सुविचार

तुम्ही जी गोष्ट देता ती वाढवून तुमच्याकडेच परत येते .आपण आपल्या उद्दिष्टच्या मर्यादा आखून घेत नाही . तोवर ते पूर्ण होत नाही .देवाण घेवाण करण्याचा पैसा हा एक सोपा मार्ग आहे एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने घ्या. एक छोटेसे छिद्र जहाज बनवू शकते .पैशांविषयी समाज प्राप्त होतेच , पैशांची समस्या दूर होते .गळत्या पाकिटाचा आणि गळत्या जहाजाचा बुडणं अटळ असत .

मराठी पैसा मोबाईल ॲप आजच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

विमा एक गुंतवणूक की सुरक्षा? विमा एक गुंतवणूक की सुरक्षा?

02 Dec 2018 By श्री. महेश चव्हाण
1525 9 Comments
post-1

श्री. महेश चव्हाण

आर्थिक नियोजनाचे महत्व : विमा नियोजन

गेल्या वर्षी घडलेल्या दोन घटना.

एक घटना माझ्या एका दूरच्या नातेवाईकांच्या बाबतीत घडली. गणेश चे वयाच्या 36 व्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. मागे पत्नी, 2 मुले, आई- वडील असा परिवार. असे काही जवळच्या परिवारात घडले की माझी चक्र आता या परिवाराची आर्थिक परिस्थिती काय? याकडे पुरेसा विमा आहे काय? असेल तर त्याची काही रक्कम मिळेल का? किंवा नसेल तर हा परिवार काय करेल ?असे एक ना अनेक प्रश्न डोक्यात येऊ लागतात. नंतर जवळच्या काही नातेवाईक कडे चौकशी केल्यावर लक्षात आले त्यांची आर्थिक परिस्थिती मध्यम वर्गीय मध्ये मोडणारी. मयत व्यक्तीने स्वतः साठी 2-3 विमा पॉलीसी घेतल्या होत्या त्याचे 4 लाख मिळाले, हे कळाले..

दुसरी घटना माझ्या इमारतीत राहणाऱ्या किशोर नावाच्या मित्रासोबत घडली. याचे हि वय 40 च्या आसपास. दोन मुली आणि पत्नी असा परिवार. किशोर मित्रांसोबत पीकनिक ला गेला असताना, कार अपघातात किशोर आणि याचे 2 ऑफिस मधील सहकारी जागेवरच गेले. त्याच्या पत्नी साठी हा धक्का तर मोठा होताच पण त्याच बरोबर दोन मुली ना सांभाळणे आणि पुढील भविष्य याचा विचार. पण जेव्हा कळले की या मित्राने स्वतःचा 1 करोड रुपयांचा जीवन विमा काढला होता. त्यामुळे त्या गेलेल्या मित्राबद्ल सहानभूती ची जागा आज सन्मानाने घेतली आहे. कारण घरातील कर्त्या व्यक्तीची हीच जबाबदारी असते परिवाराला आपण नसताना काय गरजेचे आहे ते ज्याला कळते तोच खरा जबाबदार कर्ता पुरुष होय.

वरील दोन घटना मध्ये काय दिसून येते तर दोघांनीही जीवन विमा घेतला होता, पण आपल्या परिवाराला किती रकमेची गरज आहे, कोणती विमा पोलिसी घ्यावी याबद्दल गणेश ला काहीच माहित न्हवते, त्याने 3 पोलिसी काढल्या होत्या पण त्या सर्व गुंतवणुक प्लस सुरक्षा प्रकारातल्या होती त्यामुले त्याला विमा कव्हर फक्त 4 लाखाचा होता.तर त्याउलट किशोर ने 1 जीवन विमा पॉलिसी घेतली होती ती निव्वळ सुरक्षा प्रकारातील होती त्यामध्ये जीवन विम्या चा हफ्ता कमी असतो पण जीवन विमा कव्हर मोठा असतो.

एखाद्या परिवाराची झालेली मनुष्यहानी कोणी भरून काढू शकत नाही पण आर्थिक हानी आपण विमा नियोजना द्वारे करू शकतो. जीवन विमा एक गुंतवणूक कि विमा संरक्षण हा मूळ प्रश्न आहे. 

आज भारतातील फक्त 18% लोकांकडे विमा संरक्षण आहे पण यातील किशोर सारखे विमाधारक किती असतील ? हा हि एक प्रश्न आहे. आज विविध गुंतवणुकीचे पर्याय आपल्याकडे असताना अजून हि भारतात विमा हा गुंतवणूक पर्याय म्हणून पहिला जातो जिथे फिक्स्ड डिपॉझीट पेक्षा हि कमी परतावा मिळतो. आपल्या परिवाराची आर्थिक जबाबदारी आपल्यावर आहे आपण असताना हि आणि नसताना हि त्यामुळे स्वतःच्या उत्पन्ननुसार आणि भविष्यातील गरजेनुसार विमा नियोजन करणे काळाची गरज बनली आहे.

***विमा नियोजन कसे करावे ?*** 

विमा नियोजन करताना खालील गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. त्यासाठी आपण खालील उदाहरण बघू.

श्री काळे वय 40 वर्ष एका नामांकित कंपनी मध्ये कामाला आहेत, त्यांच्या फॅमिली मध्ये पत्नी, एक मुलगा आणि आई वडील आहेत. घरासाठी घेतलेले कर्ज आज जवळपास 12 लाख पर्यंत शिल्लक आहेत. आणि त्याचबरोबर भविष्यात मुलाच्या शिक्षणासाठी, आई वडिलांच्या औषध पाण्यासाठी 50 लाखाची गरज आहे. श्री.काळे यांचे विमा नियोजन साठी कितीचा विमा घ्यावा लागेल ते आपण पाहूया.

1. सध्याचे वार्षिक उत्पन्न= 5 लाख
2. सध्या असलेली कर्जाची रक्कम = 12 लाख
3. भविष्यातील आर्थिक ध्येयासाठी लागणारी रक्कम = 50 लाख


विमा नियोजनाचा पहिला मंत्र म्हणजे वार्षिक उत्पनाच्या 20 पट विमा आपल्याकडे असायला हवा म्हणजे श्री. काळे यांना प्राथमिक स्वरूपात 1 करोड चा विमा गरजेचा आहे. कारण अचानक मृत्यू ओढवाला तर विम्यातून मिळणाऱ्या 1 करोड रक्कमेच्या गुंतवणुकीतून वार्षिक 7%-8% म्हणजे 7-8 लाख सहज मिळवू शकतात. ताचबरोबर काळे यांनी घेतलेलं कर्जे पण बँकला परत देणे आलेच आणि भविष्यातील आर्थिक ध्येयासाठी लागणारी रक्कम म्हणजे अजून एक 62 लाख रुपयांची गरज आहे. या सर्व घटकांचा अभ्यास केल्यास श्री. काळे यांना जवळपास 1.62 लाख रुपयांचा विमा गरजेचा आहे. श्री.काळे यांना कमीत कामीं 1.50 करोड चा टर्म इन्शुरन्स गरजेचा आहे ज्यासाठी जवळपास 40000 चा त्यांना विम्याचा हफ्ता भरावा लागेल.

आर्थिक नियोजनाची सुरुवात करताना विमा नियोजन हि पहिली पायरी आहे. बहुतेक जण विमा म्हणजेच गुंतवणूक समजून गणेश ने जी चूक केली ती चूक करताना दिसतात. मनी बॅक पॉलिसी हा एक लोकप्रिय प्रकार आहे.पण ज्याप्रमाणे आपण आपल्या कार चा इन्शुरन्स घेतो आणि त्यातुन कोणताही परतावा आपल्याला अपेक्षित नसते त्याचप्रमाणे स्वतःचा विमा घेताना हि त्याप्रमाणे विचार करणे गरजेचे आहे.

लक्षात घ्या तुम्हाला किती रकमेचा विमा घ्यायचा हे वरील उदाहरणावरून तुम्ही काढू शकता आणि आपल्या परिवाराला एक जबरदस्त सुरक्षा कवच देऊ शकता.


***************************

तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa

Share This:

प्रतिक्रिया

golu kumar on 24 Jun 2022 , 3:34PM

the hgfjjii

Jayanta on 17 Sep 2021 , 10:22PM

खुप सुंदर माहिती👌

YOGESH on 22 Dec 2018 , 11:08PM

Know details of term insurance policy available with maximum term and claimed settlement ratio and features with best company.

श्यामकांत निम्बादास खैरनार on 14 Dec 2018 , 12:38PM

LIC ची उत्तम योजना आहे

sachin on 13 Dec 2018 , 9:28PM

tata Aig life insurance geu ka sir

sidhesh on 09 Dec 2018 , 8:09AM

महत्वपूर्ण माहिती , आपले आभार!याप्रमाणे गुंतवणूक विषयक माहिती द्यावी , ही विनंती

laxman on 08 Dec 2018 , 3:57PM

company plz

laxman on 08 Dec 2018 , 3:57PM

next chapter plz

laxman on 08 Dec 2018 , 3:56PM

खुपच महत्त्वाची माहिती

आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...