आपल्या सर्वांचे आर्थिक जीवन दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. प्रश्न हा आहे की याबाबाबत तुम्ही काय करणार आहात? तुमच्या आत्ताच्या आर्थिक परिस्थिती बद्दल रडत बसणार आहेत की इतरांना दोष देत बसणार आहात? तुम्हाला जर तुमचे आर्थिक जीवन एका उंचीवर नेऊन ठेवायचे असेल तर तुम्हाला संपत्ती निर्माण करावी लागेल. तुमच्या भविष्याचा ताबा मिळवण्यासाठी तुमच्या उत्पन्नाचे स्रोत तुम्हाला वाढवावे लागतील आणि अनावश्यक खर्चाना नियंत्रित करावे लागेल आणि तेही आजच! हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा पती-पत्नी दोघांमध्ये आपल्या आर्थिक जीवनाबद्दल स्पष्ट चित्र तयार आहे.
गेल्या ३ वर्षात आम्ही जवळपास २०० परिवारांचे आर्थिक नियोजन करून दिले आणि त्यामध्ये आम्हाला जाणवलेली एक महत्वाची गोष्ट म्हणजे, ‘जोपर्यंत पती आणि पत्नी यांच्यामध्ये स्वतःच्या आर्थिक जीवनाबद्दल एकवाक्यता येत नाही तोपर्यंत ते त्यांची भविष्यातील आर्थिक ध्येयं गाठू शकत नाहीत’ कारण बहुतेक वेळा जेव्हा आम्ही दोघांना समोर बसवून आर्थिक ध्येयाबद्दल विचारतो तेव्हा पुढील अनुभव येतात.
वरील आम्हाला आलेले अनुभव आहेत आणि तुम्हीही असे मतभेद आजूबाजूला किंवा स्वतःच्या परिवारातही झालेले पहिले असतील हो ना? यातून काय साध्य होतं माहितेय तुम्हाला? खरं तर काहीच नाही. कारण जोपर्यंत तुम्ही एकमेकांच्या आवडी-निवडी, एखाद्याचे म्हणणे एकूण त्यावर विचार करून एक स्पष्ट ध्येय ठरवत नाही तोपर्यंत ते ध्येयच होऊ शकत नाही आणि जिथे ध्येय नाही ते साध्य होणारच कसे?
आपण जेव्हा सुट्टीमध्ये कुठे फिरायला जायचे नियोजन करतो तेव्हा असे मतभेद असतात का? पतीला वाटतयं केरळला जाऊया आणि पत्नीला वाटतयं हिमाचलला जाऊया. अश्या परिस्थितीमधे तुम्ही नियोजन करू शकता का? घराबाहेर निघू शकता का? नाही ना? आणि पत्नी ने जबरदस्ती हिमाचलला जाणे ठरवले तर पती त्या सुट्टीचा आनंद घेऊ शकतो का? असेच काहीतरी आपल्या आर्थिक जीवनाचे असते आणि अशावेळी ज्याप्रमाणे आपण भारतीय आपले वैवाहिक जीवन एकमेकांना समजून घेऊन व्यतीत करतो तसेच आर्थिक जीवनातही एकमेकांना समजून घेणे आले, तडजोड आली आणि यातूनच पुढील आर्थिक भविष्याचा वेध घेता येईल.
लक्षात ठेवा पती आणि पत्नीही बैलगाडीची दोन चाके आहेत त्यामुळे त्यांच्यामध्ये कमालीचा समतोल, सामान वेग, असायला हवा जेणेकरून आयुष्याच्या उत्तरार्धात अमिताभ-हेमा मालिनी सारखे बागबान होण्याची वेळ येणार नाही. मुले मोठी होतील, स्वतःच्या विश्वात रममाण होतील तेव्हा तुमच्याकडे १ BHK आहे की २ BHK यापेक्षा एकमेकाला कसे समजून घेतलेत एकमेकांच्या इच्छांसाठी कशाप्रकारे मेहनत केलीत याला जास्त महत्व असेल. हो ना?
***************************
तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "
मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa