सुविचार
तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .
डाउनलोड मोबाईल ॲप
मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
कोरोना काळात लॉकडाउन मुळे सारे जग स्तब्ध झाले... कुणाचा व्यवसाय बंद पडला तर कुणाची नोकरी गेली... महिन्याचा घरखर्च कसा चालवायचा यासाठी मार्ग काढण्यासाठी काहींनी शेअर बाजारात झटपट डेली कमाई करण्याचा मार्ग निवडला... या संधी चे सोने करत काही ब्रोकर्स कंपन्यानेही फ्री डिमॅट अकाऊंट च्या ऑफर बाजारात आणल्या... हातात असलेला स्मार्ट फोन + दिवसाला 2 जीबीचा डेटा पॅक + सेविंग खात्यात उरलेली बचत + व्हाट्सएप ग्रुप मधून मिळणाऱ्या टिप्स + आणि फावला वेळ.... या चक्रव्यूहात अलगदपणे काही जण अडकले आणि लाखाचे बारा हजार करून बसले तर काहीजणांनी हजारांचे लाख केले... अश्या परिस्थिती मध्ये नुकसान पदरी पडल्याने काय करावे आणि नफयात असणार्यानी काय करावे यासाठीचा आजचा लेख प्रपंच.... कमाई थांबू शकते पण खर्च कधीच थांबत नाहीत अश्यावेळी जवळ ३-४ महिन्यासाठी लागणाऱ्या घरखर्चाची तरतूद नसल्याने लॉकडाउन मध्येही कमाई कशी करता येईल यावर मार्ग शोधताना नेटवर्क मार्केटिंग, MLM, इन्शुरन्स सल्लागार अश्या एक ना अनेक मार्ग चाचपडत बहुतेक जणांनी शेअरबाजारात ट्रेडिंग करून दिवसाला आपल्याला १०००-२००० सहज कमावता येतील यावर शिकमोर्तब केले कारण नेटवर्क मार्केटिंग किंवा इन्शुरन्स सल्लागार वैगरे काम करायचे म्हणजे विक्री करावी लागणार त्यापेक्षा शेअर बाजार मध्ये ट्रेडिंग म्हणजे आपणच आपले मालक...... आपलेच दात आणि आपलेच ओठ.... नफा झाला तरी आपला आणि नुकसान झाले तरी आपलेच.... म्हणजेच काय एकदम झटपट सुरुवात आणि दिवसाला नफा. त्यात आत्मविश्वास वाढवायला व्हाटसऍप वर येणारे मेसेज, जाहिराती, फेसबुकच्या पोस्टच्या माध्यमातून दाखवलेले नफ्याचे गणित... म्हणजे काय कोणीही शेअर बाजारात उतरा दिवसाला तुम्ही १०००-२००० कमवणारच असे वातावरण सगळीकडे. त्यात लोकडाऊन ची संधी पाहून बहुतेक ब्रोकर्स ने फ्री डिमॅट अकाउंट आणि २०-४० रुपये एका ट्रेड ला द्या आणि बिनधास्त मोबाईल वर ट्रेडिंग करण्याची सोय उपलब्ध करून दिली. पुऱ्या जगामध्ये जी काही विक्री होते त्यातील ५०% विक्री मागे फ्री हा शब्द असतो त्यामुळे फ्री डिमॅट अकाउंट ज्या जाळ्यात गोंधळलेला सामान्य मध्यमवर्गीय व्यक्ती अडकायला किती वेळ लागतोय. कोणताही व्यवसाय सुरू करण्यापेक्षा डिमॅट अकाउंट ओपन करणे आणि ते ही फ्री म्हणजे सर्व कसे डोमिनोझ वर पिझा ऑर्डर केल्याप्रमाणे सोपे सुलभ..... त्यात शेअर बाजार त्याबद्दल एका बाजूला प्रचंड भीती आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड कुतुहुल मध्यमवर्गीय लोकांना आजही आहे.... एकदा डिमॅट अकाउंट ओपन केले की तुमचे सेविंग अकाउंट त्याला लिंक होते..... सुरुवातीला २५-५०००० टाकून सुरुवात केली जाते (हे पैसे म्हणजे रोजच्या जीवनमानाच्या खर्चाचे पैसे शेअर बाजारात फिरवले जातात) आणि त्यावर दिवसाला