श्री. महेश चव्हाण
प्रत्येक डिमॅट अकाऊंटधारकाने वाचावा असा लेख. --->
गेल्या काही महिन्यापासून मला माझ्या जवळपास ४०-५० ग्राहकांनी, कुणी फोन करून, कुणी SMS करून त्यांना त्यांच्या मोबाईल नंबरवर येत असलेल्या SMS बद्दल विचारले, ‘हा मला SMS आला आहे आणि त्यात लिहले आहे...
"खरेदी करा.... खरेदी करा.....
खरेदी करा XYZ कंपनीचे शेअर्स खरेदी करा.
कंपनीला मोठा नफा झाला आहे...
ही संधी सोडू नका.....
५०० शेअर्स तरी खरेदी करा...
शेअर्सचा भाव येत्या काही काळातच दुप्पट होणार आहे.
"DONT MISS THIS GOLDEN OPPORTUNITY".
अशा पद्धतीचे SMS डिमॅट अकाउंट धारकाला येणे ही आमच्यासाठी साधारण गोष्ट आहे पण जेव्हा लक्षात आले की याचे प्रमाण वाढले आहे आणि यासाठी आपल्या ग्राहकांना, शेअर्स बाजारात प्रवेश करणाऱ्या नवीन डिमॅट धारकांना सावध करण्यासाठी आजचा हा लेख म्हणा किंवा या घोटाळेबहाद्दरांचा भविष्यातील डाव मोडून काढण्यासाठी केलेला खटाटोप समजा. कारण आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्या क्षेत्रामध्ये होणारी लुबाडणूक पहिली की तळपायाची आग मस्तकाला जाते. या अजातशत्रूंविरुद्ध लढण्यासाठी हा लेख तुम्हाला आवडल्यास फक्त एक करा तुमच्या मित्र-परिवारातील, कार्यालयीन सहकारी, नातेवाईक ज्यांची डिमॅट अकाउंट आहेत त्या कमीत कमी १० जणांबरोबर हा लेख शेअर करा. कारण सावध करण्यानेसुद्धा भविष्यातील हानी आपण टाळू शकतो.
कृपया लक्षपूर्वक वाचा
डिमॅट अकाउंट धारकाला वरील प्रमाणे SMS येणे हे सामान्य बाब आहे. हे SMS खूप आकर्षक असतात.
खरेदी करा... खरेदी करा ...खरेदी करा
ही संधी सोडू नका येत्या काही महिन्यातच भाव दुप्पट.
खूप सारे छोटे-मोठे गुंतवणूकदार या आकर्षक SMS च्या जाळ्यात कसे अडकतात आणि हे गौडबंगाल चालवणारे कसे मोठा पैसा घेऊन जातात ते बघूया
टीप :- पुढे सर्व किंमती आणि माहिती ही काल्पनिक आहे. स्टॉक ऑपरेटर शेअर कसे गळ्यात मारतात ते पाहूया.
समजा XYZ कंपनीचा शेअर १०० रुपये आहे.
कंपनीचे एकूण शेअर्स :- ५० लाख
ऑपरेटर/ कंपनीच्या मालकाचे शेअर्स :- ४७. ५० लाख
सामान्य गुंतवणूकदारचे शेअर्स :- २. ५० लाख
हा शेअर एका सरळ रेषेत १०० रुपयांवरून ११०-१२० रुपयांपर्यंत आणला जातो आणि हे ऑपरेटर्सना खूप सोपे असते कारण त्यांच्याकडे जवळपास ९०% पेक्षा जास्त शेअर्स असतात. हे शेअर्स वरच्या किमतीला सामान्य लोकांच्या गळ्यात मारणे हेच यांचे ध्येय असते. छोट्या गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेण्यासाठी खरेदी-विक्री आधीच जोमात चालू केलेली असते त्यानंतर या कंपनीचे विभाजन जाहीर केले जाते, याला SPLIT ऑफ शेअर्स असे म्हणतात..
SPLIT ऑफ शेअर्स समजा १०:१ असे असेल तर या नंतरची परिस्थिती.
कंपनीचे एकूण शेअर्स :- ५ करोड
ऑपरेटर/ कंपनी च्या मालकाचे शेअर्स :- ४. ७५ करोड
सामान्य गुंतवणूकदारचे शेअर्स :- २५ लाख
शेअर्स ची किंमत :- रुपये १०
आता इथूनपुढे कसा खेळ चालू होतो पहा
************************************
लक्षपूर्वक वाचा.....!!!
************************************
SPLIT झाल्यानंतर १० रुपयाचा शेअर्स पुढच्याच काही १-२ आठवड्यात १० वरून १२-१३-१४ पर्यंत नेला जातो (हे ऑपरेटर्सना सहज शक्य आहे.)
शेअर १० वरून जेव्हा १२-१३-१४ वर अप्पर सर्किट मारत जातो तेव्हा याबाजारात या शेअर्स बद्दल चर्चा चालू होते. थोड्याच दिवसात शेअर १५-१६ पर्यंत नेला जातो
*** आता ही ऑपेरेटर्सची टीम काय करते ****
बाजारात उपलब्ध असलेले BULK SMS चे पॅक घेतले जाते. या BULK SMS चा प्रत्येक SMS साठीचा दर जवळपास ०. ०३ पैसे आहे.
या ऑपरेटर्सनी १ कोटी SMS चा पॅक जरी घेतला तरी त्यासाठी त्यांना ३ लाख रुपये लागतात
10000000 * 0.03 = 3 लाख
या BULK SMS पॅक च्या खरेदीनंतर ऑपरेटर लॉबी मार्केट मधून डेटा पुरवणाऱ्या कंपन्यांकडून डिमॅट अकाउंट होल्डर्स आणि त्यांचे मोबाईल नंबर घेते डिमॅट होल्डरचा मोबाइलला नंबर मिळवल्यानंतर ही लॉबी एक आकर्षित SMS तयार करते आणि या कंपनीचे शेअर्स खरेदी करा हे सांगितले जाते
SMS चे उदाहरण ::
BUY BUY BUY XYZLTD. @ MARKET PRICE Of 16 Target In 1 Month Is 30 Rs.
JUST BUY BUY BUY Don't Miss The Stock.
BUY Only Small Quantity Of 300 - 500 Shares,
Fast Fast Don’t Miss The Opportunity.
Sender: TM - *****, AD - *****
{SMS Sender Is Always Unknown}
हा SMS जवळपास २५ लाख डिमॅट होल्डर्स ना पाठवला जातो (फक्त डिमॅट अकाउंट होल्डर्सना हा SMS पाठवला जातो.) आणि पुढच्या ३-४ दिवसात हा मेसेज २५ लाख लोकांना ३-४ वेळा पाठवला जातो
25 लाख * 4 Same SMS = 1 कोटी {Which Operator Lobby Purchase From Web SMS Services}
याचे Calculation बघूया : :
Stock Operator Sent Rosy SMS To 25 Lacs User { 4 Times }
25 Lacs Users Receive SMS
1. Only 70 % of Mobile Users Read The SMS.
• फक्त ७०% लोक हा मेसेज वाचतात.
• ३०% लोक हा मेसेज डिलिट करतात असे समजू
25 लाख * 70 % = 17. 50 लाख
मेसेज वाचणाऱ्याची संख्या = 17.50 लाख
2. Only 25% is Stock Traders/Investor from Those (17.50 Users)
(यातील फक्त २५% सक्रिय अकाउंट होल्डर्स आहेत असे समजू)
1750000 * 25 % = 437500 सक्रिय अकाउंट होल्डर्स
या SMS कडे आकर्षित झालेल्यांची संख्या = 437500 Users
3. Only 30% from Interested Users Thinking Of BUY Stock.
(यातील ३०% हा शेअर्स खरेदी करायचा विचार करतात )
Then No. Of Users Who May BUY:
437500 * 30 = 131250 Users
हा शेअर खरेदी करायचा विचार करणारे ३००-४०० शेअर्स खरेदी करूया असा निर्णय घेतात कारण नुकसान झाले तरी होऊन होऊन किती होईल तर एक ३०००-४००० रुपये पण दुप्पट झाले तर ८०००-१०००० मिळतील म्हणून ते रिस्क घेतात.
Calculation Of Investors / Traders BUY Quantity Who Bought Because Of ROSY SMS :
IF All Such Investors / Traders Buy 350 Shares Then
131250 (USERS) * 350 (Share Quantity) = 45937500
{ म्हणजे जवळपास ४.७५ कोटी शेअर्स हे १. ३१ लाख होल्डर्स खरेदी करतात }
फक्त त्या एका आकर्षक SMS च्या मेसेज मुळे हे शेअर्स गळ्यात मारलेले असतात.
:: Interesting Calculation बघूया ::
विभाजनाच्या नंतर कंपनीमध्ये कशी शेअर होल्डिंग होती
:: After Split ::
कंपनीचे एकूण शेअर्स :- ५ कोटी
• ऑपरेटर/ कंपनी च्या मालकाचे शेअर्स:- ४. ७५ कोटी
• सामान्य गुंतवणूकदारचे शेअर्स:- २५ लाख
आणि या आकर्षक SMS च्या नंतर कंपनीचे एकूण शेअर्स :- ५ कोटी
• ऑपरेटर/ कंपनी च्या मालकाचे शेअर्स:- २५ लाख
• सामान्य गुंतवणूकदारचे शेअर्स:- ४. ७५ कोटी
सर्व शेअर्स सामान्य गुंतवणूकदारांच्या गळ्यात मारल्यानंतर
• ऑपरेटर/ कंपनी च्या मालकाचे शेअर्स :- २५ लाख
• सामान्य गुंतवणूकदारचे शेअर्स :- ४. ७५ कोटी
ते ही वरच्या भावात आणि जेव्हा सामान्य गुंतवणूकदाराकडे ४. ७५ कोटी शेअर्स येतात तेव्हा शेअर खाली खाली यायला लागतो. हे पाहत राहण्याशिवाय त्यांना काहीच पर्याय नसतो कारण सौदे खूप कमी होतात कारण इथे फक्त विक्री करायला सर्वजण असतात घेणारे कोणीही नसते कारण BULK SMS पॅक कधीच संपलेला असतो
मला खात्री आहे या लेखाच्या माध्यमातून मी शेअर बाजारातील अशी काळी बाजू मांडली आहे की हा लेख वाचून तुम्ही सावध झालात आणि भांविष्यात अशा प्रकारचा एखादा SMS तुम्हला येईलच तेव्हा काळजी घ्या.
सावध रहा... सतर्क रहा... जास्तीत जास्त डिमॅट होल्डर्स पर्यंत पोहचवा.
महत्त्वाची टीप:- वरील सर्व माहिती कोणत्याही शेअर्स संबंधी नाही तर जास्तीत जास्त लोकांना कळावे म्हणून सोपे केलेले Calculation आहेत.
***************************
तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa