लेखक पीटर थील यांनी पेपाल आणि पालेंतिर ह्या अब्जाधीश डॉलर कमवणाऱ्या कंपन्या सुरु केल्या आहेत तसेच फेसबुक ला आर्थिक सहाय्य्य करणारे पहिले गुंतवणूकदार असून अजूनही ते भांडवल पुरवत असतात. त्याच सोबत लिंक्डईन आणि एलॉन मस्क सोबत सुरु केलेली SpaceX ह्या कंपन्यांना हि त्यांनी भांडवल पुरवलं आहे. २०१२ पासून पीटर थील हे 'स्टॅनफर्ड लॉ स्कुलला' कॉम्पुटर सायन्स ह्या विभागात 'स्टार्टउप विषयी' लेक्चर देतात होते त्या वेळी तेथील उपस्थित असणाऱ्या ब्लॅक मास्टर्स ह्या त्यांच्या विद्यार्थ्याने त्यांच्या स्टार्टअप विषयी विस्तृत नोट्स काढण्यास सुरवात केली. झालेला नोट्स त्यांनी कॅम्पस बाहेर वितरित केल्या जाऊ लागल्या. नोट्स सर्वत्र प्रसिद्ध झाल्यावर पीटर थील आणि त्यांचा विद्यार्थी "ब्लॅक मास्टर्स" यांनी एकत्र येऊन त्याच पुस्तकात रूपांतर केलं. आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. आणि अश्या प्रकारे जगातील उद्योजकीय घडवणारे एक अफलातून पुस्तक उद्यानास आलं त्याच नाव आहे "झिरो टू वन" हे पुस्तक २०१४ साली प्रकाशित झालं. झिरो टू वन हे यशस्वी उद्योजक घडवणारे आणि उज्जवल भविष्यासाठी एक मार्गदर्शन आहे. तब्ब्ल ४० लाख पुस्तके आजपर्यंत विकली गेली असून हे पुस्तक सप्टेंबर २०१८ ला म्हणजे मागच्या महिन्यात मराठीत अनुवाद होऊन आपल्या भाषेत प्रकाशित झालं आहे. ह्या पुस्तकाची एकूण पृष्ठे २२३ असून किंमत २५० /- आहे.पुस्तक एकूण १६ धड्यांमध्ये लिहलं गेलं आहे.
जगामध्ये अगदी नव्या आणि मौलिक गोष्टी कश्या तयार कराव्या, याबद्धल हे पुस्तक संपूर्णतः नव्या आणि अनोख्या कल्पना पुरवत - मार्क झुकेरबर्ग.
झिरो टू वन पुस्तकामध्ये स्टार्टअप सुरु करून त्यातून मोठ्या कंपन्या कश्या उभ्या कराव्यात याबद्धल बहुतांशी लिहलं गेलं आहे. भविष्याचा वेध घेऊन संपूर्ण उद्योगाची विचारसरणी बदलण्यासाठी हे पुस्तक खूप नक्कीच मराठी उद्योजकांसाठी उपयुक्त असं ठरेल.
पीटर थील यांच्या अनुमतें बिझनेस दोन प्रकारात करता येतो. एक म्हणजे झिरो To n ( 0 to N ) आणि दुसरा म्हणजे झिरो टू वन (0 टू 1). झिरो टू N म्हणजे एक व्यवसायाची नक्कल करणे. म्हणजे प्रतिस्पर्दी निर्माण करणे. आणि झिरो टू वन म्हणजे वेगळं असं काही करणे. उदा. गुगल कंपनी , SpaceX आणि Apple , MiscroSoft ह्या कंपन्या ना प्रतिस्पर्धक नसले तरी त्यांनी त्यांच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणत विस्तार केला आहे. एक नवीन तंत्रज्ञान विकसित करणे म्हणजे “झिरो टू वन” आहे.आता पुढचा बिल गेट्स ऑपरेटिंग सिस्टीम करणार नाही.पुढचे लॅरी पेज किंवा सर्जी ब्रिन सर्च इंजिन बनवणार नाहीत.जर तुम्ही या लोकांची नक्कल करत असाल तर तुम्ही त्यान्च्याकडून काहीच शिकला नाहीत असं म्हणावं लागेल.
एखादी गोष्ट नव्याने बनवण्यापेक्षा तिची नक्कल करणं नेहमीच सोप्प असत. आपल्याला जे आधीच ठाऊक आहे ते जगाला केवळ 1 कडून N ( अंनत ) कडे घेऊन जात म्हणजेच परिचित असणाऱ्या गोष्टीत थोडीशीच सुधारणा होते मात्र प्रत्येक नवी निर्मिती जगाला 0 कडून 1 कडे म्हणजेच एक नव्या टप्याकडे घेऊन जाते. हे पुस्तक तिथं कस पोहचवावं ह्याबद्ध्हल आहे
पीटर थील ह्यांनी शेकडो कंपन्यांना उभ्या केल्या आहेत , अनेक कंपनीना भांडवल / गुंतवणूक देऊन उभं केलं आहे. त्यांचे महत्वाचे अनुभव ह्या पुस्तकात त्यांनी सांगितलं आहे. म्हणून ह्या पुस्तकाला उद्योजकांचं बायबल अशी म्हंटल जात. त्यांचे प्रत्यक्ष अनुभव ह्या पुस्तकात तुम्हला वाचायला मिळेल.
एलॉन मास्क ह्या पुस्त्तकबद्धल म्हणतात - "पीटर थील यांनी आजवर अनेक यशस्वी कंपनीची स्थापना केली आहे. अश्या कंपन्या कशा स्थापन कराव्या हे झिरो टू वन दाखवत"
मला खात्री आहे जस रिच डॅड पुअर डॅड पुस्तक मराठी उद्योजकांना भरपूर प्रेरणा आणि ज्ञान दिल तसंच हे पुस्तक हि त्यापेक्षा जास्त पुढे घेऊन जाईल. ह्या अश्या प्रकारच्या पुस्तकांची आज खऱ्या अर्थाने मराठी उद्योजकना गरज आहे.
https://goo.gl/q2sh2m