तुम्हाला जर उद्योजक व्हायचे असेल व एखादा नावीन्यपूर्ण व्यवसाय सुरू करायचा असेल तर विदेशी वैद्यकीयशिक्षण सल्ला समुपदेशन ही एक चांगली व्यवसाय संधी आहे असे मला वाटते. भारतात इंजिनीअरींग, वैद्यकीयमॅनेजमेंट इत्यादी शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांश लोकांना परदेशातील शिक्षण घेण्यात रुची असते. भारतातखाजगी महाविद्यालयातून एमबीबीएस करण्यासाठी एकूण सुमारे ५० लाख रुपयांपर्यंत फी भरावी लागते. व डोनेेशनवेगळेच. इतके महागडे वैद्यकीय शिक्षण तर रशिया, युक्रेन, जर्मनी इत्यादी देशांतही नाही. रशिया, जर्मनी,फिलीपाईन्स, युक्रेन इत्यादी देशांत आंतरराष्ट्रीय दर्जाचे, एमबीबीएस, बीडीएस यांसारखे शिक्षण केवळ १५ लाखांतहोते. यास MCI (मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडिया) ची मान्यता देखील असते. त्यामुळे बर्याच वैद्यकीय विद्यार्थ्यांचा कल हा परदेशाकडे असतो. भारतातून दरवर्षी सुमारे ५००० पेक्षाही जास्त विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात जातात. या विद्यार्थ्यांना संपूर्ण सल्ला समुपदेशन देणे, परदेशी युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळवून देणे. विमान तिकिटे व व्हिजा मिळवून देणे, हॉस्टेल सोय उपलब्ध करवून देणे, युनिव्हर्सिटीत प्रतिनिधींचे भारतात व्याख्यान आयोजित करणे इत्यादीसाठी विद्यार्थी व पालक खाजगी विदेश शिक्षण समुपदेशक किंवा एजन्सीची मदत घेतात. हा व्यवसाय करण्यासाठी स्वत: उच्च शिक्षित असले पाहिजे. तसेच शिक्षण क्षेत्राची आवड असावी लागते. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी अंदाजे २५ ते ३५ लाखांचे भांडवल लागते. तसेच किमान ४०० ते ६०० चौ. फुटांचे कार्यालय स्थापन करणे आवश्यक आहे. या कार्यालयात किमान २ कुशल कर्मचारी नियुक्त करावे. एक उत्तम शिक्षण समुपदेशन एजन्सी सुरू करण्यासाठी मार्केट रिसर्च करणे आवश्यक आहे. तसेच वेळीवेळी या क्षेत्रातील अनुभवी व तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेतल्यास फायदेशीर ठरेल. तर इंटरनेट च्या माध्यमातूनही या व्यवसायाबद्दल अधिक माहिती मिळवता येईल. व हा व्यवसाय सुरू करण्यासाठी नोंदणीकरण करणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थी, पालक, शिक्षण संस्था इत्यादींना टार्गेट करून त्याप्रमाणे मार्केटींग केले पाहिजे. यासाठी स्वत:ची एक आकर्षक वेबसाईट बनवावी लागेल. तसेच मोबाईल अॅप, सोशलमीडिया, मासिके व इतर अद्यावत डिजीटल मार्केटींग स्त्रोतांचा पुरेपूर उपयोग करावा लागेल. उत्कृष्ट नेटवर्किंग केल्यास व्यवसायात वेगाने वाढ होते. हा व्यवसाय करताना परदेशातील अग्रमानांकीत व सर्वोत्तम युनिव्हर्सिटीची माहिती व त्यांच्याशी संलग्न व्हावे लागते. समुपदेशनाचा भाग अत्यंत महत्वपूर्ण विदेशी शिक्षणाची कॉस्ट, स्कॉलरशिप, युनिव्हर्सिटी, प्रवेश प्रक्रिया, फी परवाने. याबाबत सखोल माहिती क्लाईंटना प्रभावीपणे देता येणे अत्यंत आवश्यक आहे. कारण त्यावर तुमच्या व्यवसायाची विश्वासर्हता व भविष्य अवलंबून असते. त्यासाठी कुशल कर्मचारी व उत्तम मार्केटींग प्लान असावा लागतो. एका विद्यार्थ्यामागे अंदाजे १ लाख रुपये फी आकरण्यात येते. एका समुपदेशन केंद्रातून वर्षाला अंदाजे १०० विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. दरमहा दीड ते दोन लाख रुपये फायदा अपेक्षित आहे.