठ्या संधी मिळवण्यासाठी इतर ठिकाणी नातेवाईक असणे आवश्यक आहे. 

२) जवळच्या नात्यात विवाह करणे : अशा लोकांची विवाहविषयक संकल्पना देखील संकुचित असते. ते आपल्या मुलांचे विवाह जवळ नात्यांत करतात. त्यामुळे त्यांचे खाजगी आयुष्य एका चौकटीत अडकलेले असते. 

३) महिलांचे शिक्षण पुरुषांच्या तुलनेत कमी असणे : अशा कुटुंबामध्ये महिलांचे शिक्षणास कमी महत्व दिले जाते. ज्या घरातील किंवा समाजातील महिला सुशिक्षित त्यांचा परिपूर्ण विकास होतो. अशा घरातील महिला सर्रास अंधश्रध्देत अडकलेल्या असतात. त्यामुळे त्यांचा विकासदर खूप कमी असतो. 

४) मुलांचे विवाह २१ वर्षाअगोदर होणे : अशी कुटुंबे आपल्या मुलांचे विवाह २१ वर्षाच्या आतच करतात. शिकण्याच्या वयात लग्न बंधनात अडकल्यामुळे त्यांचे शैक्षणिक, व्यवहारीक विकास होण्याचे मार्ग बंद असतात.

५) प्रचारसभा आंदोलनात कुटुंबातील सभासदांनी जाणे: सभा, आंदोलन कुठेही असो, कुटुंबातील सभासद आपला कामधंदा सोडून जातात.

६) लग्नपत्रिकेत मोठी व खूप नावे असणे : यांच्या लग्नपत्रिका पाहिल्यास खूप नावे दिसतात फक्त मानपान म्हणून. एखाद्याचे चुकून नाव राहिल्यास भांडणेदेखील होतात. हे वैचारिक दारिद्र्याचे लक्षण आहे. महत्वाच्या गोष्टीपेक्षा फालतू गोष्टींना अधिक महत्व दिले जाते.

७) भाऊ बंधकीत सतत वाद व तंटा असणे : कुटुंबातील सदस्यांमध्ये लहान सहान गोष्टीवरून वाद व भांडणे होत असल्याने अशा कुटुंबामध्ये कधीच एकमत नसते. चांगल्या गोष्टींसाठीही विरोध केल्याने आर्थिक प्रगती खुंटते.

८) नोकरदार हा त्या समाजात आदर्श असतो: कुणाला जर चांगली नोकरी लागली तर त्याचे कौतुक होते. इतरही त्याचा आदर्श घेवून चांगल्या नोकरीसाठी प्रयत्न करतात त्यामुळे व्यवसाय करण्यास त्यांच्यामध्ये संकुचित दृष्टीकोण व गैरसमज असतात त्यामुळे हे कायमच स्वत: दुसर्‍याची गुलामी करण्यास नोकरी करणे समजतात. 

९) सर्वाधिक बचत फिक्सडीपॉझिटमध्ये असणे : बरीच कुटुंबे बचतीचा सुरक्षित मार्ग म्हणून फिक्स डीपॉझिटचा पर्याय स्वीकारतात त्यामुळे इतर पर्यायाची माहिती नसते. उदा. शेअर मार्केट स्थावर मालमत्ता आणि इतर पर्यायाकडे दुर्लक्ष झाल्याने आर्थिक विकास मंदावतो. 

१०) भेटवस्तू आहेर देताना त्यावर नाव कोरून देणे/ गाड्यांची नावे लिहिणे: हे याने काय साध्य होते अजून मला कळलेले नाही.

११) मुलामुलींचे वय १२-१४ झाल्यानंतर विवाहाचा विचार करणे : मुलामुलींचे वय १२-१४ झाल्यानंतर काही कुटुंबात त्यांच्या लग्नाचे विचार होतात. हे शिक्षणाचे व्यवहारीक ज्ञान घेण्याचे वय असते याचा विचार केला जात नाही. याला एक प्रकारची विकृती म्हणता येईल. त्याने मुलांचा सर्वांगीण विकास होत नाही. परिणामी पुढील पिढ्या ही वैचारिक दृष्ट्या मागासलेत्याच राहतील. 

१२) हलक्या साड्या, टॉवेल, टोपी, रुमाल इ. भेट आहेर म्हणून देणे: अशा गोष्टी भेट वस्तु म्हणून दिल्याने आपली पत देखील घसरते. इतर लोकांमध्ये आपले महत्व कमी होते आणि नकारात्मक प्रभाव पडतो. ह्या मानपानाच्या खोट्या संकल्पना होत. 

१३) ठराविक २-३ पध्दतीने शिक्षण घेणे : आपल्याकडे शिक्षण हे पारंपारिक पध्दतीनेच घेतले जाते. १० वी १२ वी नंतर ग्रॅज्यूएशन बस आजच्या इंटरनेटच्या जगात शिक्षण व करीअरच्या लाखो संधी उपलब्ध असताना देखील जुन्या पद्धतीच्या शिक्षण पध्दतीत अडकल्याने प्रगती होत नाही.

१४) अडचणीच्या प्रसंगापेक्षा विवाह, मृत्यूसमयी जास्त लोक जमणे: अडचणीच्या प्रसंगात असताना एखाद्या व्यक्तीला नातेवाईक/ समाज सोबत असणे गरजेचे आहे. तसे न होता केवळ विवाह मृत्यूसमयी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. अडचणीच्या वेळीस कोणाला मदत करणे हे प्रगत समाजाचे लक्षण आहे. त्यामुळे समाज सक्षम होईल.

१५) मुख्यठिकाण जन्मगाव शक्यतो न सोडणे : काही लोक नोकरी धंद्यासाठी मुख्यठिकण/ जन्मगाव सोडून इतर ठिकाणी जात नाहीत. त्यामुळे त्यांचा इतर जगाशी फारसा संबध येत नाही. त्याबद्दल त्यांना कमी ज्ञान असते. त्यामुळे त्यांच्या विकासाची कक्षा ही कधीच मोठी होत नाही. 

१६) नातेसंबध जोडताना पैशाचा सर्वाधिक विचार करणे : कधी कधी नातेसंबध जोडताना उदा. (विवाह, मैत्री, सोशल नेटवर्क) शैक्षणिक गुणवत्तेपेक्षा पैशाला महत्व दिले जाते. गुणवत्तेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने प्रगतीचा वेग मंदावतो.

१७) कमीत कमी वाचनसंस्कृती असणे: कमीत कमी वाचन असल्याने ज्ञान ही अर्धवटच असते. वाचनाने आयुष्यात प्रगल्भता येते. जग कळते आणि जीवन समृद्ध होते. कमी वाचनाने अज्ञानांकडे जाऊन पुढे त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात.

१८) कुटुंबातील महिलांमध्ये दुरावा, भांडणतंटा असणे : कुटुंबातील महिलांमध्ये भांडणतंटा व दुरावा असल्यास घरात अस्थिरता येते. परिणामी घराचे विभाजन ही होते. घरात एकी राहत नाही. त्यामुळे देखील कुटुंबाचा विकास मंदावतो. कुटुंबातील वातावरण दूषित होते. कौटुंबिक कलह असणे हे देखील वैचारिक मागासलेपणाचे लक्षण आहे. 

१९) तरुण मुले आणि ज्येष्ठ यांच्यामध्ये मोठे वैचारिक मतभेद असणे: बर्‍याच कुटुंबात जनरेशन गॅप पहायला मिळतो. तरुण मुले आणि ज्येष्ठ यांच्यात वैचारिक मतभेदामुळे संबध कटू होतात. अशा कुटुंबाचा विकासाचा स्तर कायमखाली असतो.

२०) जाती, पंथ, धर्माविषयी विचार डोक्यात असणे : आपण बाहेरच्या जगात वावरत असताना जातपात मानत असल्यास तुम्हाला कधीच विकास साधता येणार नाही. जग तुमच्याकडे नकारात्मकतेने पाहिल.

२१) कमाईपेक्षा जास्त खर्च : केवळ लोकांना दाखवण्याकरिता किंवा बजेटमध्ये नसणार्‍या वस्तूंकरता खर्च करणे हे आर्थिक निरीक्षरतेचे लक्षण आहे. त्यामुळे अंथरूण पाहून पाय पसरावेत.

