सुविचार
तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .
डाउनलोड मोबाईल ॲप
मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
शेअर बाजार गुंतवणूक म्हणजे वेग-वेगळ्या उद्योगधंद्या मध्ये केली जाणारी गुंतवणूक होय. त्यामुळे जर तुम्हाला भारतातील उद्योगधंद्यावर, इथे असलेल्या ग्राहकांच्या क्षमेतवर, सरकारी धोरणावर जर विश्वास नसेल तर तर तुम्ही गुंतवणुकीत आशावाद निर्माण करू शकत नाही आणि त्यामुळे तुम्ही अपयशी होऊन बाहेर पडाल. भारतामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या भारताला इतरांपेक्षा वेगळे करतात ज्यामुळे परकीय गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर भारताकडे आकर्षित होत आहेत हे पाहणे गरजेचे आहे. जिथे पिकते तिथे विकत नाही ही म्हण अगदी या परिस्थितीला सार्थ होते कारण आज मोठ्या परदेशी कंपन्या भारतामध्ये उद्योगधंदे उभे करून ग्राहकाच्या पसंतीच्या जागतिक दर्जाच्या वस्तू आणि सेवा ग्राहकांना पुरवीत आहेत आणि त्याच बरोबर मोठ्या प्रमाणावर नफा कमवत आहेत. "भारत - एक आर्थिक महासत्ता" हे आज आपण सगळीकडे ऐकत असलो तरी नक्की कसे हे सामान्य गुंतवणूकदाराला कळत नाही. Turtle Wealth Management या कंपनीचे संस्थापक श्री. हितेश माळी ज्यांनी गेल्या २० वर्ष्यापासून शेअर बाजार गुंतवणूकीबद्दल संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी भारतभर कार्यशाळा घेतल्या आहेत. त्यांनी दोन वर्ष्यापुर्वी पुण्यात घेतल्याला कार्यशाळेत "भारत - एक आर्थिक महासत्ता" आणि त्यामुळे उपलब्ध असलेल्या गुंतवणुकीच्या संधी यावर सोप्या भाषेत समजावून सांगितलेले आहे. युट्युब वर उपलब्ध असलेला हा व्हिडिओची लिंक इथे शेअर करत आहे. https://www.youtube.com/watch?v=Sem5722hKlM व्हिडीओ पाहून प्रतिकिया नक्की कळवा.
सामाजिक मापदंड... व्यवसायातील साखळदंड
तुम्ही अजून शेअर बाजार गुंतवणूकिसाठी तयार आहात का ?
👌👌👌👌👌👌
nice
nice speech
good