श्री. महेश चव्हाण
आज आपण म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील वेगवेगळ्या योजना पाहणार आहोत कारण जोपर्यंत आपल्याला त्यातील फरक समजणार नाही तोपर्यंत आपल्या आथिर्क ध्येयांसाठी कुठे गुंतवणूक करायची आपल्याला कळणार नाही.
म्युच्युअल फंड कंपनीद्वारा गुंतवणूकदारांच्या गरजांनुसार वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या जातात. या योजना गुंतवणूकदाराच्या
>> सध्याची आर्थिक बाजू,
>> बचतीची क्षमता,
>> गुंतवणुकीची गरज,
>> जोखीम घ्यायची तयारी आणि
>> या गुंतवणुकीवर किती परतावा आणि कधी
या सर्व गोष्टींचा अभ्यास करून जाहीर केल्या जातात. भारतामध्ये सध्या ४३ म्युच्युअल फंड कंपन्या आणि त्यांच्याकडे प्रामुख्याने ४००० पेक्षा जास्त योजना आहेत. सेबीचे माजी चेअरमन सी.बी. भावे यांनी म्युच्युअल फंड कंपन्यांना म्युच्युअल फंडच्या योजना कमी करण्यासाठी आवाहन केले होते आणि भविष्यातही योजनांची संख्या कमी ठेवण्यासाठी सांगितले होते.
म्युच्युअल फंड च्या योजना :-
१. Equity Funds / Growth Funds :- ह्या म्युच्युअल फंडच्या योजना मुख्यत्वेकरून विविध कंपन्यांच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करतात. गुंतवणूक केलेल्या रक्कमेला जास्तीत जास्त परतावा पुढील ५ तर १० वर्षात मिळावा यासाठी हे पर्याय योग्य असतात. Equity Fund हे जोखीमवाले असतात आणि यातील परतावा हा शेअर बाजाराच्या परतव्यानुसार असतो. या मध्येही विविध पर्याय असतात जसे की
- Diversified Funds :- ह्या योजना वेगवेगळ्या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. त्यामुळे जोखीम कमी होण्यास मदत होते.
- Sector Specific Funds :- ह्या योजना फक्त एका क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. जसे की रिअल इस्टेट, इन्फ्रास्ट्रक्टर
- Index Based Funds. :- ह्या योजना शेअर मार्केट मधील इंडेक्स (निर्देशांक) मधील शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. जसे की CNX, Nifty Index and S&P, BSE Sensex. शेअर बाजारातील ज्या इंडेक्सशी संबंधित म्युच्युअल फंड असेल त्या नुसार त्यामध्ये उतार-चढ पाहायला मिळतो.
२. Debt Fund / Fixed Income Funds :- ह्या योजना प्रामुख्याने Debt/फिक्स इनकम सिक्युरिटीज मध्ये म्हणजेच कॉर्पोरेट बॉण्ड्स, डिबेंचर्स, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आणि अशा प्रकारच्या वेगेवेगळ्या गुंतवणुकीत पैसे गुंतवले जातात. ह्या योजना दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी, कमी जोखीम घेऊन जास्तीत जास्त परतावा मिळावा यासाठी गुंतवणूकदार पसंत करतात.
३. Tax Saving Funds :- टॅक्स सेविंग फंड नावाप्रमाणेच टॅक्स सेविंगसाठी गुंतवणूकदार यामध्ये गुंतवणूक करतात. पण यातील खरी गोष्ट म्हणजे टॅक्स सेविंग बरोबरच जर गुंतवणूकदार दीर्घकालीन ध्येय डोक्यात ठेऊन यात गुंतवणूक करत असेल तर यातून परतावा हे चांगला मिळतो. इनकम टॅक्स ऍक्ट १९६१, ८० C नुसार १५०००० पर्यंत गुंतवणूक या टॅक्स सेविंग ज्यांना ELSS MF ही बोलले जाते.
४. Liquid Funds / Money Market Funds :- Liquid फंड किंवा मनी मार्केट फंड Liquid म्हणजेच तरलता देणाऱ्या गुंतवणूक पर्यायामध्ये गुंतवणूक करतात. म्हणजे ३० दिवस-६० दिवस काही वेळेस तर ७ दिवसासाठी सुद्धा. स्विंग किंवा करंट अकाउंटला पैसे असलेले बहुतेक जण या Liquid Fund मध्ये गुंतवणूक करून स्मार्ट पैसे खिशात घालत असतात.
५. Balanced Funds :- Balanced Funds ह्या योजनांमध्ये शेअर्स बरोबरच फिक्स डिपॉजिट सारख्या सुरक्षित पर्यायामध्ये ही गुंतवणूक करतात. दोन्ही गुंतवणूक पर्याय एकमेकाला भिन्न आहेत आणि या गुंतवणुकीच्या माध्यमातून एक गुंतवणूकदारांची जोखीम कमी केली जाते. या गुंतवणूक योजना मध्यम किंवा दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी योग्य आहेत.
६. Exchange Traded Funds (ETFs) :- ETFs हे एक वैशिष्ट्यपूर्ण म्युच्युअल फंड आहेत ज्यामध्ये एखाद्या इंडेस्क्सचा किंवा कमोडिटी (गोल्ड/ सिल्वर) च्या मार्केटनुसार चढ-उतार होत असतात. समजा तुम्ही गोल्ड ETF मध्ये गुंतवणूक केली असेल तर गोल्ड च्या भावानुसार त्यामध्ये चढ-उतार होत राहणार. यामध्ये वैशिष्ट्य एकाच आहे की गोल्ड तुम्हाला स्वतःकडे ठेवायची गरज नाही.
याव्यतिरिक्त म्युच्युअल फंड गुंतवणुकीचच्या खूप योजना आहेत पण वरील मुख्य प्रकार आहेत. आपल्या आर्थिक ध्येयानुसार म्युच्युअल फंड निवडणे ही खरी कला आहे आणि याबद्दल तुम्ही जितका अभ्यास कराल तितके तुमचे आर्थिक ध्येय तुम्हणूनला तुमच्या दृष्टिक्षेपात दिसेल. पुढील लेखात म्युच्युअल फंड आणि इतर गुंतवणूक पर्याय याबद्दल सविस्तर पाहूया.
***************************
तुमच्या आर्थिक जीवनाला समृद्ध करणारे आणि योग्य दिशा देणारे विविध माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमचे "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" हे मोबाईल अँप आजच आपल्या स्मार्टफोन मध्ये खालील लिंक वरून डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.app.marathipaisa