बाप एकटाच स्मशानात जळत होता....हो आणि इथून पुढे खूप आई-बाप स्मशानात एकटेच जळणार आहेत
दिवसेंदिवस नाती प्रॅक्टिकल होत आहेत.... आता आपण जे ८०-९० ची पिढी बोलतो ह्यांना इथून पुढे सर्वात जास्त त्रास आहे..... मुलांना पाश्चिमात्य शिक्षण, सवयी, संस्कृती आपणच घरात आणल्या आणि त्यात मला जे मिळाले नाही ते मी माझ्या मुलांना देणार मग माझ्यावर किती पण कर्जे होऊ दे... व्याज होऊ दे.... ही टिपकील मध्यम वर्गीय लोकांची सर्वात मोठी चूक आहे असे मला वाटते.... आणि पुढे जाऊन हीच मुले स्वतःचे वेगळे जग उभा करणार आणि आपला बागबान मधील अमिताभ होणार.... प्रत्येक मूल असे निघेल असे नाही पण जे समाजात घडते तसे आपल्या घरात ही येते.... मोबाईल चे बघा ना आज १० पैकी ३ जणांना अतिवापराचे व्यसन आहे...तसेच ही गोष्ट आपल्या ही बाबतीत होऊ शकते...
तुम्ही म्हणाल आपण काय करू शकतो तर...
१.आपल्या ऐपतीप्रमाणे मुलांचे लाड पूरवा जे आपल्या आई वडिलांनी केले.
२.आपल्या आर्थिक जीवनाबद्दल त्यांना ही माहिती असू द्या.
३.मुलांचे मित्र मैत्रिणी अतिश्रीमंत कॅटेगरी मधील असतील तर तिथे मुलांच्या डोक्यात स्वतःच्या फॅमिली च्या आर्थिक परिस्थिती बाबत नकारात्मक होतात. तिथे त्यांच्याशी संवाद साधा.
४.तुम्ही कष्टाने कमावलेला पैसा मुला प्रमाणेच स्वतःच्या आवडी निवडीवर पण खर्च करा.
५. तुमच्या मालमत्ता तुमच्या मुलांच्याच होणार आहेत पण देताना घाई नको
"
माझी मुलेच म्हणजे माझी संपत्ती" हा काळ आता गेला आहे हे मान्य करा..... त्यामुळे असाच एखादा बाप स्मशानात जळला नाही पाहिजे तो सन्मानाने आला होता सन्मानाने जाईल.
***************************
तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "
मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa