भारताचे प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी काल कोविड-१९ या जागतिक संकटातून भारताला बाहेर काढण्यासाठी २० लाख करोडच्या मदतीचे पॅकेज जाहीर केले. जेव्हा जेव्हा भारतावर मोठी मोठी संकटे आली आहेत तेव्हा तेव्हा भारताने ती परतवून लावली आहेतच आणि त्याचसोबत भारत परत नव्या जोमाने उभा राहिला आहे.आता ही भारताला या कोरोना संकटातून बाहेर पडल्यावर नव्याने उभा राहण्यासाठी ही आर्थिक मदत समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचवणे आणि त्यातून एक नवीन आत्मनिर्भर भारत आपल्याला उभा करायचा आहे, असे माननीय पंतप्रधान मोदीजीनी उद्देशून सांगितले.
यावर ही आता टीका टिपण्णी होईल, काहीजण याचे समर्थन करतील, काहीजण हे पैसे कुठून आणणार यावर वायफळ चर्चा करत बसतील. पण यातून एक सामान्य माणूस म्हणून मी काय घेऊ शकतो याचा विचार करणे गरजेचे आहे.
२० लाख करोड म्हणजे प्रत्येकी १५ लाख रुपये १३० करोड लोकांना वाटा असा ही एका मित्राने मेसेज पाठवला. म्हणजे काय तर खूपवेळा सामान्य व्यक्ती म्हणजे गरीब आणि मध्यम वर्गीय आपल्या जीवनात आपण स्वतः काहीतरी चांगले करू शकतो किंवा होउ शकते याची ते आशाच संपवून बसलेले असतात. सरकार आमच्यसाठी काही करतच नाही. असा एकमार्गी सूर ते लावून आयुष्यभर वायफळ चर्चा करत बसतात. पण जीवनात जर तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर आपल्या जीवनाची दोरी आपल्या हातात घ्यावी लागते यासाठीच कोरोना मुळे बिघडलेले आर्थिक जीवन तुम्हाला पूर्वपदावर आणायचे असेल तर त्याआधी तुम्हाला स्वतःला जबाबदारी घ्यावी लागेल. हो तुम्हाला स्वताला कारण आत्मनिर्भर भारत तेव्हाच बनेल जेव्हा प्रत्येक व्यक्ती स्वतः आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होईल.
आयुष्य बोलले तर त्यात संघर्ष येणारच पण संघर्ष आहे म्हणून आपण जगणे सोडत नाही. यासाठीच स्वताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी गरज आहे आजपासून सुरुवात करूया आणि देऊया आपल्या आर्थिक जीवनाला नवीन दिशा.
मी आत्मनिर्भर : माझा परिवार आत्मनिर्भर
१. आपल्या आर्थिक जीवनाचा ताळेबंद काढा. महिन्याचे उत्पन्न आणि महिन्याचे खर्च सर्व लिहून काढा.
२. यावर्षी अनावश्यक खर्चाला कात्री लावा.
३. कमीत कमी ३ महिन्याचा खर्चाची तरतूद असू द्या. (वेळेला एखादी गुंतवणूक किंवा बचत मोडावी लागली तरी चिंता करू नका पण अनावश्यक गोष्टी साठी पैसा खर्च करू नका.
४. घरातील कमावत्या व्यक्तीचा टर्म इन्सुरन्स काढून घ्या. आधी असेल तर उत्पन्नाच्या २० पट आहे की नाही ते पाहून घ्या.नसेल तर नवीन अजून एक काढून घ्या.
५. फॅमिली साठी योग्य कव्हर चा हेल्थ इन्सुरन्स काढून घ्या.आज खुपजनांना वाटते की माझा हेल्थ कव्हर योग्य आज पण तो असतो फक्त २-३ लाखाचा किंवा कंपनी ने दिलेला. ४ जणांची फॅमिली असेल तर कमीतकमी ७-१० लाखाचा हेल्थ कव्हर असावा.
६. स्वतःच्या रिटायरमेंट साठी १०% सक्तीने म्युचुअल फंडात SIP करा. आपल्याला आयुष्यभर आत्मनिर्भर रहायचे आहे हे लक्षात घ्या.
७. भविष्यात येणाऱ्या आर्थिक खर्चाची आवण तरतूद कसे करणार आहोत त्याचे नियोजन करा.
८. नोकरी करत असाल तर छोटासा व्यवसाय सुरू करता येतो का पहा (व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती कडून आधी मार्गदर्शन घ्या) व्यवसाय करत असाल तर आपल्या व्यवसायचे स्वरूप कसे राहील तो नवीन स्वरूपात कसा वाढवता येईल याचे नियोजन करा.
९. आज प्रत्येक घरात काही न काही लोन असते त्याचा ताळेबंद काढा. कोणती कर्जे जास्त व्याज दराची आहेत ते काढून ती लवकरात लवकर कमी करून टाका. लक्षात घ्या गुंतवणूक करण्यापेक्षा डोक्यावर असणारे कर्जे कमी करणे शहाणपणाचे असते.
१०. परिवारातील महत्वाची कागदपत्रे, गुंतवणूक इन्सुरन्स चे पेपर याची वेगवेगळी फाईल बनवून सम्पूर्ण परिवाराला त्याची माहिती द्या.
लक्षात घ्या आपण आत्मनिर्भर तर आपला परिवार आत्मनिर्भर आणि जर परिवार आत्मनिर्भर तर भारत आत्मनिर्भर. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण स्वतः जबाबदार नागिरीक सारखे आपली स्वतःच्या आर्थिक जीवनाची काळजी घेऊ.
तुमच्या आर्थिक जीवनात कुठेही मार्गदर्शन लागलयास तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता.
***************************
तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "
मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa