सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

१२ वी पर्यंत शिक्षण, संगोपन एवढीच पालकांची जबाबदारी १२ वी पर्यंत शिक्षण, संगोपन एवढीच पालकांची जबाबदारी

10 Feb 2019 By
943 9 Comments
post-1

सध्य स्थिति :

आज महाराष्ट्रातून कितीतरी तरुण, विद्यार्थी, पालक मला संपर्क साधत आहेत, अनेक प्रश्न विचारत आहेत. मला एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे पालक आपल्या मुलांना पदवी, पदव्युत्तर आणि त्यानंतर काही कित्येक वर्षे कमाईविना फुकट संभाळत आहेत आणि हे पालक गडगंज पैसेवाले नसून साधे नोकरदार वा शेतकरी आहेत. मुलांचे पदवीपर्यंतचे शिक्षण (१७ वर्षे ), नोकरी लागण्यासाठी प्रयत्न व काही वर्षे (३ ते ५ वर्षे), विवाह ठरवणे व करून देणे (२ ते ३ वर्षे) हे सलग करेपर्यंत पालकांचे वय मरणाला जाऊन टेकते.

नोकरदार : 

सर्वसाधारण मुलं जेव्हा पदवीधर होतात, तेव्हा पालकांचे वय ५० असते. त्याबरोबरच घर बांधतात, मुलं नोकरीला लागतात, तेव्हा पालकांचे वय ५५ वर्षे असते. मुलांची लग्न होऊन सुना व जावई येतात, तेव्हा वय ६० ओलांडलेले असते. वयाच्या ६० झाल्यानंतर अनेक आजार व आरोग्याचे प्रश्न सुरू होतात, औषध पाण्यावर खर्च होऊ लागतो. घर बांधले त्याचे हफ्ते फेडले,२० वर्षे मुलांना शिक्षण दिले, नोकरी लावली, त्यांची लग्न केली. जो पगार येतो त्यातला ५%  सुद्धा स्वत:च्या व धर्मपत्नीच्या सुखासाठी उरला नाही. ज्या धर्मपत्नीने आपल्याला आयुष्यभर साथ दिली, तिला आपण कधी हॉटेलला जेवायला घेऊन गेलो नाही, तिच्या वाढदिवसाला पार्टी केली नाही, कुठे थंड हवेच्या ठिकाणी पर्यटनाला घेऊन गेलो नाही, हे वयाच्या ६० व्या वर्षी लक्षात येत.

ज्यांच्यासाठी केले : 

मला एक डॉक्टर मित्राने मला एक भयानक वास्तव सांगितले. महाराष्ट्रात ५०% हून अधिक वृद्ध लोकांना गुडघेदुखीचा त्रास आहे, त्यांना सर्जरी करण्यासाठी ३ लाख रूपये खर्च आहे. परंतु त्यांची मुलं त्यांना पैसे देत नसल्याने तसे उपचार होत नाहीत. म्हातारा-म्हातारी एक दोन वर्षात मरणारच आहेत तर कशाला खर्च करायचा ? असा मुलांचा विचार असतो व एकाच मुलाने व कोणत्या मुलाने पैसे घालायचे ? हा प्रश्न असतो. आज बऱ्याच ठिकाणी बघतो, वृद्ध व्यक्तीचं निधन झालेनंतर १३ वा दिवस ५ दिवशीच उरकला जातो, कारण मुलांना त्यांच्या नोकरीमुळे १३ दिवसांची सुट्टी मिळत नाही. त्यामुळे १३ व्याचा कार्यक्रम ५ व्या दिवशी उरकतात . ज्या मुलांसाठी पूर्ण आयुष्य वेचले, त्यांच्याकडे तुमच्या पश्चात १३ दिवस ही वेळ काढता येत नाही, तुमच्या निधनानंतर केवळ १५ दिवसाच्या आत संपत्तीची वाटणी होते.

स्वत:चे आयुष्य :

 पालकांना माझे एवढेच सांगणे आहे की, प्रथम स्वत:चे आयुष्य जगा. तुमच्या ऐपती नुसार मुलांना फक्त १२ वी पर्यंतचे शिक्षण द्या, त्यानंतर त्यांना पार्टटाइम नोकरी व व्यवसाय करून शिक्षण व जगण्याएवढा पैसा स्वत: कमवण्यास सांगा. ऐत खाऊ सवय तुम्ही लावली तर तुम्ही तुमच्या कुंटुबाचा सर्वनाश स्वत: करीत आहात, हे लक्षात घ्या. उतारवयामध्ये आजाराला सामोरे जावे लागू नये, यासाठी आतापासूनच चांगला आहार घ्या. स्वत:चा जीव मारून मुलांची शिक्षण, घर, लग्न, नोकऱ्या करू नका. १२ वी नंतरच तुमच्या मुलाला काम करण्याची सवय लागली की त्याला जग, पैसा, मेहनत याचे महत्व कळेल. आयते बसून घातले तर तो पोल्ट्रीच्या कोंबडीप्रमाणे केवळ मांसाचा गोळाच होईल. उलट त्याला व्यवसायाच्या जगात लवकर सोडले तर तो गरुडाप्रमाणे ताकदवान, शूर, चपळ, चाणाक्ष व स्वावलंबी होईल, १८ वर्षे पूर्ण झालेला देश चालवू शकतो, मग स्वत:च आयुष्य का नाही ?

Share This:
Tags :

प्रतिक्रिया

ashok Patil on 16 Nov 2021 , 2:33PM

right

योगेश प्रभाकर on 08 Apr 2020 , 10:35PM

सुंदर माहिती दिली आहे......

suvarna baburav Otari on 09 Mar 2020 , 10:08AM

barobar ahe

Sachin ghatage on 23 Apr 2019 , 8:45AM

Good sir

SANJAY NARAYAN KHARADE on 06 Apr 2019 , 10:48AM

आम्ही असाच विचार करू

विशाल आव्हाड on 28 Mar 2019 , 10:50AM

खूप मस्त लेख

Sanjay on 28 Feb 2019 , 4:53PM

अरे प्रतिम विचार

akshay raghuvir lad on 16 Feb 2019 , 8:04PM

khup chan.mast.

रणजित नाटेकर on 10 Feb 2019 , 4:27PM

सुंदर

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...