२२) व्यसन : ज्या कुटुंबात तंबाखू, देशीदारू, विडी, चिली इ. चे व्यसन असलेल्या व्यक्ती आहेत त्या घरात कधीच शांतता नसते. कायम भांडणतंटा क्लेश असतात. त्यामुळे अशा ठिकाणी दारिद्य देखील कायम असते.

२३) आर्थिक व्यवहारात महिलांचा सहभाग नसल्याने त्यांना कुटुंबात व समाजात स्थान मिळत नाही. त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. हेही वैचारिक मागासलेपणाचे लक्षण आहे.

२४) आरोग्य विमा नसणे / आरोग्या विषयी जागरूकता नसणे: या गोष्टीमुळे कुटुंबियांचे वातावरण रोगट असते. आजकाल प्रत्येक सुजाण नागरिक हा त्याचा विमा उतरवतोच. आरोग्य विमा नसणे हे तुमच्या रोगट मनोवृत्तीचे लक्षण आहे.


२५) धर्मकांड पूजा अर्चा, अंधश्रध्दा पाळणे: हे सामाजिक शैक्षणिक आणि बौध्दिक मागासलेपणाचे लक्षण आहे. अशी कुटुंबे बरीच दिसतात. त्यांचा सर्वांगीण विकास होणे फारच अवघड आहे.

२६) घरातील वृध्द माणसांच्या आरोग्याची हेळसांड कुटुंबात केली जाते: ज्यांनी तुमच्यासाठी कष्ट घेतले त्यांच्याकडेच दुर्लक्ष करणे म्हणजे त्यांच्या उपकारांना विसरणे होय. हे कृतघ्नतेचे लक्षण आहे. जबाबदारीची जाणीव असल्यास समृध्दी व यश चालून येते.

२७) समतोल आहाराची जाणीव नसणे : अशा कुटुंबामध्ये आहार हा नेहमीच संतुलित नसतो. नेहमी २-३ पदार्थ ठरलेले असतात. पुरेसा असंतुलित व अपरिपुर्ण आहारामुळे या कुटुंबातील व्यक्ती रोगट दिसतात.


२८) जीवनशैली :अशा कुटुंबाची जीवनशैली ही कायम समाजाच्या चालीरीतीनुसार असते. समाजाचे नियम पाळताना काही वेळा वैयक्तिक स्वातंत्र्याला वाव नसतो अशा समाजाचा सर्वांगीण विकास होणे अवघड असते.

२९) मुलींना महिलांना माणूस नव्हे तर वस्तु सारखी वागणूक देणार्‍या समाज/कुटुंबामध्ये वैचारिक प्रलग्भतेचा अभाव असतो अशा महिलांचा विकासदार फार कमी असतो. ज्या समाजातील महिलांना त्यांचे जीवन त्याच्या इच्छेनुसार जगता येत नाही त्या समाजाचा विकास कधीच होत नाही.

३०) संपत्ती महिलांच्या नावे नसणे ही त्या कुटुंबाच्या वैचारिक निरक्षरतेचे उदाहरण आहे अशा कुटुंबातील पुरुष मंडळी नेहमीच स्त्रियांना दुय्यम स्थान देतात. अशा व्यक्तींना समाजात प्रतिष्ठा कशी मिळेल?

३१) पुरुषप्रधान संस्कृती: पुरुषप्रधान संस्कृतीमुळे महिलांचे मानसिक शारीरिक शोषण होते. त्यांच्या प्रगतीला वाव मिळत नाही. त्यामुळे अर्धासमाज/ कुटुंब हे अविकसित असते.

३२) मुख्य काम काय हे विसरून वायफळ गप्पा टप्पा करण्यात जे पटाईत असतात.ते  आयुष्यातील मूल्यवान वेळ वाया घालवतात.त्यामुळे संधी असताना देखील मागासलेपणा हा परिणाम भोगावा लागतो. वायफळ बडबड करण्यापेक्षा आपल्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष केंद्रीत केल्यास प्रगती होणारच.

३३) सतत चहा पाजणे व पिणे: ही सवय बर्‍याच लोकांना असते. त्यात तुमचा पैसा, वेळ व आरोग्य सर्वांचे नुकसान होते. परंतु तसा विचार न करता केवळ मानसन्मान मिळवण्यासाठी असे करणे चुकीचे आहे.

३४) अशा कुटुंबातील मुलांना वयाच्या २३ वर्षांपर्यंत करियर म्हणजे नेमके काय हेच ठाऊक नसते. शिक्षणाचे नीट प्लॅनिंग हे पालकांकडून न झाल्याने शिक्षण संपल्यावर त्यांना नोकरी धंद्यासाठी संघर्ष करावा लागतो. ते न मिळाल्यास बेरोजगारी वाढते.

३५) तंत्रज्ञांनाबद्दल कमी माहीती: हे एक आर्थिक व वैचारिक मागास कुटुंबाचे मुख्य कारण आहे. अंधश्रध्दा, कर्मकांड जातीप्रथा यामध्ये अडकलेल्यांना तंत्रज्ञांनाबद्दल जागरूकता नसते. त्यामुळे व्यवहारीक जगात ते सपशेल अयशस्वी ठरतात.

३६) श्रीमंत व पुढे जाणार्‍याबद्दल मत्सर व द्वेष : अशा कुटुंबामध्ये श्रीमंत व पुढे जाणार्‍याबद्दल मत्सर व द्वेष असतो. परंतु स्वत: पुढाकार घेवून मेहनत व प्रयत्न करण्यास मात्र आळस करतात. त्यामुळे त्यांचा मानसिक व वैचारिक क्षमता दूषित झालेली असते.

३७) असुरक्षित व एकट्याने प्रवास : बरेच लोक प्रवास करताना केवळ पैशाची बचत म्हणून शेअरींग ट्रान्सपोर्टचा वापर करतात. अशामुळे तुमचा वेळ वाया जातो. तसेच सहप्रवाशांवर भरोसा ठेवता येत नाही. त्यापेक्षा वेळ वाचवून चांगल्या पर्यायाची निवड करणे उत्तम. परंतु तसे न करता पैसा वाचवण्यासाठी असुरक्षित प्रवास करणे हे चुकीचे आहे.

३८) सावकारांकडून कर्ज, उसनवारी : अशी कुटुंबे आर्थिक व्यवहारासाठी बँक, पतपेढी सुरक्षित माध्यमांचा वापर न करता सावकारांकडून कर्ज काढतात किंवा उसण्याने पैसे घेतात. कालांतराने यात फसवणूक करून घेतात. कर्जबाजारीपणा उसनवारी हे दारीद्याचे एक प्रमुख कारण आहे.

३९) कुटुंबात एखादाच व्यक्ती कमावता असणे : बर्‍याच कुटुंबात एकच व्यक्ती उत्पन्न कमावतो, बाकीचे त्यांच्या कमाईवर अवलंबून राहतात अशा कुटुंबाकडे पैसे वाचत नाही, मग कर्ज, ईएमआय उधारी अशा गोष्टीत अडकून राहतात. घरची आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर जास्तीतजास्त सभासदांनी त्यास आर्थिक हातभार लावला पाहिजे.

४०) अशा घरात मुले चांगली शिकली तरी नोकरीमधील कमाईनुसार त्यांची किंमत पालक करतात जास्त पगार असेल तर चांगले परंतु कमी पगार असेल तर मात्र त्यांच्या मुलांवर मानसिकरित्या दबाव टाकला जातो व कमी महत्व दिले जाते. अशाने मुलांची गुणवत्ता कमी होऊन त्यांचा आत्मविश्वास देखील कमी होतो आणि हे जनरेशन गॅपचे हेच एक महत्वाचे कारण आहे.महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा यासाठी मी काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला, लेख आपल्या मित्र परिचितांना पाठवा, पूर्वी प्रसिध्द झालेले लेख हवे असल्यास आम्हास कळवा, मला pro2bhosale@gmail.comवर मेल करा किंवा ९८६७८०६३९९ व्हॉटसअप करा.


Share This:
Tags :

प्रतिक्रिया

Varsha p borule on 18 Sep 2020 , 8:03PM

Excellent

???????? ???? on 23 Jun 2020 , 9:44PM

डोळ्यात अंजन घालणारा लेख

योगेश प्रभाकर on 08 Apr 2020 , 10:51PM

सुंदर माहिती दिली आहे.......

उदय काशिनाथ पिंगळे on 12 Jun 2019 , 8:00PM

अप्रतिम

Shyam Deshmukh on 12 Jun 2019 , 11:49AM

वा वा फारच सुंदर लेखन आहे

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...