आर्थिक विषयक रंजक किस्सा नंबर २
९ मे २००८ शेअर बाजारात ब्रोकिंग च्या व्यवसायाला सुरू होऊन जवळपास महिना झाला होता. सुशील फायनान्स या एका छोट्या पण नावाजलेल्या ब्रोकिंग कंपनीचा चॅनल पार्टनर म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. २००६ पासून शेअर बाजार ट्रेडिंगची सुरुवात झाली होती. त्यानंतर एम बी ए संपल्यावर शेअर बाजारात आम्ही स्वतःची ब्रोकिंग फर्म स्टार्ट केली होती.
नवीन नवीन व्यवसाय असल्याने एक अकाउंटट स्टाफ सोडला तर पार्टनर मनोज आणि मी आमच्या ७०-८० क्लाइंट चे व्यवहार पाहत होतो. नवीन नवीन व्यवसाय होता. शेअर बाजार ओपन होण्याआधी सकाळी नऊच्या आधी ऑफिस ओपन करून शेअर बाजाराचे ट्रेडिंगचे बोल्ट ओपन करून पॅच फाईल डाऊनलोड कराव्या लागायच्या. नेहमीप्रमाणे सर्व डाउनलोड करून शेअर बाजार ट्रेडिंग ला सुरुवात केली. त्यावेळी जास्त अनुभव नसल्याने कुठून तरी कोणताही अभ्यास न करता ऐकीव माहितीवर ट्रेडिंग करण्याकडे जास्त कल होता. असाच इकडून तिकडून माहिती आम्ही घेऊन आम्ही ट्रेडिंग करायचो. (आणि अश्याच माहितीवर शेअर बाजरात श्रीमंत होता येते यावर आम्हाला ठाम विश्वास होतो) २००६-२००८ या तेजीच्या बाजारात ही आम्ही असेच पैसे कमावले होते.
तेव्हा CNBC आवाज आमच्या ऑफिसमध्ये सतत चालू असायचा. सकाळी सव्वा नऊला मार्केट ओपन होण्याआधी त्यावर आज के धमाकेदार स्टॉकस म्हणून झटपट न्यूज यायच्या. त्यात खाली KGN Industries ही छोटी कंपनी आज रिलिस्ट होणार आहे. (रिलिस्ट म्हणजे कंपनीवर काही गुन्हे किंवा कायदेशीर बाबी पूर्ण नसल्यास काही काळासाठी त्यातील ट्रेडिंग बंद केली जाते) अशी माहिती होती. शेअर्स आज रिलिस्ट होणार असल्याने IPO जसा लिस्ट होतो तसा चांगलंच वाढणार आहे असा साधे लॉजिक मी लावले. यात आज थोडी रिस्क घेऊन ट्रेड करु आणि आज चांगला नफा पदरात पाडून घेऊ असे मनात पक्के केले. २००८ ला व्हाट्सएप वैगरे न्हवते अश्या वेळी CNBC आवाज वर आलेली टीप म्हणजे अस्सल खणी सोनेच.
९.१५ ला मार्केट ओपन झाल्या झाल्या या कंपनीचा शेअर्स ज्याची किंमत १० रुपये होती तो ७२ ला ओपन झाला म्हणजे जवळपास ७ पट किंमतीला. किंमत १० रुपये असल्याने मी १०००० शेअर्स खरेदी करण्यासाठी टाकले... पण रेट डायरेक्ट ७ पट गेल्याने खरेदी ऑर्डर तर गेली नाहीच पण आपल्याला जर मिळाला असता तर १ लाखाचे ७ लाख झाले असते अशी भावना मनात आली आणि चांगलाच चान्स हुकला म्हणून दुसऱ्या कामाला लागलो. शेअर्स ७०-८० वर हेलकावे खात होता.
आता यात हात घालू नको म्हणून पार्टनर मनोज ने आधीच अलर्ट केले होते. १०.३०- ११ च्या दरम्यान बाकीची कामे करून चहा प्यायला बाहेर गेलो तेव्हा ऑफिसमधून स्टाफ चा कॉल आला.
तो : सर KGN Industries पाहिलात का??
मी : " माझा दुःखी आत्मा करून "साला गेला हातातून"
तो : अहो सर आता पाहिलात का ??
मी : बाहेर आलोय कसे पाहणार ?? नाही रे....
तो : सर ८०० झाला KGN Industries
मी : फोन ठेव मस्करी करू नको. (मनात सकाळी १०००० घेतले असते तर..... आता ८० लाख झाले असते....मग मन अजून दुःखी झाले)
तो : सर ऑफिस मध्ये या आणि बोल्ट बघा मग कळेल
मी : येतोय.....
तिथून तडक ऑफिस ला गेलो.... पाहतो तर KGN १०००-१२०० च्या मध्ये ट्रेड होत होता. पण खरेदी विक्री खूपच कमी होती. ऑफिस मध्ये सारे माझ्या बोल्ट मागे.... मागून मनोज एकच सांगत होता काहीतरी गडबड आहे....
पण तेव्हा कुणाचे ऐकणारे मी कुठे होतो. १० शेअर्स खरेदी करायला ऑर्डर टाकली.... १२०० x १० शेअर्स = १२००० चा ट्रेड झाला काही क्षणात शेअर्स २४०० झाला. १० विकून २४००० प्रमाणे १२००० पदरात पाडले. आणि मग जे काही घडले.... तिथून तो शेअर्स..... ४८०० अश्या दुपटीने वाढायला लागला.... मग काय नेहमी प्रमाणे मनोज मागून सांगत होता..... महेश नको घेऊ.... पण एक शेअर्स घेतला ४००० ला तो परत ८००० झाला तिथे तो विकला. आणि मग तिथून शेअर्स पुढील ५ मिनिटांत १००००-१६०००-३२०००-४८००० असे करत ५५००० ला ट्रेड झाला आणि काही कळायच्या आत एक्सचेंज मधून ट्रेडिंग बंद करण्यात आली.
१६००० मिळाल्याचा गम न्हवता तर ८-१० लाख मिळाले असते या विचारात होतो... ट्रेडिंग बंद झाली आणि क्षणातच मला आमच्या ब्रोकर च्या ऑफिस मधून आमच्या Relationship Manager चा कॉल आला.
RM : महेश जी आपके अकाउंट में जो आज ट्रेडिंग हुई है इस ट्रेडिंग की आपको कैसे जानकारी मिली ??
मी : घडलेला सर्व प्रकार त्याला सांगितला.
RM : सर इस ट्रेडिंग में fraud हुवा है | इसीलिए एसके ट्रेडिंग बंद हुई है
मी : नहीं सर मेरे को इस बात का कुछ पता नही है
RM : इस स्टॉक में जो आज ट्रेडिंग हुई है..... वो ऑपरेटर ने किया है..... अब इसमें इन्वेस्टिगेशन होगा.
मी : अरे सर ... पर मुझे यह कुछ मालूम नहीं है
RM : महेश जी मै देखता हु थोडा टाईम मुझें देदो.
असे म्हणून त्याने फोन ठेवला इथे मला इन्वेस्टिंगेशन टीम आणि मी एकटा असे भविष्य दिसायला लागली. झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अशी चूक करून बसलो कि इन्वेस्टिंगेशन जर माझ्या विरोधात गेले तर करियर सुरुवात होण्याआधीच संपते की काय असे वाटू लागले. इकडे मनोज ने चांगलेच तासायला सुरुवात केली होती. पण मला काही ऐकायला येत न्हवते. अश्याच वेळी परत RM चा कॉल आला....
RM : आपको शेअर्स Price पे २०% - ३०% पेनल्टी भरनी पड़ेगी और जो हुआ उसका सब Declaration देना पड़ेगा.
मी : ओके सर. बोलून फोन ठेवला.
दोनच दिवसात मला १६००० पेंनल्टि भरण्याचे लेटर आले.... त्यासोबतच डिक्लेरेशन ही लिहून दिले. झटपट ४-५००० नफा पदरात पाडून घ्यायच्या नादात १६००० पेंनल्टि भरावी लागली होती. त्यामुळे डिक्लेरेशन एकदम नीटनेटके लिहून दिले. १६००० तर भरावेच लागणार होते पण अजून काही ससेमिरा मागे लागून नये यासाठी सर्व खटाटोप चालू होता.
असेच दिवस ६ महिने गेले आणि नोव्हेंबर मध्ये अकाउंट चेक करताना माझ्या अकाउंट ला ६५००० रुपये क्रेडिट झालेले मी पाहिले. ते कसले ते कळत न्हवते.... ती स्टेटमेंट काढून RM ला पाठवली. त्याला ही काही कळत न्हवते. मार्केट बंद झाल्यावर पाहूया असे म्हणून फोन ठेऊन दिला.
मार्केट झाल्यावर मी न राहून ४ वाजता RM ला कॉल केला त्याने जे सांगितले त्यावर मला माझा विश्वासच बसेना...
KGN मध्ये ज्यांनी ट्रेडिंग केली होती त्यात ज्यांचा सहभाग नव्हता अश्या इन्व्हेस्टर लास्ट ट्रेडेड किंमत हि सेटलमेंट किंमत आणि भरलेली पेंनल्टि अशी ठराविक रक्कम माझ्या अकाउंट ला क्रेडिट झाली होती. अश्याप्रमाणे KGN INDUSTRIES च्या झटपट ट्रेडिंग मध्ये आधी नफा मग पेनल्टी आणि मग परत नफा माझ्या पदरात पडले होते. या प्रकरणानंतर अश्या खूप संधी आल्या पण झटपट पैसा कमावण्याचा शॉर्टकट दिसताना सोपा असतो पण त्यामागे छुपा मानसिक त्रास मागे लागतो हे कळाले.
रंजक किस्स्या मागील आर्थिक साक्षरता : कोणताही शेअर्स जेव्हा लिस्ट होतो (IPO) किंवा रिलिस्ट होतो (काही कंपन्या वर कायदेशीर कारवाई चालू असेल किंवा नियमबाहय कार्य केल्यास त्यांना स्टॉक मार्केट मधून डीलीस्ट केले जाते....तेव्हा परत या कंपन्या रिलिस्ट होतात) तेव्हा त्या दिवशी त्यांच्या चढ-उतार यावर स्टॉक एक्सचेंज चे कोणतेही बंधन नसते. त्यामुळे एकाच दिवशी तो स्टॉक कितीही चढू किंवा पडू शकतो. KGN INDUSTRIES च्या ऑपरेटर्स ने याचाच फायदा घेऊन ठराविक लोकांनी शेअर्स ची किंमत वाढवत तिथे नेली. सेम तसेच जसे बदमाश कंपनी मधील हिरो त्याच्या साथीदार सोबत घेऊन रियल इस्टेट च्या किंमती वाढवतो त्याप्रमाणे. यामध्ये वरच्या किंमतिला शेअर्स घेणारे अडकून रहातात आणि कमी किंमतीतले शेअर्स विकून ऑपेरेटर्स पसार होतात. यासाठीच कंपनी ची फक्त किंमत पाहू नका तर त्याचा मालक काय करतो, मॅनेजमेंट मध्ये नक्की कोण आहे, प्रोडक्त्त काय आहेत, कंपनी नुकसानीत आहे कि नफ्यात हे सर्व पाहून गुंतवणूक करा.
***************************
तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa