"पैशांबाबत अश्या गोष्टी ज्या श्रीमंत आपल्या मुलांना शिकवतात, गरीब व मध्यमवर्गीय शिकवत नाहीत !"
२००६ ला "मंजुळ प्रकाशन" ने हे पुस्तक मराठीत आणलं / अनुवाद केलं. अगदी काही वर्षातच जस इंग्रजी आणि अन्य ५८ भाषेत बेस्ट सेलिंग झालं तस मराठीत हि मोठ्या प्रमाणावर विक्री झाली.रिच डॅड ची मूळ आवृत्ती १९९६ ला प्रथम प्रकाशित झाली. आज २२ वर्ष होऊन सुद्धा हे पुस्तक सार्वकालीन विक्री मध्ये प्रथम आहे. आज रिच डॅड पुस्तक सर्व व्याख्याते, नेटवर्क मार्केटिंग कंपन्या आणि अर्थसाक्षर होऊ पाहणाऱ्या सर्च जण या पुस्तकाविषयी खूप स्तुती करत असतात. वयक्तिक अर्थकारणाचे सार्वकालीन क्रमांक एक चे विक्री झालेले पुस्तक म्हणून रिच डॅड पुअर डॅड प्रसिद्ध आहे. मी रिच डॅड किमान १५ वेळा तरी वाचले असेल आणि अनेक मित्रांना गिफ्ट मध्ये हि दिल आहे.
रिच डॅड पुअर डॅड हे असं पहिलं पुस्तक आहे ज्याने आपला आर्थिक विचारांचा आणि खऱ्या आयुष्यातील संप्पती मिळवण्याचा मार्ग बदलून जातो. हे पुस्तक सर्व आर्थिक विषयातील पुस्तकांचा पाया म्हणायला काही हरकत नाही. पुस्तकात एकूण १० प्रकरणे आहेत. ती खालीलप्रमाणे थोडक्यात समजवून घेऊ
प्रकरण १ - रिच डॅड पुअर डॅड
लेखक रॉबर्ट कियोसाकी मध्यमवर्गीय कुटुंबातील जन्माला आलेले होते त्यांचे वडील एक सरकारी शिक्षक होते ते आयुष्यभर नोकरी आणि पैशासाठी काम करत राहिले त्यांना "पुअर डॅड" म्हंटल आहे तर त्यांच्या लहानपानपासून मित्र असलेल्या माईकचे वडील एक उद्योजक होते, माईकच्या वडिलांनी आपली संपत्ती वाढवत अनेक उद्योग उभे केले त्यांना पुस्तकात "रिच डॅड" म्हंटले आहे. रॉबर्ट कियोसाकी याना त्यांच्या रिच आणि पुअर डॅड दोन्ही वडिलांची पूर्ण आयुष्य पाहता आले. रिच डॅड आणि पुअर डॅड दोन्हीचे विचार परस्पर कसे वेगळे आहेत आणि आपण कोणते विचार आणि कृती निवडायची हे पुस्तकात अनुभव वर्तन केले आहे.
प्रकरण २ - श्रीमंत लोक पैशासाठी
काम करत नाहीत.
गरीब आणि श्रीमंत लोक दोघेही, जेव्हा खिशात पैसे नसतात, तेव्हा संधी मिळेल ते काम करतात, त्यातुन त्यांना जेमतेम पैसे मिळतात, पण गरीब लोक हे पैसे खुप तुटपुंजे आहेत, असा समज करुन घेतात आणि आहेत तेवढे पैसे खर्च करुन टाकतात आणि पुन्हा दुःख व्यक्त करत बसतात, बचत, गुंतवणुक आणि कमाईचे दुसरे मार्ग काहीच नसतात.
श्रीमंत लोक कितीही कमी उत्पन्न असु दे, ते आधी संपत्तीचा रकाना भारतात म्हणजे आधी संपत्ती तयार करतात ज्यातून ते उत्पन्न मिळवू शकतात. ते बचत, गुंतवणूक आणि आर्थिक शिक्षण ला खूप महत्वव देतात.
श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाहीत. ह्याच्याच अर्थ असा की श्रीमंत लोकांचा पैसा त्यांच्यासाठी काम करत असतो. ते आधी आयुष्यभरासाठी संपत्तीचे स्त्रोत उभे करतात आणि मग संपत्तीतून दुसरी संपत्ती उभी करत जातात. गरीब आणि मध्यमवर्गीय लोक हातात आलेल्या पैशाचं महत्व जाणुन घेत नाहीत, त्यांच्या पैशाविषयी नसलेल्या शिक्षणाने तो पैसे ते गमावतात, आणि निष्क्रीय कमाईचे स्रोत उभे करण्याच्या आजुबाजुला दडलेल्या संधी त्यांना दिसत नाहीत.
लेखक सांगतात, रोज कमवणे आणि खाणे हा सापळा आहे, कमवण्याच्या नादात आपल्याला अनेक स्वप्नांचे बळी द्यावे लागतात, आयुष्यातला रस कमी होत जातो, जगणं ही शिक्षा बनु लागते. बहुतांश प्रश्णांचे मुळ पैशामध्ये आहे, तेव्हा हा सापळा तोडा आणि जीवनाचा खरा आनंद घ्या.
प्रकरण ३ - अर्थसाक्षरता
कशासाठी?
पैशाच्या अभावाने चिंताग्रस्त लोक सतत भय आणि लोभ यांच्या छायेखाली वावरत असतात. पैसा त्यांना हवं तसं नाचवतो, लेखक सांगतो, कृपया तुमचं आयुष्य पैशाच्या हाती सोपवु नका, त्याऐवजी तुम्ही पैशावर नियंत्रण ठेवा.आपण आजुबाजुला अनेक उदाहरणे पाहतो, अचानक झटपट श्रीमंत झालेले लोक असतात, जसं की जमिन विकुन भरपूर पैसा आलेले, इन्शुरंसचे पैसे आलेले किंवा मोठ्या रकमेची लॉटरी लागलेले बरेचशे लोक तेवढ्याच वेगाने आलेला पैसा गमावतात, कारण त्यांच्याजवळ आर्थिक साक्षरता नसते, गुंतवणुकीचे ज्ञान नसते."आपण आपल्या आयुष्यात किती पैसा मिळवला ह्यापेक्षा तो किती साठवला आणि वाढवला याला जास्त महत्व आहे."
ह्या प्रकरणात अत्यंत महत्वाचं एक सांगितलं आहे " आपल्याला तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्हाला आकडे वाचता यायला पाहिजे, ताळेबंद आणि हिशोब तुमच्या बुद्धीला आणि मनाला दिसता आला पाहिजे."
पैशामध्ये अफाट शक्ती आहेच, पण त्याच्यापेक्षा मोठी शक्ती म्हणजे आपली बुद्धी आणि मन आहे, त्याचा वापर करुन जास्तीत जास्त पैसा कमवा, पैसा साठवा, पैसा गुंतवा आणि मग त्यातुन मिळालेल्या पैशाचा तुमच्यासाठी वापर करा. पण मालमत्तेचा कॅशफ्लो नेहमी सुरु ठेवा.
प्रकरण ४ - तुमचा उद्योग कोणता?
रॉबर्टने कियोसाकी एक क्वांड्र्ंट मांडला आहे, म्हणजे इतरांसाठी काम करणं, त्यातुन दिर्घकालीन फायदा होत नाही, उलट नोकरीमुळे आपल्याला चाकोरीबद्ध जगायची सवय लागते, मन दुबळं आणि कमकुवत बनतं, परावलंबी असल्याची जाणीव अस्वस्थ करते, पंख छाटले जातात. आपण आपल्या मनाप्रमाणे काम करू शकत नाही. मान्य आहे, नोकरी कोणी स्वेच्छेने करत नाही, मजबुरी असते. पण नोकरी करताना स्वतःचे कौशल्ये विकसित करावे.
पैसा आला कि गरीब आणि मध्यमवर्गीय चैनीच्या वस्तू आधी खरेदी करतात, श्रीमंत दिसण्यासाठी गाडी, दागदागिने आणि बंगले घेतात त्यामुळे ते श्रीमंत दिसतात पण प्रत्यक्षात ते कर्जाच्या डोंगराखाली दबलेले असतात. श्रीमंत लोक आधी मालमत्तेत पैसे गुंतवतात मग त्या मालमतेतून आलेले पैसे ते चैनीसाठी वापरतात.
नोकरी, व्यवसाय आणि उद्योग विषयी ह्या प्रकरणात खूप काही शिकायला मिळेल.
प्रकरण 5
- श्रीमंत लोक कमावतात, खर्च करतात आणि उरलेल्या
पैशात कर भरतात.
गरीब लोक कमवतात, कर भरतात, आणि उरलेल्या
पैशात खर्च करतात.
नोकरी करताना हातात पगार पडण्याआधीच टॅक्स कापुन घेतला जातो, व्यवसायात नियमात राहुन कमीत कमी टॅक्स भरण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. श्रीमंत लोक टॅक्स सिस्टीमचा, बारीकसारीक अकौंटिंगचा अभ्यास करतात, सवलतींचा अभ्यास करतात, त्यांचा वापर करतात. गरीब लोकांजवळ हा पर्यायच नसतो, म्हणुन दिर्घकालीन उद्दिष्ट ठेवुन, प्रत्येकाने व्यावसायिक बनण्यासाठी लेखक आग्रह करतो.
प्रकरण ६ - श्रीमंत लोक पैसा निर्माण करतात.
