आजोबांना लेमन गोळ्या घेण्यासाठी १ रुपया मागितला की डोळे मोठे व्हायचे, १ रुपया ही घाबरून मागायचो. आज मुलांचा खर्च व मुलं ज्या ठिकाणी दिसतात, ज्या वस्तु वापरतात ते पाहता पालकांचे डोके फिरले आहे की काय असे वाटते. मल्टीफ्लेक्समध्ये दिसणारी मुलांची टोळकी सरासरी प्रत्येकी पाचशे रुपये खर्च, ब्रॅंडेड बुट सरासरी ४ हजार रुपये, स्मार्टफोन सरासरी किंमत २५ हजार रुपये, ब्रॅंडेड जीन्स सरासरी किंमत ३ हजार, ब्रॅंडेड टीशर्ट किंमत १५०० रुपये. कॉलेजला जायला गाडी किंमत ७० हजार अजून मिशा फुटले नाहीत आणि पोराला गर्लफ्रेंड आहे, मॅग्डी, कॅफेमध्ये भेटतो व दीडशेची कॉफी पितो. ३०० चा पिझ्झा खातो. २०० रुपये कमवायची अक्कल नसणार्या पोरांना इतके पैसे व सोयी का देतात, उद्या हीच मुले बिनाकष्टकरता चैनीची सवय लागल्याने तुम्ही कमविलेली संपत्ती विकून खात बसतात व तुम्हाला एक दिवस वृध्दश्रमात जायची वेळ येते. मुलांना त्यांच्या अकले एवढेच पैसे द्यावेत. पालकांची ऐपत नसताना तर मुलांना अजिबात पैसे देवू नयेत, घर जाळून कोळशाचा व्यापार केल्यासारखे होईल. आज १०-१२ हजार कमविण्यासाठी वॉचमनचे काम करणारा माणूस नेपाळवरून २ हजार किमी प्रवास करून येतो, १२ तास काम करतो सर्वांना सलाम ठोकतो, साबजी म्हणतो व तुमची पोरं फक्त पॉकेटमनी व गर्लफ्रेंडला फिरविण्यासाठी जर महिना १०-१२ हजार खर्च करत असतील तर व हे माहीत असून पण जर पालक म्हणून तुम्ही काहीच विचार करत नसाल तुमच्या पोराची बरबादी व्हायला फार काळ राहिलेला नाही हे लक्षात ठेवा. अशी चैनी खोर मुलं लवकरच एक एक गुंठयाने तुमची जमीन विकणार, गाड्या उडवणार, घर विकणार व शेवटी तुम्हाला पण वृध्दाश्रमात जायला लागणार. जहाजाला लागणारे छोटेशे भोक ही महाकाय जहाज बुडविते हे लक्षात ठेवा. पोरांच्या एका वाईट गर्लफ्रेंडमुळे तुमचे घर लायला जाऊ शकते. पोरं कोणाशी तासनतास चॅटिंग करतात जरा बघा. तुम्ही अहोरात्र राबताय व पोरं पैसा उडवतायत. बाप वडापाव खातोय व पोरगा छाविला घेवून मल्टीप्लेक्स ला. आई पाच किलो साखरेत महिना चालवते व पोरगा आयटमबरोबर दीडशेची कॉफी पितो. पूर्वी प्रसिध्द झालेले लेख वाचण्यासाठी माझा अॅप डाउनलोड करा https://bit.ly/2S9osTH किंवा ९८६७८०६३९९ व्हॉटसअॅप करा.