सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

भारत : एक आर्थिक महासत्ता भारत : एक आर्थिक महासत्ता

27 Nov 2018 By श्री. महेश चव्हाण
974 3 Comments
post-1

श्री. महेश चव्हाण

तुम्ही जर शेअर बाजारात गुंतवणूक सुरुवात करण्याचा विचार करत असाल तर पहिल्यांदा तुम्ही ज्या भारतीय बाजारात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेत आहात त्या भारतातील बाजारपेठेबद्दल तुम्हाला आशावाद असेल तरच तुम्ही शेअर बाजारामध्ये गुंतवणुकीला सुरुवात करा. माझे हे विधान तुम्हाला आवडणार नाही पण शेअर बाजार गुंतवणूक म्हणजे वेग-वेगळ्या उद्योगधंद्या मध्ये केली जाणारी गुंतवणूक होय. त्यामुळे जर तुम्हाला भारतातील उद्योगधंद्यावर, इथे असलेल्या ग्राहकांच्या क्षमेतवर, सरकारी धोरणावर जर विश्वास नसेल तर तर तुम्ही गुंतवणुकीत आशावाद निर्माण करू शकत नाही आणि त्यामुळे तुम्ही अपयशी होऊन बाहेर पडाल. 

भारतामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या भारताला इतरांपेक्षा वेगळे करतात ज्यामुळे परकीय गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर भारताकडे आकर्षित होत आहेत हे पाहणे गरजेचे आहे. जिथे पिकते तिथे विकत नाही ही म्हण अगदी या परिस्थितीला सार्थ होते कारण आज मोठ्या परदेशी कंपन्या भारतामध्ये उद्योगधंदे उभे करून ग्राहकाच्या पसंतीच्या जागतिक दर्जाच्या वस्तू आणि सेवा ग्राहकांना पुरवीत आहेत आणि त्याच बरोबर मोठ्या प्रमाणावर नफा कमवत आहेत.

इतर देशापेक्षा भारताला वेगळे करणारे घटक आपण पाहूयात.

१. युवा वर्ग :- आज आपण प्रत्येकाने आपल्या शालेय जीवनात लोकसंख्या एक समस्या हा निबंध लिहिला आहे. पण हीच लोकसंख्या आज युवा वर्ग म्हणून समोर येत आहे. १२० कोटी मधील निम्म्याहून जास्त लोकसंख्या ही ३० वर्षाची आहे. ही लोकसंख्या कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासासाठी महत्वाची आहे. आपल्या नंतर थेट क्रमांक लागतो तो म्हणजे चीनचा आणि त्यांची सरासरी आहे ४६ वर्ष. आज आपण पाहतो १०-१२ वी शिक्षण झालेली मुले-मुली आपले शिक्षण करत करत मॉलमध्ये काम करत आहेत आणि त्यांना मिळणाऱ्या उत्पनावर एक ग्राहक म्हणून बाजारात वावरत आहेत त्यामुळे एक मोठी बाजारपेठ म्हणून भारतीय बाजाराकडे पाहिले जात आहे.

२. महिला वर्ग :- २००१ च्या सर्वेक्षणानुसार भारतामध्ये ४% महिला नोकरी-धंद्या मध्ये कार्यरत होत्या. २०१४ च्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण १४% आहे आणि येत्या काळात हे प्रमाण २५% च्या वर जाईल. आतपर्यंत महिलांना ग्राहक पेठेत मोठे स्थान नव्हते पण स्वतःकडे आलेल्या उत्पनाच्या जोरावर त्याही बाजारात स्वतःच्या मर्जीनुसार खरेदी करत आहेत.

३. ग्रामीण वर्ग :- भारतातील अजूनसुद्धा निम्मी लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. गेल्या १० वर्षात रिअल इस्टेटचे वाढलेले दर, ग्रामीण भागातील राहणीमानाचा उंचावलेला स्तर, डिजिटल क्रांती मुळे घराघरात पोहचलेले स्मार्टफोन आणि इंटरनेट त्यामुळे ग्रामीण वर्गही आज मोठं-मोठ्या कंपन्यांच्या रडारवर आहे जो आतापर्यंत दुर्लक्षित होता.

या वरील तिन्ही घटकांचा एकत्रितपणे परिणाम भारतातील उद्योगधंद्यावर होतो आणि ज्या कंपन्या ह्या ग्राहकाच्या गरजा ओळखून आपल्या सेवा आणि उत्पादने त्यांना पुरवत आहेत त्या नक्कीच चांगल्या नफ्या मध्ये आहेत. आज आपण भारतीय शेअर बाजार मध्ये गुंतवणूक करणार असू तर आपल्याला अशा कंपन्या शोधाव्या लागतील ज्या ग्राहकांच्या मनावर अधिराज्य तर गाजवत आहेतच पण त्याच बरोबर जबरदस्त नफा आपल्या शेअर होल्डर्सना सुद्धा करून देत आहेत. पुढील लेखात अशा कंपन्या कशा निवडाव्या ते पाहूया आणि काही कंपन्यांची उदाहरणे ही पाहूया. पुढील १०-१५-२० वर्ष भारताची आहेत त्यामुळे अभ्यास करा. नक्कीच तुम्ही खूप संपत्ती कमवाल.


***************************

तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa

Share This:

प्रतिक्रिया

योगेश प्रभाकर on 21 Apr 2020 , 8:53PM

खूपच सुंदर माहिती दिली आहे.......

gajendra on 08 Jan 2019 , 11:36PM

dip knowledge share

Nitin Ratanlal Tapar on 04 Dec 2018 , 9:41PM

thanks

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...