आपल्या सगळ्यांमध्येच प्रचंड कार्यशक्ती आणि प्रगती करण्याची क्षमता लपलेली आहे, आपल्या सर्वांमध्येच ईश्वरी देणगी लपलेली आहे, पण आत्मविश्वासाच्या
अभावी आपण ती वापरत नाही, स्वतःबद्द्ल शंका घेत आपण मागे राहतो.
जे लोक ह्या दुर्गुणावर मात करतात, ते स्वतःचा आर्थिक बुद्ध्यांक वाढवतात, जोडीला धैर्य वाढवतात, भीती आणि शंका यांच्यावर मात करतात, श्रीमंत बनतात.
श्रीमंत लोक असं तंत्र उभं करतात की त्यातुन आपोआप पैशाची निर्मिती होत जाते.
प्रकरण ७ - शिकण्यासाठी
काम करा, पैशासाठी
नको.
आपल्या प्रत्येकातचं काही ना काही कला आहे, आपण सगळे बुद्धीमान आणि सुशिक्षित आहोत, आपण प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात तज्ञ आहोत, पण श्रीमंत होण्यासाठी तितकं पुरेसं नाही, त्यासाठी आपल्याला आपल्या कलेला आकर्षक स्वरुपात इतरांसमोर व्यक्त करता आलं पाहीजे. त्याची योग्य किंमतीत विक्री करण्याचं कौशल्य असल्यासच आपल्या कलेची जगासमोर चीज होते.
आर्थिक बुद्धीमत्ता म्हणजे अकांउटींग, मार्केटींग, गुंतवणुक आणि कायद्याचं ज्ञान! ह्या चार गोष्टी शिकल्या तर पैशाने पैसा मिळवणं, खरंच सोप्पं आहे.
प्रत्येक गोष्टीची मला थोडी थोडी माहीती असावी, अशी श्रीमंत व्यक्तीचा आग्रह असतो. श्रीमंत लोक नेतृत्वगुण शिकतात, स्वतःला तसं घडवतात. मनातली पुर्ण भीती नाहीशी होईपर्यंत त्या गोष्टीवर काम करत राहतात.
प्रकरण ८ - अडथळ्यांवर
मात करणं.
१ भीती , २ शंका आणि संशय ३ आळशीपणा ४ वाईट सवयी ५ उद्धटपणा हि ५ कारणे आहेत ज्याने आपण आपला पैसा गमावू शकतो. श्रीमंत होण्यासाठी हि ५ अडथळे ह्या प्रकरणात समजवून सांगितली आहेत तसाच ह्यावर उपाय हि दिला आहे.
तुम्हाला जोखीम घेण्याची भीती वाटत असेल तर लवकरात लवकर सुरवात करा, रिटायरमेंट प्लॅन आखा, तुमच्या आर्थिक सल्लागार ला भेटा.
प्रकरण ९ - सुरवात करणं
सुरवातीला सायकल चालवताना आपण पडतो आपटतो पण नंतर आपण तोल सांभाळू लागलो कि पुशे जात राहतो तसंच काही आर्थिक दृष्टया तसंच आहे. जर तुम्ही सुरवात नाही केली तर तुम्ही तुमचा तोल सावरू शकणार नाही.
आर्थिक बुद्धिमत्ता जी जन्मतह मिळालेली असते फक्त ती झोपलेल्या अवस्थेत असते आणि तिला जग करावं लागत असं लेखक म्हणतात.
१ प्रथम शिक्षणात गुंतवणूक करा कारण मन हि तुमची खरी मालमत्ता असते.
२ मित्र काळजीपूर्वक निवडा.
३ सूत्रांवर प्राविण्य मिळवा नवीन व्यवहार पद्दती शिका
४ पुरतं स्वतःला पैसे द्या .
५ कॅशफ्लो , मनुष्यबळ आणि वेळेचं व्यवस्थापन करायला शिका.
प्रकरण १० - अजून हवंय? हे करा
ह्या प्रकरणात पुस्तकाचा मुख्य गाभा वाचायला मिळेल, हे प्रकरण वाचून आपण आपले ध्येय ठरवणे भाग पडतो आणि एक वेगळ्या प्रकारे वाटच सुरु करतो. ह्या प्रकरणात कृती कशी कार्याची हे टप्या टप्याने आणि अतिशय अभ्यासू पद्दतीने आणि सोप्या भाषेत असं सांगितलं आहे.
सतत शिकत रहा, कारण, दुरचा विचार केल्यास शिक्षण ही गोष्ट पैशापेक्षा जास्त महत्वाची आहे. रॉबर्ट कियोसोकीचं हे पुस्तक आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलुन टाकतो. आर्थिक बुद्धिमत्ता आपल्या आयुष्यातील प्रश्न सोडवण्यासाठी कशी मदत करते हे समजवून सांगण्याचा ह्या पुस्तकाचा प्रमुख हेतू आहे.
रिच डॅड पुअर डॅड - रॉबर्ट कियोसाकी