सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

भांडवल बाजारासंबंधी दावे : अनुचित व्यापारी प्रथा भांडवल बाजाराबद्दल लोकांचे दोन टोकाचे गैरसमज आहेत. ते म्हणजे यातून भर

17 Jul 2021 By
1373 1 Comments
post-1

भांडवल बाजाराबद्दल लोकांचे दोन टोकाचे गैरसमज आहेत. ते म्हणजे यातून भरपूर पैसे मिळतात किंवा यात लोक भिकेला लागतात. सर्वसाधारण काही न करता आपल्याला भरपूर पैसे मिळावेत अशी सुप्त इच्छा असलेल्या भरपूर व्यक्ती आहेत आणि त्यांच्या मानसिकतेचा फायदा घेणारे लोकही आहेत. या बाबतीत अनेक प्रकारे प्रबोधन होत असूनही एक क्षण असा येतो की व्यक्तिला मोह होतो आणि ती फसते. फसवे दावे करण्यास कायदेशीररित्या बंदी असली तरी अनेक ठिकाणी सर्रासपणे त्याचे उल्लंघन केले जात आहे. त्यावर अंकुश ठेवणाऱ्या यंत्रणेच्या मर्यादा आहेत.

अलीकडेच मी माझे घराजवळील बँकेत पुस्तक भरून घ्यायला गेलो होतो तेथील रिलेशनशिप मॅनेजर ने मला एका युनिट लिंक योजनेची माहिती देऊन  त्यात गुंतवणूक करण्याची गळ घातली. मी त्यास प्रतिसाद देत नाही हे लक्षात आल्यावर त्याने म्युच्युअल फंड योजनेची माहिती देण्यास सुरुवात केली. खरंतर बँक व्यवसायाशी याचा काडीमात्र संबंध नाही आणि अशा प्रकारे बँकेमध्ये इतर योजनांचे प्रमोशन करण्यास बंदी आहे. हा व्यवसाय ठराविक मर्यादेत मूळ व्यवसायापासून वेगळा करावा अशा भांडवल बाजार नियामक यांच्या सूचना आहेत. याचे सर्वच बँकांमध्ये सरळ सरळ उल्लंघन केले जात आहे. रोजच्या वर्तमानपत्रात फसवे दावे करणाऱ्या जाहिराती येत आहेत. ज्यांचे डी मॅट खाते आहे त्यांच्या वैयक्तिक माहितीची बेकायदेशीर विक्री होऊन इंदूर, सुरत, राजकोट, भावनगर येथून गुंतवणुकदारांना वारंवार फोन येत आहेत. ज्यात व्यक्तींना बोलण्यात गुंगवून ट्रेडिंग करून हमखास भरपूर फायदा करून देत असल्याचे दावे करण्यात येत आहेत.

भांडवल बाजारातील गुंतवणूक ही अत्यंत धोकादायक प्रकारात मोडत असल्याने यातून कोणतेही ठाम दावे करणे ही अनुचित व्यापारी प्रथा आहे. भांडवल बाजाराशी संबंधित कोणत्याही उत्पादनात असा दावा करता येत नाही. यातील धोक्याची जाणीव करून देऊन 6% ते 10% परतावा ( Return) मिळाला तर किती रक्कम कदाचित मिळू शकते तेवढेच जाहीर करता येते. आधीच्या उत्पादनातून किती टक्के परतावा मिळाला ते सांगता येते. यातील नियम मोडून अथवा त्यास बगल देऊन अनेक गोष्टी घडत आहेत. अलीकडेच भांडवल बाजार नियंत्रकानी स्वतःहून कारवाई करून हमखास प्राप्ती करून देणाऱ्या आणि वार्षिक 300% ते 800% उतारा मिळेल अशा प्रकारचे दिशाभूल करणारे दावे करणाऱ्या 12 संकेतस्थळाच्यावर (वेबसाईट) आणि 3 व्यक्ती यांच्यावर बंदी आणून त्यांना भांडवल बाजारातून हद्दपार केले आहे. या व्यक्ती व संकेतस्थळे खालीलप्रमाणे-

व्यक्ती

Rishabh Jain

Ubaidur Rahman

G Kadar Hussain 

संकेतस्थळे (websites)
www.trade4target.com
www.niftysureshot.com
www.mcxbhavishya.com
www.callput.in
www.newsbasedtips.com
www.futuresandoption.com
www.optiontips.in
www.commoditytips.in
www.sharetipslive.com
www.thepremiumstocks.com
www.callputoption.in
www.tradingtipscomplaints.com

या व्यक्ती आणि संस्थांनी गुंतवणूक सल्लागार म्हणून नोदणी न करता वरील वेबसाईटच्या मार्फ़त 5 कोटीहून अधिक रक्कम सल्ला शुल्क म्हणून गोळा केले. हे शुल्क वार्षिक 7500 रुपये ते 1 लाख रुपये होते. या योजनेस ‘zero loss’, ‘jackpot’, ‘rumour based’, आणि ‘sureshot’ अशी आकर्षक नावे  होती. यांच्या सूचनांचा (टिप्स) तंतोतंतपणा 90 ते 99 % बरोबर येत असल्याचा दावा करण्यात आला होता. यावर कडी म्हणजे एका संकेतस्थळाने नुकसान झाल्यास त्याची भरपाई करून देण्याची हमी दिली होती. लोकांना सुरुवातीला काही दिवस शेअर खरेदी विक्री संबधी सूचना दिल्या फोनवरून प्रतिसाद दिला आणि अचानक  एक वर्षाची वर्गणी भरली असताना सल्ला देणे बंद केले आणि चौकशी करणाऱ्या लोकांना उत्तर देण्यात टाळाटाळ करू लागले. यासंबंधी अनेक तक्रारी सेबीकडे आल्याने त्यांच्यावर कारवाई झाली.

अशा तऱ्हेच्या कारवाया होत राहातील एक सजग गुंतवणूकदार म्हणून आपण अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. यानिमित्ताने पुन्हा काही गोष्टींची उजळणी--

* लाभ आणि लोभ यातील फरक लक्षात घेणे आवश्यक आहे. ही गुंतवणूक धोकादायक प्रकारात येते याची सतत जाणीव ठेवावी.

* गुंतवणूक सल्लागार नोंदणीकृत आहे की नाही याची खात्री करून घ्यावी.

* रीतसर करार करावा आणि उभयपक्षांनी त्यातील अटींचे पालन करावे. अन्य छुपे करार करू नयेत.

* आपल्या व्यवहाराची माहीती कोणास देऊ नये अशी माहिती मागणाऱ्या व्यक्तींचे नंबर त्यांच्याशी काही न बोलता ब्लॉक करावेत.

* गुंतवणुकीवर लक्ष ठेवावे, शंका असल्यास त्याचे निराकरण करून घ्यावे.

* आपले ट्रेडिंग खाते आपणच वापरावे आपल्या वतीने ते कोणी चालवून आपल्याला फायदा करून देईल या भ्रमात राहू नये. अपयश पोरके असते त्याची जबाबदारी कोणी घेत नाही.

* ब्रोकर्सकडून मिळणारे एक्सपोजर लिमिट घेऊ नये.

* काही न सुटणारा वाद असेल तर यासंबंधीची तक्रार संबंधित यंत्रणांकडे ताबडतोब करावी.

Share This:
Tags :

प्रतिक्रिया

Santaji Sambhaji Patil on 08 Aug 2021 , 2:36PM

best

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...