श्री. महेश चव्हाण
शेअर बाजार आणि शेअर्समधील गुंतवणूक म्हटले कि सामान्य माणसे दूर राहणेच पसंत करतात. परंतु त्यांच्या या मतामुळे किंवा कृतीने ते एक चांगली संधी दवडत आहेत असतात. कारण शेअर बाजारामध्ये तोटा सहन कराव्या लागलेल्या लोकांची त्यांना माहिती असते. अभ्यासपूर्वक गुंतवणुकीच्या माध्यमातून शेअर बाजारात हजाराचे करोडोत रूपांतर करणारे अनेक यशस्वी गुंतणूकदार आज भारतीय शेअर बाजारात आहेत. जर हे लोक करू शकत असतील तर एक सामान्य गुंतवणूकदारही आपल्या बुध्दीचा योग्य वापर करून आपल्या भविष्यातील आर्थिक गरजांसाठी चांगली संपत्ती बनवण्याची क्षमता ठेवत असतो. फक्त त्याला योग्य मार्गदर्शनाची आणि स्वतः ला आर्थिक रित्या एका वेगळ्या स्तरावर नेण्यासाठी कराव्या लागणाऱ्या अभ्यासाची गरज आहे. शेअर बाजारातून संपत्ती निर्माण करणे अवघड आहे पण अशक्य नाही.
तर चला मग करूया शेअर बाजारातील गुंतवणुकीचा श्री गणेशा......
शेअर बाजारात गुंतवणूक म्हणजे शेअर्स घेणे आणि विकणे आणि या व्यवहारातून नफा पदरात पाडून घेणे असे प्रत्येक नव्या गुंतवणूकदाराला वाटते आणि यातून फक्त शेअर्स ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीतून मी माझे घर चालवू शकतो का ? असा प्रश्न प्रत्येक नवख्या गुंतवणूकदाराला पडतो..... तर त्याचे उत्तर नाही असे आहे कारण शेअर बाजाराकडे उत्पन्नचा दुसरा स्तोत्र म्हणून पाहायला हवे. मुख्य स्तोत्राचे उत्पन्न म्हणजे आपण जे शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनियर , अकाउंटंट, हॉटेल व्यवसायिक किंवा इतर जे काही बनलो आहोत त्यातून आलेले उत्पन्न होय. थोडक्यात जेव्हा आपण शेअर बाजाराचा श्रीगणेशा करायाचा विचार कराल तेव्हा नुकतेच नोकरीला लागलेले, अविवाहित असतो ज्यांच्यावर परिवाराच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी नसते किंवा अल्प प्रमाणात असते किंवा एखाद्या नामांकित कंपनीच्या उच्च पदावर काम करणारे मोठे अधिकारी असतात किंवा इतर लग्न झालेली माणसे असतात त्यांच्यावर बऱ्यापैकी परिवाराची जबाबदारी असते. प्रत्येकाला घर चालवण्यासाठी लागणारा पैसा हा मूळ नोकरी-धंदयातूनच यायला हवा असे एक ढोबळ मात्र प्रभावी सूत्र आहे. या मूळ नोकरी-धंद्यातील बचतीचा पैसा शेअर बाजारात गुंतवणूक करून उत्पन्नचा दुसरा स्त्रोत्र किंवा भविष्यातील गरजां ज्या महागाई नुसार वाढत जाणार आहेत त्याच्या तरतुदीसाठी करू शकतो.
हल्लीच्या सतत बदलत जाणाऱ्या राहणीमानाबरोबरच उत्त्पन्न वाढीला मर्यादा निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत शेअर बाजाराकडे गुंतवणुकीचे एक चांगले साधन म्हणून पाहण्याची गरज आहे. अभ्यासपूर्वक केलेल्या गुंतवणुकीवर वार्षिक १२-१५% परतावा आणि तो सुद्धा करमुक्त मिळवता येऊ शकतो. शेअर बाजारात जवळपास ६००० कंपन्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी २००० च्या आसपास शेअर्स मध्ये व्यवहार होतात. आणि १००-२०० शेअर्सची नावे या ना त्या कारणाने टी .व्ही चॅनेल , वर्तमान पत्रामध्ये गाजत असतात. BSE आणि NSE असे दोन मुख्य स्टॉक एक्सचंजेस आहेत. BSE चा निर्देशांक सेन्सेक्स आहे (या मध्ये ३० कंपन्या ) आणि NSE चा निर्देशांक निफ्टी आहे (या मध्ये ५० कंपन्या) हे दोन्हीही निर्देशांक त्यात समाविष्ट असलेल्या कंपन्यांच्या दर ३ सेकंदाच्या हालचालीवर काढला जातो. सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.१५ ते दुपारी ३.३० पर्यंत शेअर बाजार चालू असतो. शेअर बाजारात होणारे व्यवहार हे ऑनलाइन किंवा ऑफलाईन ( ब्रोकर द्वारे ) करता येतात.
शेअर बाजाराचा श्री गणेशा करताना काही गोष्टी आपल्याकडे असल्याचं पाहिजेत.
1. थोडा धोका पत्करण्याची क्षमता
2. रोज नवीन शिकण्याची तयारी
3. थोडे नुकसान सोसण्याची तयारी
4. दीर्घकालीन ध्येय
5. शिस्त, शिस्त आणि शिस्त
वरील गोष्टीशी तुम्ही तयारी केली असेल तर "शेअर बाजार तुमच्यासाठी श्रीमंतीचे दरजावे तुमची वाट बघताहेत. कारण लक्षात ठेवा शेअर बाजार अनिश्चिततेने भरला आहे पण या अनिश्चिततेत भविष्याच्या संधी उपलब्ध आहेत".
पुढील भागात आपण शेअर बाजारातील तांत्रिक बाजू समजून घेऊ जसे कि डिमॅट अकाउंट कुठे ओपन करायचे?, काँट्रॅक्ट नोट म्हणजे काय? ट्रेडिंग चे व्यवहार कसे होतात ? ब्रोकर कसा निवडावा? ट्रेडिंग वर चार्जेस किती आणि कसे असतात? मोबाइल ट्रेडिंग कशी करायची ? आणि खूप काही.
लक्षात ठेवा "Patience is the Name of Game" त्यामुळे Patience ठेवा या मालिकेत शेअर बाजार गुंतवणूक संबंधी सर्व मार्गदर्शन करणार आहोत.
***************************
तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa