माझ्याकडे २-३-५ लाख आहेत कोणता व्यवसाय करू ??? अशा पोस्ट आपल्याला फेसबुक व्हाॅट्सअॅप ग्रुप वर सतत येत असतात... त्या संदर्भात काही महत्वाचे मुद्दे.
१. तुमच्याकडे ठराविक रक्कम आहे म्हणून तुम्ही व्यवसाय सुरू करून यशस्वी होण्याची स्वप्ने पाहत असाल तर जरा थांबा आणि नीट विचार करा. (जसे तुमच्याकडे बॅट आणि बॉल आहे म्हणून तुम्हाला कोणी क्रिकेट संघात घेईल का?)
२. फेसबुकवर व्हाॅट्सअॅप वर मेंबर विविध स्तरातील असतात प्रत्येक जण तुम्हाला त्याच्या अनुभवावरून व्यवसाय सांगेल तो व्यवसाय तुमच्या गावात, शहरात चालेलच असे नाही.
३. व्यवसाय सुरू करण्याआधी त्या व्यवसायात १-२ वर्षे नोकरी करता येते का पहा.
४. आज नोकरी मिळत नाही म्हणून खूप तरुण मुले आई-वडिलांकडून भांडवल घेऊन व्यवसाय चालू करायची घाई करतात. घाई न करता त्या व्यवसायातील यशस्वी किंवा अयशस्वी लोकांच्या भेटी घ्या.
५. २-३-४ लाख ही सर्व रक्कम व्यवसायावर लावू नका. व्यवसाय चालू झाल्यावर खर्च जाऊन कमाई हातात यायला कधी कधी वर्षे लागते त्यामुळे घर खर्च ची पण तरतूद करून ठेवा.
७. व्यवसाय चालू केल्यावर असंख्य गोष्टींना तोंड दयावे लागते यासाठी सुरुवातीपासूनच आपली कागदपत्रे परवाने याची कायदेशीर पुर्तता करुन ठेवा.
८. व्यवसाय करणे हे सांघिक काम आहे त्यामुळे आपला संघ आधी निवडायला घ्या…नाहीतर ऐन वेळेला भेटेल त्यातून कामगार किंवा सोबती निवडावे लागतात.
९. खुप वेळेला आपल्याला भांडवल देणारे जवळचे मित्र परिवार असतात… कितीही जवळचे असतील तर त्याचा मोबदला किंवा परतावा आधीच ठरवा.
१०. त्या त्या व्यवसायातील जाणकार मेंबर कडून सल्ल्ला मागा…डायरेक्ट पोस्ट टाकून १०० सल्ले घेऊन विचारात पडण्यापेक्षा योग्य व्यक्तीशी चर्चा करा.
***************************
तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "
मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa