सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

जेष्ठांनी करावा भविष्याचा असाही विचार भारताच्या लोकसंख्येपैकी 10% लोक जेष्ठ नागरिक आहेत. घटते व्याजदर, वाढले

16 Jul 2021 By
1136 0 Comments
post-1

भारताच्या लोकसंख्येपैकी 10% लोक जेष्ठ नागरिक आहेत. घटते व्याजदर, वाढलेले आयुर्मान यामुळे ज्यांना महागाई निगडित निवृत्तीवेतन, वैद्यकीय सोईसवलती मिळणारे आणि सरकार पुरस्कृत सामाजिक सुरक्षा योजनांचे लाभार्थी सोडले तर बहुतेक जेष्ठ नागरिक हे नातेवाईक व शासन दोन्हीकडून उपेक्षित आहेत. त्यांच्याकडून मदत झालीच तर ठीक नाहीतर असलेल्या समस्यांना तोंड द्यायचे आहे. कुटुंब निवृत्ती वेतन याखाली मिळणारे निवृत्तीवेतन अत्यंत हास्यास्पद आहे. यातही प्रत्येक व्यक्तींच्या समस्या आणि त्यावरील उपाय यात भिन्नता असली तरी त्यांच्याकडे आर्थिकबळ असेल तर जीवन बरेच सुसह्य होण्यास मदत होऊ शकते. यादृष्टीने त्यांनी तजवीज करणे आवश्यक आहे. हे सर्व करीत असताना अनेक बारीकसारीक गोष्टींचा विचार करावा लागतो.  यावर सर्वांना लागू होणारा असा कोणताही ठोस उपाय नाही. तेव्हा आपले उर्वरित आयुष्य आनंदाने जगण्यासाठी अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. पैसा हे सर्वस्व नाही परंतू तो अनेक कारणासाठी लागत असतो ही वस्तुस्थिती आहे. सध्या पूर्णपणे सुरक्षित, नियमित उत्पन्न देणाऱ्या अशा काही योजना जेष्ठ नागरिकांना उपयोगी पडू शकतात.

वरिष्ठ नागरिक बचत योजना: खाते पोस्ट /बँक कुठेही काढता येते, जास्तीतजास्त गुंतवणूक 15 लाख, व्याज दर तिमाहीस, व्याज करपात्र, मुदत 5 वर्ष अधिक 3 वर्ष मुदत वाढवता येत

पोस्टाची मासिक प्राप्ती योजना: योजना फक्त  पोस्टातच, जोडीदारासह जास्तीत जास्त गुंतवणूक 9 लाख, व्याज दरमहा, व्याज करप्राप्त, मुदत 5 वर्ष

प्रधानमंत्री वय वंदना योजना: एल आय सी चे ऑफिस, एका व्यक्तीस 15 लाख गुंतवणूक करता येते, व्याजदर 7.4% ते 7.66% व्याज करपात्र, मुदत 10 वर्ष.

आरबीआय फ्लोटिंग रेट बॉण्ड: सध्याचा व्याजदर 7.15%, व्याज दर सहामाहीस देय, या दरात दर सहामाहीस बदल होण्याची शक्यता, एन एस सी हून 0.35% अधिक व्याज मिळण्याची हमी, व्याज करपात्र. गुंतवणूक मर्यादा नाही. 

विविध पेन्शन योजना: विमा कंपन्यांच्या या योजना असून यातील करारानुसार धारकाला पेन्शन मिळते. हा परतावा 6%च्या आसपास आहे. 

मुदतबंद ठेवी: बँक, पोस्ट याठिकाणी, व्याजदर मुदतीनुसार कमी अधिक. परतावा 6% हून कमी

ट्रेझरी बिल आणि गव्हर्नमेंट बॉण्ड: मुदत, व्याजदर नियमानुसार सध्याचा जास्तीत जास्त परतावा 6% हून कमी. 

सध्या अशा खात्रीशीर योजनांतून मिळणारा व्याजदर हा बराच कमी असून तो जास्तीतजास्त 7.5% च्या आसपास  आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाने सरकारच्यावतीने जारी केलेल्या आणि व्यक्तीच्या  हयातीपर्यंत लाभ घेता येणाऱ्या नियमित उत्पन्न देणाऱ्या दोन वरिष्ठ पेन्शन विमा योजना आणि यापूर्वीची 8% व्याजदर देणारी प्रधानमंत्री वयवंदना योजना यातून त्यांच्या नियमांनुसार मिळणारी पेन्शन रक्कम मिळत राहीलच. आपण यापूर्वी जर अन्य पेन्शन योजना घेतल्या असतील तर त्याही त्यातील शर्तीनुसार कार्यान्वित होतील. आपले जुने पी पी एफ खाते किंवा इ एल एस एस योजनेत गुंतवणूक असेल तर अडीअडचणीत त्यातून पैसे काढता येऊ शकतील. असे पी पी एफ खाते चालू ठेवण्यासाठी फक्त 500 रुपये दरवर्षी भरावे लागतात. हे खाते मुदत संपल्यावर कितीही वेळा 5 वर्ष वाढवता येते. इ एल एस एस योजना तीन वर्षे मुदतबंद असतात  त्यानंतर आपण यातील गुंतवणूक काढू शकत असलो तरी त्या चालूच ठेवाव्यात म्हणजे संकटकाळात पैसे उभे करण्यासाठी त्यांचा उपयोग होईल 

फिक्स डिपॉझिटवर मिळणाऱ्या फायद्याहून अधीक परतावा मिळवण्यासाठी, थोडा जोखमीचा मार्ग म्हणजे भरपूर डिव्हिडंड देणाऱ्या सरकारी कंपन्यांचे शेअर्स घेणे  आणि दरमहा डिव्हिडंड देणाऱ्या म्युच्युअल फंडाचे युनिट खरेदी करणे. यातून अधिक आकर्षक परतावा व भांडवलवृद्धी असे दुहेरी फायदा होत असल्याने चांगला पर्याय होऊ शकतो परंतू यातून नेमका किती फायदा होईल किती डिव्हिडंड मिळेल याची कोणतीच हमी नाही हे लक्षात घेऊनच यासंबंधी निर्णय थोड्या धाडसी लोकांनी घ्यावा. याहून आकर्षक पण तितकेच जास्त धोकादायक पर्याय आहेत त्यांच्या वाटेस जेष्ठ नागरीकांनी आजिबात जाऊ नये. काही स्वयंशिस्त पाळल्यास त्यांच्या खर्चात बचत होऊन मिळणाऱ्या उत्पन्नात चांगले जीवन जगता येईल आणि  गुंतवणुकीचे व्यवस्थापन करणे सोपे जाईल.

हे  करा-

★ योग्य भावात दर्जेदार वस्तूंचा शोध घेणे.

★ आरोग्य विमा घेणे व तो विनाखंड चालू ठेवणे.

★ नियमित वैद्यकीय चाचण्या काही ट्रस्टच्या माध्यमातून अल्पखर्चात होतात तेथून करणे.

★ जेनेरिक औषधांचा वापर करणे.

★ इच्छापत्र बनवून जोडीदाराची योग्य आर्थिक तरतूद करणे.

★ दरवर्षी नियमित 15/H फॉर्म, हयातीचा दाखला,आयकर विवरणपत्र वेळेत दाखल करणे.

★ सर्व गुंतवणुकीची एकत्रित नोंद ठेवून त्याची माहीती जोडीदारास व वारसास देणे.

हे टाळा-

★ अनावश्यक खर्च, किमती वस्तूंच्या भेटी.

★ मित्र नातेवाईक यांना पैसे उधार देणे.

★ अवास्तव परतावा देणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक 

★ आपल्याला माहिती नसलेला व्यवसाय सुरू करणे.

★ स्थावर मालमत्तेतील गुंतवणूक टाळावी यातून काही प्राप्ती होण्याऐवजी खर्चात वाढ होऊ शकते.

★ आपली करदेयता वाढणार नाही याची काळजी घ्यावी.


शक्य असलेल्या सर्व ठिकाणी जोडीदारासह गुंतवणूक करावी नसेल तेथे वारस म्हणून जोडीदाराची नोंद करावी. नियमाप्रमाणे  सावधी (Turm) जमा, आवर्ती (Recurring) जमा, मासिक आय( MIS) योजना, राष्ट्रीय बचत पत्र (NSS), वरीष्ठ नागरिक बचत योजना(SCSS), किसान विकास पत्र (KVP) , धारकाचा मृत्यू झाला तर योजना बंद होऊन मान्य केलेल्या दराने व्याज मृत्यू तारखेपर्यंत व नंतर बचत खात्याच्या दराप्रमाणे मिळवून त्याच्या वारसास दिले जाते (शासकीय सर्वसाधारण राजपत्र भाग 2 खंड 3 (1) दिनांक 12 डिसेंबर 2019 मध्ये असलेल्या तरतुदींप्रमाणे)  तर ज्या विमा योजना आहेत तो करार असल्याने त्या पॉलिसीवरील अटींप्रमाणे विमोचित होतात. काही ठिकाणी जोडीदारास त्याच्या हयातीत योजनेचे फायदे मिळून नंतर ती रक्कम त्यांनी नेमलेल्या वारसास दिली जावी अशीही तरतूद असते. तेव्हा हे नियम आपल्या जोडीदारास / वारसास सांगून ठेवा अनेकदा धारकाच्या मृत्यूनंतर या योजना मुदतीपूर्वी बंद केल्या असे गृहीत धरून त्यावर विनाकारण दंड आकारणी केल्याच्या घटना सर्रास घडल्या आहेत. तेव्हा हे नियम डावलू न देणे ही वारसांचे कर्तव्य आहे हे त्यांना समजावून सांगावे. अनेकदा वारसांना ही रक्कम विनासायास मिळत असल्याने ते यात फारसे लक्ष घालीत नाहीत. माहिती नसल्यास जाणकारांचा सल्ला घेण्यास त्यांना आधीच सुचवून आपण खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण जीवन जगावे.

Share This:
Tags :

प्रतिक्रिया

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...