प्रश्न : आम्ही छोटे हॉटेल व्यवसायिक असून आमची पारंपारिक शेतजमीन प्रकल्पात गेल्याने तिघा भावात मिळून दीड कोटी मोबदला मिळाला. आम्हाला मोठा फूड ब्रॅंड सुरू करायचा आहे काय करावे?
उत्तर : फूड इंडस्ट्री सध्या सर्वाधिक वेगाने वाढते आहे. रुपये २० ते ५० किंमतीचे फास्टफूडला मोठी मागणी निर्माण झाली आहे. अशा प्रकारच्या एका आऊटलेटचा रोज किमान रुपये १० हजार व्यवसाय होतो. यासाठी तुम्हाला प्रा. लि. कंपनी स्थापन करून स्वत:चा स्केलेबल ब्रॅंड तयार करावा लागेल. प्रॉडक्टवर संशोधन करून आलू टिक्की, वडापाव, बर्गर अशा पध्दतीचे उत्पादन ठरवावे लागेल, जे हायजिनिक असेल, स्वस्त असेल व लगेच सर्व्ह केले जाणारे असेल. यासाठी तुम्हाला प्रथम स्वत:चे मॉडेल आऊटलेट (फ्रँचायझी ) पुणे किंवा मुंबई सारख्या शहरात सुरू करावी लागेल. व त्या उदाहरणाआधारे तुम्ही इतरांना फ्रँचायझी विकू शकाल. प्रत्येक फ्रंचायझीकडून ३ लाखांपर्यंत फी व महिना २० हजार रुपये रॉयल्टी आकारता येईल. ३ वर्षाच्या कालावधीत अंदाजे १०० आऊटलेट निर्माण करणे शक्य आहे. त्याद्वारे तुम्हाला ३ कोटी फी व दरमहा १५ लाख रुपये ब्रॅंड रॉयल्टी मिळेल. दुसर्याची फ्रँचायझी घेण्यापेक्षा आपलाच ब्रॅंड तयार करून मोठे व्हा तुमच्या ध्येयास प्रत पोहोचवण्यासाठी शास्त्रशुध्द बिझनेस मॅनेजमेंट पध्दतीची गरज आहे. हे ध्यानात असावे.
आमची मदत हवी आहे का? : मित्रांनो तुम्हीसुद्धा छोटी सुरुवात करून फूड इंडस्ट्री मध्ये छोटे रेस्टोरेंट, फूड कोर्ट, कॅफे आउटलेट, स्नॅक सेंटर, अश्या अनेक प्रकारचे व्यवसाय सुरु करू शकता. आपल्याला या क्षेत्रात उद्योजक व्हायचे आहे का? आम्ही कॅफेसाठी पूर्ण वेळ प्रशिक्षण कार्यक्रम प्रदान करतो. यामध्ये ऑनसाईट प्रॅक्टिकल प्रशिक्षण, अन्न आणि पेय उद्योगाबद्दल ज्ञान, आदरातिथ्य प्रशिक्षण तत्त्वे (Principles of Hospitality Training), कॅफेच्या ब्रँडिंग व मार्केटींग संबंधी ज्ञान, कॅफे एटीकेट्स प्रशिक्षण आम्ही प्रदान करतो. या प्रशिक्षण कार्यक्रमात अनुभवी उद्योग तज्ञांद्वारे प्रशिक्षण दिले जाईल तसेच प्रात्यक्षिकांसहित व्यवसायाचे उत्तम ज्ञान प्रदान केले जाईल.
प्रशिक्षण कार्यक्रम मर्यादित : ५ ते ६ उद्योजक प्रशिक्षणार्थींसाठीच
प्रशिक्षण स्थळ : गोरेगाव (पूर्व), मुंबई.
संपर्क: +९१ ८६५२८ ४७३७८
नियमित आमचे लेख मिळवण्यासाठी ८६५२८४७३७८ हा नंबर तुमच्या व्यावसायिक व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा.
********************************
तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.
https://bit.ly/2EP0cPm