काहीतरी नफा पदरात पडेल या आशेने ट्रेडिंग चालू केली जाते. आणि पुढे जाऊन काही गोष्टी स्पष्ट व्हायला लागतात त्या अश्या... १. स्वतःकडे शेअर बाजार चे ज्ञान नसेल तर आधी ज्ञान घ्यावे आणि सुरुवात करावी माझ्या एका मित्राच्या भावाचा मला कॉल आला आणि त्यांनी सांगितले गेले १ महिना तो ट्रेडिंग करत आहे कधी नफा कधी तोटा होतोय त्याला त्याचा खास मित्र सांगतो त्याप्रमाणे तो ट्रेडिंग करतो पण त्यात खुश नाही आता तू मला सांगत ज मी तुझ्या टिप्स वर ट्रेडिंग करतो. मी त्याला सांगितले तुला गाडी चालवता येते का १००%, तो म्हणाला म्हणजे काय मी गेले ६ वर्षे गाडी चालवतोय.... मग जेव्हा तू चालवायला शिकलास तेव्हा अर्धवट शिकलास की चालवताना तुला कोणी टिप्स घ्यायचे नाही ना? त्याचप्रमाणे शेअर बाजारात ट्रेडिंग करण्यासाठी आधी तुम्हाला स्वतःचे ज्ञान असणे गरजेचे आहे आधी त्यावर काम करा. २. दिवसाला हमखास १०००-२००० कमवा फ्री डिमॅट अकाउंट आणि त्यात दिवसाला कमाई म्हणजे नफाच नफा....असे दिवसाला हमखास १०००-२००० कमवा इतके सोपे असते तर जगातील सर्व लोकांनी तेच केले असते. कमाई चे प्रकार असतात जसे की आपल्या नोकरी व्यवसायातून मिळणारी कमाई म्हणजे ऐकरी सरळ रेषेत येणारे उत्पन्न असते. शेअर बाजारात कोणतीच गॅरंटी किंवा वॉरंटी नसते. त्यामुळे प्रत्येक दिवशी तुम्ही शेअर बाजरात ट्रेड कराल आणि तुम्ही जिंकूनच घरी याल हे मृगजळ आहे. ३. २५-५०००० भांडवल त्यावर १० पट मार्जिन सर्वात मोठी गडबड इथे होते. स्वतःची २५-५०००० ची क्षमता असून सुद्धा शेअर बाजारात मिळत असलेल्या १० पट मार्जिन घेऊन ट्रेडिंग काही जण करतात म्हणजे काय तर १० पट ज्यादा रिस्क..... इथे ब्रोकर सांगतो सर जिथे तुम्हाला २५००० वर १००० रुपये नफा होईल तिथे मार्जिन घेऊन १०००० नफा होईल.... (इथे नाण्याची दुसरी बाजू म्हणजे १०००० नुकसान पण होऊ शकते याकडे पूर्णपणे दुर्लक्षित केले जाते) २५-५०००० सुरू झालेला प्रवास पहिल्या १-२ महिन्यातच २५००००-३००००० मध्ये जातो ४. व्हाट्सएपच्या फेसबुकवर मिळणाऱ्या टिप्स होंटेल मध्ये गेल्यावर बिल देताना आपण वेटर ला टीप देतो.... टीप द्यायची असते घायची नसते हे आपण पूर्णपणे विसरतो.... आणि कोण कुठल्या ग्रुप्स मिळणाऱ्या टीप्स मधून आपण नफा कमावू या आशेवर रोज नवनवीन टिप्स देणाऱ्या कंपन्यांना भुलतो. ५. बिघडणारी मानसिकता दिवसाला १०००-२००० नफा झालाच पाहिजे या आशेने सुरू झालेला प्रवास जेव्हा कधी १०००-२००० नुकसान सोसावे लागते त्या दिवशी होणारी चिडचिड, हरल्याची भावना आणि आज १००० तोटा झाला आहे तर उद्या २००० कमावूनच दाखवतो...म्हणजे प्रॅक्टिकल पैसा कमावण्याची मानसिकता बाजूला पडून हार-जित मानसिकता डोक्यात घुसते. यात समोर शेअर बाजार असते तर एका बाजूला अर्धवट ज्ञान घेऊन उतरलेला सामान्य गुंतवणूकदार असतो. ६. स्वतःच्या मुख्य नोकरी किंवा व्यवसायवर होणारा परिणाम सध्याचा काळ ही एक टेम्पररी फेज असलायचे विसरून आपल्या मुख्य नोकरी व्यवस्यायाला दुय्यम मानून सर्व लक्ष यावर दिले जाते. कोणतीही गोष्ट करताना त्यावर फोकस करणे मान्य पण आपला व्यवसाय किंवा नोकरी यावर पुर्णपणे दुर्लक्ष होणे याचे परिणाम भविष्यात आपल्याला दिसतात. कारण किती जरी झाले तरी नोकरी व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पनाची बरोबरी शेअर बाजार लगेच १-२ महिन्यात करू शकत नाही. खूप तरुण आज पगार कमी आहे म्हणून शेअर बाजारात ट्रेडिंग करायला सुरुवात करतात पण याच क्षणी ते त्यांच्या जीवनातील अमूल्य वेळ घालवून बसतात. वयाच्या २५-३५ मध्ये आपल्या क्षेत्रात नवनवीन स्किल शिकून नोकरी मध्ये मोठ्या पदावर जाऊन किंवा उद्योग धंद्या वाढवण्याची वेळ असते ते बाजूला राहून या ट्रेडिंग ट्रॅप मध्ये अडकून पैश्याची नासाडी होतेच पण त्याबरोबर जीवनातील अमूल्य वेळ ही हातातून निघून जातो. ७. ट्रेडिंग करणार कि गुंतवणूक (फॉरमॅट रेडी नसणे) क्रिकेट मॅच मध्ये ज्याप्रमाणे २०-२०, वन डे, किंवा टेस्ट क्रिकेट असा फॉरमॅट असतो या प्रत्येक फॉरमॅट मध्ये आज प्रत्येक देशाकडे वेगवेगळा संघ असतो त्याचप्रमाणे ट्रेडिंग करणार की गुंतवणूक हे नव्या गुंतवणुकादार कडे कोणताच फॉरमॅट रेडी नसतो. त्यामुळे मार्केटच्या उतार चढावा नुसार बघत बसण्याची वेळ त्यावर येते. सुरुवातीला सुरू झालेला हा आनंदी प्रवास कधी एकदा चक्रव्यूह बनतो हे कळत नाही आणि शेअर बाजार एक जुगार आहे हे समजून याला नावे ठेऊन ६०-७०% गुंतवणूकदार शेअर बाजार ला राम राम करतात. वरील लेख वाचून काहीजण बोलतील यात फक्त नकारात्मक बाजू मांडली आहे तर वरील गोष्टी मी माझ्या गेल्या १४ वर्ष्यात आलेल्या अनुभवावरून लिहले आहे शेअर बाजार संपत्ती निर्माण करण्याचे ठिकाण जरी असले पन ते त्यांच्यासाठीच आहे ज्यांनी आधी शेअर बाजारातील बारकावे समजून घेतले, त्याचा अभ्यास केला, फंडामेंटल टेक्निकल अँनेलिसिस शिकून घेतले, संयम ठेऊन सुरुवात छोट्या पावलांनी केली आणि हळूहळू आपली रिस्क घेण्याची क्षमता वाढवून, योग्य मार्गदर्शन घेऊन नक्कीच यात यशस्वी होता येईल. ज्याप्रमाणे सराईत गाडी चालवणारा गाडी चालवण्याचा आनंद घेत असतो पण नवखा किंवा अर्धवट शिकलेला चालक ब्रेक दाबू की एक्सलेटर दाबू यात गोंधळलेला असतो त्याचप्रमाणे शेअर बाजारात गोंधळून गेलेल्या गुंतवणूकरांचे नुकसान म्हणजे सराईत गुंतवणूक दारांचा नफा असतो. उद्या याच शेअर बाजारात योग्य रीतीने कसे उतरायचे कोणती तयारी करायची हे पाहू. तर या लॉकडाउन मध्ये तुम्ही किंवा तुमचा जवळचा मित्र भाऊ बहीण या फ्री डिमॅट चक्रव्यूहात अडकले असतील तर वरील लेख त्यांच्यापर्यंत नक्की पोहचावा. यातील एक ओळ ही त्यांना मार्गदर्शक ठरली तर वरील लेख लिहल्याचे समाधान होईल. तुमच्या प्रतिक्रिया नक्की पोस्ट करा. *************************** तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा. https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa
तुम्ही अजून शेअर बाजार गुंतवणूकिसाठी तयार आहात का ?
शेअर बाजारात ट्रेडिंग करताय ??? लवकर भानावर या...
शेअर बाजारातून संपत्ती निर्माणात पुस्तकांचे महत्व
👍👍
वेळातला वेळ काढून अमुल्य मार्गदर्शन करत असल्याबद्दल आम्ही सर्व आपले आभारी आहोत
चांगला लेख आहे...आता नवीन ट्रेंड आहे..फ्री मध्ये शेअर मार्केट बद्दल training चया नावाखाली व्हॉटसअप ग्रुप बनवतात आणि एखाद basic training दिल्यावर..मी स्वतः तुमच्या साठी ट्रेडिंग करतो आणि पैसे घेतात लोकांकडून..आणि लोका देतात पण..
superb👌👌👍👍
nice sir
very nice sir
nice
Nice thought sir..
खूप चांगले मार्गदर्शन केले आहे.. ह्या माहितीबद्दल लेखकाचे आभार!! 🙏🙏
thanks sir
विषय काय आहे?
marathi mansala kamavnyachi sandhi milali pahije Saheb share market cha dnyan Khup garjecha Chan mahiti aabhari ahe.
good
छान मार्गदर्शन धन्यवाद
nice article
खूप योग्य मार्गदर्शन.
खुप छान माहिती दिली आहे sir तुम्ही
निरीक्षण आणि अनुभव उत्तम
फारच छान मार्गदर्शन केले सर तुम्ही. कोणत्याही क्षेत्रात जाण्याआधी परिपूर्ण ज्ञान असणे खुप महत्वाचे असते. असेच मार्गदर्शन करत राहा. धन्यवाद सर........👍👍👍👍
superb sir
अतिशय सुंदर आणि उपयुक्त लेख आहे .. माझी मानसीकता बदलली या लेखमुळे... धन्यवाद.
लेख खरच खूप महत्वाचा आहे ,जे नवीन शेयर मर्केट मधे उतरणार आहेत त्याच्या साठी तर खूपच महत्त्वाचा आहे.
Nice
छान माहिती दिलात सर
बरोबर आहे सर
खूप महत्त्वाची माहिती.
excellent article
excellent
प्रत्येकाने वाचन करावी अशी सुंदर माहिती धन्यवाद सर जी
👍👍👍
हा लेख दिसत का नाही ए.. सबस्क्रिप्शन आहे का काही??
अतिशय महत्त्वाची माहिती दिलीत सर खरतर नविन सुरूवात करणारांना घाई होते आणि पुन्हा पच्यताप धन्यवाद सर
छान लेख
अत्यंत माहितीपूर्ण संतुलित लेख .आवडला.
Good Information Mahesh chavan sir Thank you very much
खूपच छान माहिती दिली
🙏 thank you sir very good
1 no sir
नमस्कार मित्रवर्य महेश जी चव्हाण सर, मी राज विभांडिक रिटायर्ड अभियंता BSNL, Ex.Faculty MCED, DIC, खादीग्रामोद्योग for अर्थ व उद्योजकीय व्यवस्थापन , उद्योजकता विकासक, मार्गदर्शक, प्रेरक शिक्षक, ट्रेडर व इनव्हेस्टर. आपला लेख व प्रशिक्षण अभ्यासपूर्ण हे
खूप छान माहिती दिलीत
लेख अप्रतिम आहे.. अनुभवाचे बोल आहेत... समजलं तर फायदा आपल्या सर्वंचाच आहे... लक्ष देवुन निट समजुन लेख वाचला तर भरपुर गोष्टी शिकण्या सारख्या आहेत...
खूप छान माहिती दिली धन्यवाद.
very good sir
खूपच छान सर
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद
खूपच छान सर 👌👌👌👌👌
खरे आहे
Very Informative
महत्वाचे मार्गदर्शन !!! मार्केटचे बेसिक ज्ञान अत्यंत आवश्यक, व सुरुवात छोट्या अमाऊंट पासून प्रॅक्टिकल ज्ञान घेण्यासाठी व सरावासाठी करावी. म्हणजे बारकावे माहिती होतात. !!!👍👍👍👍👍
खूप डोळ्यात अंजन घालणारी माहिती , धन्यवाद
खूप डोळ्यात अंजन घालणारी माहिती ,
Very Informative Article... Thanks For This.
sorry due to network issue so many reply is there plz delete if possible
It's an eye opening msg for All ..... Thank you for this information